आपल्याकडे वर्षातून बाराही महिने सहज उपलब्ध असणारे व प्रत्येकाच्या घरात खाल्ले जाणारे फळ म्हणजेच केळी होय. केळी खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Banana) अनेक आहेत. अगदी लहान बाळांपासून म्हाताऱ्या आजोबांपर्यंत हौसेने केळीचे शिकरण घराघरात खाल्ले जाते. बाजारामध्ये कच्च्या केळीपासून बनवलेले वेफर्स मिळतात. जे आपण उपवासाचे पदार्थ म्हणून प्रत्येक उपवासामध्ये खातो.
बनाना मिल्क शेक तर आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता असतो. जिम प्रेमी आपले शरीर व्यवस्थित राहण्यासाठी बनाना शेक व्यायामानंतर घेतात. सर्व फळांपेक्षा स्वस्त असलेली केळी अगदी गरिबाच्या घरातही सहजपणे खाल्ली जातात. अगदी सामान्य व गरीब लोकांच्या खिशाला परवडणारी किंमत असल्यामुळे घराघरात केळी खाल्ली जाते. मात्र या केळीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जे आपल्याला माहित नसतात!
केळी खाण्याचे फायदे – Benefits Of Eating Banana
आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे केळीचे अनोखे फायदे सांगणार आहोत. ज्याप्रमाणे केळी बाजारामधील सगळ्यात स्वस्त फळ आहे. त्याचप्रमाणे केळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन व खनिजे आढळतात. केळीच्या सालामध्ये जंतुनाशक तत्व असतात ज्याचा उपयोग त्वचाविकारांवर देखील केला जातो.
बाजारामध्ये दोन प्रकारची केळी उपलब्ध असते आपल्याकडे सामान्यपणे मिळणारी केळी व केरळमधील केळी आपल्याला मिळते. केळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम व फॉस्फरस असते. तसेच विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी आणि विटामिन डी चा भरपूर प्रमाणात अंश केळीमध्ये असतो. केळीमध्ये उष्मांक देखील जास्त असतात, त्यामुळे अनेक खेळाडू व स्पोर्टसमन आपल्या मधल्या आहारामध्ये एक किंवा दोन केळी खातात. त्यामुळे त्यांना परिश्रम करण्यासाठी व कसरत करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळते.
रक्तवाढीकरता केळीचा उपयोग-

केळीमध्ये थायमिन व फॉलिक ऍसिड असते. तसेच केळीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याकरता केळी खाणे फायदेशीर असते. अपघातात किंवा सर्जरी नंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असेल तर केळी खाण्याचा सल्ला डॉक्टर याचकरता देतात.
हाडांचा ठिसूळपणा

दूध आणि केळी खाण्याचे फायदे अनेक आहेत केळीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी केळीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. नियमित केळीचे सेवन केल्यामुळे हाडे मजबूत होतात. केळी खाल्ल्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते व हाडांचे आरोग्य चांगले राहते. वाढत्या वयाबरोबर वार्धक्याचे एक लक्षण म्हणजे हाडे कमजोर होणे, गुडघेदुखी, कंबरदुखी, हाडे दुखणे, पाठीच्या मणक्याच्या समस्या वाढणे यासारखे हाडे व स्नायुंसंबंधी दुखणे सुरु होतात. वार्धक्याच्या या सर्व समस्यांवर केळी नियमित खाणे एक प्रभावी उपाय आहे.
बद्धकोष्ठता व मलावरोधामध्ये केळीचा उपयोग

मलावरोध व बद्धकोष्ठतेचा समस्येमध्ये रोज केळीचे सेवन करणे फायदेशीर असते. केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे आतड्यांमध्ये अन्नाचे शोषण व अभिसरण सुधारते व अन्नपचनक्रियेचा वेग वाढुन अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते. केळीच्या नियमित सेवनामुळे
पचनसंस्थेसंबंधी व आतड्यांसंबंधी आजारांमध्ये लवकर आराम मिळतो व पोटामध्ये गॅस होणे तसेच ॲसिडिटीच्या समस्या देखील दूर होतात. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि मलावरोधावर केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.
वजन वाढवण्याकरता केळीचा उपयोग

आपल्यापैकी बर्याच लोकांना कृश शरीरामुळे व हडकुळे असल्याने लोकांच्या चेष्टेचा सामना करावा लागतो. चांगले वजन व सुदृढ सुडौल शरीर असेल तर व्यक्तिमत्वाची वेगळीच छाप पडते. वजन वाढीकरता अनेक आयुर्वेदिक अौषधे व वेट गेनिंग पावडर तसेच टॉनिक खाऊन देखील लाभ होत नाही. अनेक उपाय करून देखील वजन काही वाढतच नाही. याकरता ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांनी दुपारच्या जेवणानंतर नियमित किमान चार केळी खाल्ल्या पाहिजेत. जेवणानंतर केळी खाल्ल्यामुळे केळीचे लाभ शरीराला मिळतात व शरीराला केळीचे पोषण मिळते व हाडांची बळकटी होऊन वजन वाढण्यासाठी फायदा होतो.
चटका बसल्यावर किंवा भाजल्यास केळीचा उपयोग

अनेक वेळा स्वयंपाक करताना किंवा काही तळताना भाजताना किंवा आगीजवळ व गरम तापमान असलेल्या जागेजवळ काही काम करताना तेल अंगावर उडते त्यामुळे चटका बसुन भाजते, फोड येतात किंवा बर्याचदा अनावधानाने तव्याचा चटका बसतो.तसेव एखाद्या वेळेस ऊन्हाळ्यात देखीप उन्हाचा तीव्र चटका बसुन अंगाची लाहीलाही होते. अशावेळी केळी कुस्करुन केळीच्या गरामध्ये थोडे पाणी टाकुन पातळ पेस्ट बनवावी ज्या जागेवर आपल्याला चटका बसला आहे किंवा आग होत आहे त्या ठिकाणी केळीचा लेप एकसारखा हाताने लावल्यास थंडावा मिळतो. केळी खुप थंड असते त्यामुळे त्वचेचे व चटका लागलेल्या जागेचे तापमान लवकर थंड करते व भाजल्यास व पोळल्यास केळीची पेस्ट लावल्यास लागलीच आराम मिळतो. तसेच पेंन रिलिविंग म्हणून देखील केळी काम करते.
स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्यांकरता उपाय –

केळी हे उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे तसेच केळी मध्ये उष्मांकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ज्या स्त्रियांना वेळेवर व नियमित मासिक पाळी येत नाही तसेच मासिक पाळीसंबंधी इतर काही समस्या आहेत, अशा महिलांनी नियमित दररोज एका केळीचे सेवन केले पाहिजे. केळी खाल्ल्यामुळे स्त्रियांचे मासिक चक्र सुरळित होते व हार्मोन्सचे संतुलन चांगले राहते ज्यामुळे मासिक पाळी नियमित येते व मासिक पाळी संबंधीच्या सर्व समस्या देखील दूर होतात. मासिक पाळीतील पोटदुखीच्या त्रासाकरता केळी खाल्ल्याने आराम मिळतो. मासिक पाळीच्या अनेक समस्यांमध्ये पूरातन काळापासुन केळीच्या फुलाची भाजी खाण्याचा सल्ला आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे.
लहान मुलांमधील डायरीया व जुलाबावर उपाय –

बरेचदा लहान मुलांना जुलाब लागतात व त्यामुळे लहान मुलांमध्ये शरीरातील सर्व पाणी निघून जाते व मुले कोरडी पडतात. याकरता केरळचे केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. केरळची केळी आकाराने अगदी छोटीशी असतात, मात्र त्यांचा प्रभाव जुलाबावर लगेच उपाय करतो. लहान मुलांना केरळची केळी खाऊ घातल्यामुळे लहान मुलांमधील जुलाब लगेच नियंत्रणात येतात व थांबतात तसेच लहान मुलांची तब्येत सुधारते. केळी खाल्ल्यामुळे शरीरातील थकवा निघून जातो आणि आजारातून लवकर बरे होता येते.
मोठ्या माणसांमधील जुलाबावर उपाय

मोठ्या माणसांमध्ये जुलाबाचे प्रमाण वाढले असेल तर केळीचा उपाय केला जातो. जास्त जुलाब होत असतील तर त्याकरता दह्यासोबत केळी कुस्करून खाऊ घालावी यामुळे जुलाब लागलीच थांबतात व जुलाबामुळे आलेला शरीराचा थकवा निघुन जातो तसेच अशक्तपणा दूर होतो व पेशंट लवकर स्टेबल होतो. जुलाब होत असल्यास भातासोबत केळीचे सेवन केल्यामुळे देखील जास्त प्रमाणात जुलाब लागणे किंवा डायरियामध्ये लागलीच आराम मिळतो व जुलाब लगेच थांबतात.
अपचनाकरता केळीचा उपाय

बरेचदा जास्त प्रमाणात मसालेदार जेवन करणे, विपरीत आहार किंवा विषम आहार घेतल्यामुळे किंवा रात्री जागरणं केल्यामुळे आणि शरीराला आवश्यक असलेली पुरेशी झोप व विश्रांती न घेतल्यामुळे पचनक्रियेमध्ये समस्या निर्माण होते व अन्न पचनाचा वेग मंदावतो व अपचनाचा त्रास होतो. अपचनाचा त्रास झाल्यास करपट, आंबट ढेकर येणे, डोके जड होणे, डोके दुखणे, पोट फुगुन येणे व गॅस जास्त प्रमाणात होणे यासारखे त्रास होऊ लागतात. अपचन झाल्यास केळी सोबत सैंधव म्हणजेच काळेमीठ सेवन केल्यास अपचनाचा त्रास लगेच दूर होतो.
पित्ताच्या समस्येवर केळीचा उपाय

काही लोकांना वारंवार पित्त होत असते. पित्तामध्ये उलट्या होणे, छातीत जळजळ होणे, पोटात चमका येणे, घशात पित्त येणे असे अनेक प्रकारचे त्रास होत असतात. अशा लोकांना पित्ताच्या समस्येपासून सुटका मिळण्याकरता शुद्ध गाईच्या तुपासोबत केळी खाण्यास द्यावा यामुळे पित्ताच्या समस्यांमध्ये लागलीच आराम मिळतो.
मानसिक आजारांवर उपाय –

मानसिक आजारांमध्ये व्यक्तीची झोप पुरेशी होत नाही व व्यक्ती निराशेच्या गर्तेत जाते. याकरता व्यक्तीच्या मेंदूला पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक असते तसेच मेंदुला शांतता देण्याच्या कामात केळीचा उपयोग केला जातो. मधासोबत केळी खाऊ घातल्यास मानसिक थकवा निघून जातो व नैराश्य असलेल्या पेशंटला उत्साह स्फुर्ती व चैतन्य निर्माण होते. मानसिक आराम मिळतो व उत्साह संचारतो. केळी सोबत मध खाल्ल्यामुळे नैराश्य निघून जाते व अशाच प्रकारच्या अनेक मानसिक आजारांमध्ये देखील केळीचे सेवन केल्यामुळे मानसिक आजारांवर ती प्रभावी उपचार होतो. केळीमध्ये असलेले पोटॅशियम मानसिक ताणतणाव कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे मानसिक थकवा निघून जातो व व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य सुधारते.
मेंदूचा विकास होण्यासाठी केळीचा उपयोग

केळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शिअम व फॉस्फरस असल्यामुळे मेंदूचा विकास होण्यासाठी केळीचे सेवन करणे उपयोगी ठरते. लहान मुलांना नियमित केळी खाऊ घातल्यास त्यांच्या मेंदुचा विकास चांगला होतो व बुद्धी चाणाक्ष होते.
अनिद्राच्या समस्येवर केळीचा उपाय –

बऱ्याच लोकांना रात्री लवकर झोप लागत नाही किंवा कायम अनिद्रेची समस्या असते. झोप चांगली लागली तर आपले आरोग्य चांगले राहते व झोपेचा खेळखंडोबा झाला तर त्याचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. याकरता चांगली झोप मिळावी म्हणून आपण बऱ्याच औषधे व गोळ्या खात असतो मात्र चांगली झोप लागण्याकरता देखील केळीचा उपाय करता येतो. केळी कुस्करून केळीवर दालचिनीची पावडर टाकून केळी खाल्ल्यावर लवकर झोप लागते व शांत झोप लागते.
वजन कमी करण्यासाठी उपाय

ज्याप्रमाणे वजन वाढण्यासाठी देखील कळीचा उपाय होतो त्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी केळीचा उपयोग होतो. याकरता आपण जेव्हा केळी खाणार आहात त्या वेळेस गरम पाणी सोबत प्यावे. यामुळे मेटॅबॉलिझम सुधारतो व वजन कमी होऊन चरबी घटते. वजन कमी करण्यासाठी गरम पाणी व केळी नियमित खाल्ल्यामुळे फायदा होतो.
हाय बी.पी, डायबेटिस, हृदयविकारावर उपयोग-

केळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, विटामिन ए, विटामीन बी,विटामीन सी, विटामीन डी असल्यामुळे तसेच केळी हे लो कॅलरी फूड असल्यामुळे केळीतील या पोषक घटकांमुळे रक्त पातळ होते व रक्त प्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल होते, केळीमुळे बॅड कोलेस्टेरॉल वाढण्यापासून रोखता येते. केळीच्या सेवनामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात राहते ज्यामुळे ह्रदयरोगाचा धोका कमी होतो. तसेच केळीमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते,त्यामुळे डायबेटीसच्या रुग्णांनादेखील डायबेटिस आटोक्यात आणता येतो.
एनर्जी फुड –

केळी हे लो कॅलरी फुड असल्यामुळे भूक भागवण्यासाठी व त्वरित ऊर्जा मिळण्याकरता केळीचे सेवन केले जाते. केळीमध्ये भरपूर उष्मांक असतात. त्यामुळे केळी खाल्ल्यावर पोट लगेच भरते. क्रिकेट सामन्यांच्या मधल्या ब्रेकमध्ये आपण बघितले असेल बरेच क्रिकेटवर या ब्रेकमध्ये केळी खाणे पसंत करतात. कारण केळी खाल्ल्यामुळे पुढच्या 90 मिनिटा करता इन्स्टंट एनर्जी मिळत असते.
केळी खाण्याची योग्य वेळ
आपण केळी जेवणानंतर खाऊ शकतात किंवा जर आपण सकाळी ब्रेकफास्टमध्ये केळी खाणार असाल किंवा बनाना शेक घेणार असाल तर उपाशी पोटी कधीही केळीचे सेवन करू नये. केळी खाण्याअगोदर आपल्या पोटात काहीतरी अन्न गेले पाहिजे हे लक्षात ठेवावे. उपाशीपोटी केळी खाणे चुकीचे असते. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या जास्त जटिल होतात.
सारांश
या लेखातून आपण केळीचे गुणकारी व आरोग्यदायी फायदे याबद्दल माहिती घेतली. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस यासारखी खनिजे असतात. तसेच विटामीन ए,बी,सी,डी असलेली केळी ही अगदी स्वस्त व बाजारात वर्षभर सहजपणे उपलब्ध होते. नियमित केळीचे सेवन केल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.
हाडांचा ठिसूळपणा, मलावरोध, बद्धकोष्ठता, वजन वाढविण्याच्यासाठी केळीचे उपाय, मूत्रपिंडाचे आजार, भाजल्यास-पोळल्यास उपाय, स्त्रियांच्या मासिक पाळीसंबंधी विकारांमध्ये उपाय’ लहान मुलांमधील डायरिया, जिम प्रेमींकरता केळीच्या सेवनाचे महत्व, पित्ताचा त्रासाकरता केळीचा उपाय, चांगली झोप लागण्यासाठी केळीचे सेवन, हृदयविकार,ब्लडप्रेशर डायबिटीसमध्ये केळीचा उपयोग, मानसिक आजारांमध्ये केळीचा होणारा फायदा, तसेच वजन कमी करण्यासाठी केळीचे सेवन कशा प्रकारे करायचे याबद्दल आपण या लेखातून माहिती घेतली.
हे हि वाचा :
जेष्ठमधाचे आयुर्वेदिक फायदे – 10 Healthy Benefits Of Jeshthamadh In Marathi
मधुमेह म्हणजे काय? मधुमेह लक्षणे आणि आयुर्वेदिक उपचार !
सांधेदुखी म्हणजे काय? सांधेदुखीची कारणे, लक्षणे आणि उपाय !
Very Informative article