चुकूनही फ्रीजमध्ये हे ठेवू नका, तब्येत बिघडू शकते कायमची!

ह्या गोष्टी विसरूनही फ्रीजमध्ये ठेवू नका, तब्येत बिघडू शकते. फ्रीजमध्ये कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही तुम्हाला अशाच गोष्टी सांगत आहोत, ज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने आरोग्य कायमचं बिघडायला लागतं.

या गोष्टी विसरूनही फ्रीजमध्ये ठेवू नका, तब्येत बिघडू शकते. किंवा हळुहळू बिघडायला लागते.

मित्रांनो भाज्या किंवा फळं अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खराब होण्याच्या भीतीने आपण फ्रीजमध्ये ठेवतो. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात जेव्हा गोष्टी लवकर खराब होतात तेव्हा लोकांचे हात फ्रिजकडे वळतात. लोकांचे फ्रीज सामानाने भरलेले असतात. काही फळं आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकतात, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत, पण तरीही आपण त्या ठेवतो. याचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. याशिवाय अशा अनेक पदार्थांची चवही बिघडते. फ्रीजमध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत ते आपल्याला माहीत असायला हवं.

टोमॅटो ठेवायचे का?

टोमॅटो बहुतेक घरांमध्ये प्रत्येक भाजीमध्ये असतोच. आणि लगेच फ्रीजमध्ये जातो. स्वस्त असतील तर लोक टोमॅटो मोठ्या प्रमाणात आणतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात. पण टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने चव खराब होते. अनेक वेळा फ्रीजच्या थंड हवेमुळे टोमॅटो आतून सडू लागतात. अशा वेळी काही लोकांना टोमॅटो खराब झालाय हे माहितीच नसतं आणि ते खातात. याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

केळी ठेवू का?

फ्रिजमध्ये कोणती फळं आणि भाज्या ठेवाव्यात आणि कोणत्या नाहीत हे अनेकांना समजत नाही. अशा परिस्थितीत काही लोक केळी सुद्धा फ्रीजमध्ये ठेवतात. त्यामुळे केळी लवकर वितळतात आणि काळी पडतात. फ्रीजमध्ये ठेवलेली केळी खाल्ल्याने तुमचं आरोग्यही बिघडू शकतं. केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने सोबत ची इतर फळं आणि भाज्याही खराब होऊ शकतात. त्यामुळे केळी फ्रीजमध्ये ठेवू नयेत.

टरबूज आणि खरबूज

अनेकांना एकाच वेळी टरबूज आणि खरबूज यांचा पुरेपूर वापर करता येत नाही. अशा स्थितीत चिरलेली फळे फ्रीजमध्ये ठेवतात. पण तुम्ही ही चूक करू नका. कापलेली फळं टरबूज आणि खरबूज कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. यामुळे फळांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात. त्याच वेळी, त्यांची चव देखील बदलते. जेव्हा फळं खायची असतील तेव्हा त्यांना थंड करण्यासाठी अगदी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. नाहीतर दिवसरात्र नकोच.

ब्रेड फ्रीजमध्ये ठेवू का?

बर्‍याचदा ब्रेडचे मोठे पॅकेट लोकांच्या घरात येते जे फ्रीजमध्ये ठेवले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की फ्रिजमध्ये ठेवलेले ब्रेड जास्त वेळाने खाल्ल्याने तुमचं आरोग्य बिघडतं. तसेच ब्रेड लवकर सुकतात

बटाटा, कांदा आणि लसूण

बरेच लोक बटाटे इतर भाज्या फ्रीजमध्ये ठेवतात. अशा वेळी फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे डायबिटिसच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकतात. बटाट्याचा स्टार्च गोठवून साखरेत बदलतो. बटाटे फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी कागदी पिशवीत ठेवून मोकळ्या जागी ठेवा. याशिवाय कांदा आणि लसूण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर गोष्टी खराब होतात. फ्रिजला वास येतो.

मध कुठे ठेवायचा?

तुम्ही पदार्थांमध्ये आणि औषध म्हणून मधाचा वापर केला असेल. खूप कमी लोक रोज मध वापरतात. मग अशा वेळी अनेकजण खराब होण्याच्या भीतीने फ्रीजमध्ये मध साठवून ठेवतात. पण असं करु नका हे चुकीचं आहे. मध फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रीजमध्ये ठेवल्याने मधात क्रिस्टल्स तयार होतात. असा मध खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला फायद्याऐवजी तोटाच होतो.

.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories