डायबिटीस टीप्स! बापरे टाइप 2 डायबिटीसमध्ये शरीराला होऊ शकतात हे 5 त्रास, तज्ज्ञांकडून जाणून घ्या ह्यावरचे महत्वाचे उपाय.

टाइप 2 डायबिटिसमध्ये, जर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला नाही, तर तुम्हाला त्यामुळे होणारे त्रास टाळणं कठीण होईल.

मधुमेह म्हणजेच डायबिटिस हा एक असा आजार आहे ज्यामध्ये रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने त्रास होतो. पण त्याचवेळी त्यांच्या आवडीचे जेवण न खाता येणं हा त्यांच्यासाठी मोठा शाप ठरतो. पण घाबरु नका तुम्ही एकटे नाही आहात बऱ्याच लोकांना डायबिटिसमुळे दररोज लहान मोठया समस्यांना सामोरं जावं लागतच. 

डॉक्टर सांगतात की जर तुम्ही रक्तातील साखरेची वाढती पातळी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला नाही तर तुम्हाला नंतर खूप समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. पण आपण व्यायाम किंवा औषधांद्वारे आपल्या साखरेची पातळी नियमितपणे नियंत्रित करू शकता. हे सहज शक्य आहे.

पण मधुमेहामुळे तुमच्या शरीरात काही शारीरिक परिस्थिती उद्भवू शकते का? हो! कारण जर तुम्हाला डायबिटिस असेल आणि तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवत नसाल, तर तुम्हाला खालील लहान मोठ्या त्रासांना सामोरं जावं लागू शकतं. चला ह्याची सविस्तर माहिती घेऊया.

- Advertisement -

1. हायपोग्लाइसेमिया

3 12

हे थांबवणं अवघड आहे, जोपर्यंत तुमच्यासोबत डायबिटिस आहे, तोपर्यंत तुम्हाला हा त्रास सहन करावाच लागेल. हायपोग्लाइसेमिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी दिवसभर बदलते. जर साखरेची पातळी खूप कमी झाली तर तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्याची लक्षणे म्हणजे चिंता, भूक न लागणे, घाम येणे, डोकेदुखी इ. असतात.

ह्यावर उपचार काय आहे:

जेव्हा जेव्हा साखरेची पातळी अधिक कमी होते तेव्हा 15 ग्रॅम कार्बोहायड्रेटचे सेवन करा आणि 15 मिनिटांनी शुगर तपासा. साखरेची पातळी अजूनही कमी असल्यास, तीच प्रक्रिया पुन्हा करा.

2. हायपर ऑस्मोलर हायपरग्लाइसेमिक स्टेट

6 9

ही स्थिती फार कमी लोकांमध्ये दिसून येते आणि वृद्ध किंवा अधिक आजारी लोकांमध्ये ती अधिक आढळते. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त असते तेव्हा ही स्थिती उद्भवते. पण त्यात केटोन्स आढळत नाहीत. यामुळे तुमची दृष्टी कमकुवत होऊ शकते, अधिक गोंधळ होऊ शकतो, अधिक तहान लागू शकते.

- Advertisement -

ह्यावर उपचार काय आहे:

ही स्थिती टाळण्यासाठी, आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे निरीक्षण करत रहा. ही स्थिती लक्षात येताच, आपल्या डॉक्टरांना सांगा आणि उपचार सुरू करणे खूप महत्वाचे आहे.

 3. हायपरग्लेसेमिया

5 10

ही स्थिती हायपोग्लाइसेमिया स्थितीच्या विरुद्ध आहे. यामध्ये तुमच्या रक्तातील साखर खूप वाढते. एवढच नाही तर तुम्हाला जास्त तहान लागते, तुम्हाला वारंवार टॉयलेटला जावं लागतं, तुमच्या लघवीतही भरपूर साखर असते. जर तुम्हाला या स्थितीचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही घरच्या घरी युरीन टेस्ट किट आणू शकता.

काय उपचार करावा:

- Advertisement -

तुमच्या लघवीच्या टेस्टमध्ये केटोन्स आढळल्यास, तुम्ही व्यायाम करणे थांबवां. ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. याशिवाय तुमच्या डॉक्टरांकडून रक्तातील साखर कमी करण्याच्या टिप्स घ्या.

4. उच्च रक्तदाब / हाय बीपी

7 7

उच्च रक्तदाब देखील टाइप 2 डायबिटिस शी संबंधित आहे. डायबिटीस च्या रूग्णांनीही त्यांची बीपी पातळी नियमितपणे तपासत राहावी. यामुळे हृदयविकाराचा झटका, दृष्टी समस्या, पक्षाघात यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

ह्यावर काय आहे उपचार

जर तुमचा रक्तदाब वाढला असेल तर मिठाचे सेवन पूर्णपणे कमी करा. व्यायाम नियमित केला पाहिजे आणि ताण तणावही कमी झाला पाहिजे.

5. डायबेटिक न्यूरोपॅथी

8 4

या स्थितीला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हणतात. डायबिटीस दरम्यान ही सर्वात सामान्य समस्या आहे. जर तुमच्या नसांना डायबिटिसमुळे परीणाम झाला असेल तर अंगदुखी, डोळ्याचे त्रास, जुलाब आणि एकंदर असंतुलन सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन आणि स्त्रियांमध्ये योनीमार्गात कोरडेपणा यासारख्या परिस्थिती देखील सामान्य आहेत.

तर लोकहो, टाईप 2 डायबिटिसमुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, किडनीचं नुकसान आणि मानसिक दुर्बलता यासारख्या परिस्थिती देखील ओढवू शकतात, ज्या जीवघेण्या असू शकतात. आपली काळजी घ्या.

जर तुम्हाला हा लेख माहितीपूर्ण वाटला असेल तर हि माहिती आपल्या प्रियजनांसोबत शेयर करायला विसरू नका आणि आरोग्यविषयक माहितीसाठी आमचे फेसबुक पेज मराठी हेल्थ ब्लॉग ला लाईक करायला विसरू नका !

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories