दूध आणि अंडं! दुधात कच्चं अंडं मिसळून पिण्याचे 5 फायदे, जाणून घ्या कुस्तीपटू आणि बॉडी बिल्डर दुधात कच्ची अंडी घालून का पितात?

- Advertisement -

कच्चं अंडं दुधात मिसळून प्यायल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया कच्चं अंडं दुधात मिसळून प्यायल्याने होणारे काही फायदे.

बरेच लोक सकाळी दुधात कच्चं अंडं मिसळून पितात. कच्ची अंडी पाश्चराइज्ड असतील तर दुधासोबत घेणे सुरक्षित आहे असं डॉक्टर सांगतात. त्यामुळे अशा प्रकारे दुध आणि अंडी प्यायल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होऊ शकतात.  दुधात कच्चे अंडे मिसळून प्यायल्याने तुमच्या शरीराला पेशींच्या निर्मितीमध्ये फायदा होतो. तसेच हे दोन्ही एकत्र उर्जेचे पॉवर हाऊस मानले जातात.

जर तुम्हाला सकाळी न्याहारीमध्ये प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा असेल तर हे तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतं. तसच कच्चं अंडं दुधात मिसळून प्यायल्याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच, त्याचे इतरही अनेक फायदे होऊ शकतात. जाणून घेऊया दुधात कच्चं अंडं मिसळून पिण्याचे फायदे.

1. स्नायू/मसल्स मजबूत करण्यासाठी उत्तम

दुधात कच्चे अंडे मिसळून प्यायल्याने तुमचे स्नायू मजबूत होतात. वास्तविक, अंडी आणि दूध प्रोटीन्सचे चांगले स्रोत मानले जातात. अंड्याचा पांढरा भाग अल्ब्युमिन नावाच्या प्रथिनाने समृद्ध आहे, जे आपल्या शरीरात प्रथिने शोषून घ्यायला प्रोत्साहन देते. यामुळे तुमचे स्नायू किंवा मसल वाढतात. जर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने मसल बनवायचे असतील तर दुधात कच्ची अंडी मिसळून मिश्रण प्या. अनेक कुस्तीपटू आणि बॉडी बिल्डर्स कच्ची अंडी आणि दूध पीत आहेत.

- Advertisement -

 2. वजन संतुलित राहील

वजन संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही कच्चं अंडं दुधात मिसळून पिऊ शकता. हाय प्रोटीनयुक्त आहार घेतल्यास, तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. यासोबतच तुमच्या शरीरातील रक्तातील साखरही नियंत्रणात राहते. अंडी आणि दूध तुमच्या शरीराला ऊर्जा देतात. भूक शमवण्यासाठी हे उपयुक्त आहे.  दुधासोबत कच्चं अंडं खाणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.

3. मूड चांगला राहतो

दुधात कच्चं अंडं मिसळून प्यायल्याने तुमचा मूडही सुधारू शकतो. त्यात व्हिटॅमिन बी12 असतं, जे तुमचा मूड उत्तेजित करते. याशिवाय गावठी अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी6, फोलेट सारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात, जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले असतात. मूड चांगला राहतो.

4. डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी

कच्चं अंडं आणि दूधही डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं.  NCBI वर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार डोळ्यांसाठी झिंक पुरेसं आहे. दुधात झिंक मुबलक प्रमाणात असतं.  त्याच वेळी, अंडी तुमचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहेत. त्यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन आहे जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नियमित अंड्यासोबत दूध प्यायल्याने डोळे निरोगी राहू शकतात.

5. केसांसाठी फायदेशीर

केसांसाठी कच्चं अंडं आणि दूध देखील खूप फायदेशीर ठरू शकतं. खरे तर केस हे प्रोटीन्सचे बनलेले असतात. अंडी आणि दूध हा प्रथिनयुक्त आहार आहे. अशावेळी तुम्ही हे मिश्रण खाऊ शकता.  याशिवाय अंडी आणि दूध हे बायोटिन, व्हिटॅमिन बी 12 आणि पॅन्टोथेनिक ऍसिडचे चांगले स्रोत आहेत, जे केस गळती थांबवायला मदत करतात. याशिवाय पांढऱ्या केसांचा त्रास दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय नियमित करू शकता.

- Advertisement -

लक्षात ठेवा की,

  • कच्ची अंडी आणि दूध देखील आरोग्यासाठी अपायकारक असू शकतात.
  • पाश्चराइज्ड अंडी आणि अंडी उत्पादने खरेदी करा, जी, काही सुपरमार्केटमध्ये उपलब्ध असतात.
  • अंडी तुमच्या घरात फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवल्याने त्यात हानिकारक जीवाणूंची वाढ होऊ शकते.

तर हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. जर तुम्ही एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असाल तर अंडी उकडून खा. पोटाशी संबंधित त्रास असल्यास कच्ची अंडी खाऊ नका. यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories