Ear, Nose, Throat म्हणजेच ENT. ईएनटी इन्फेक्शन ( ENT infection) म्हणजे कान, नाक आणि घसा दुखतो. आपण बऱ्याचदा हा शब्द ऐकतो आणि ह्या उपचार पद्धती विषयी माहीती शोधतो. आजच्या लेखात
ईएनटी इन्फेक्शन उपचारांविषयी महत्वाची माहिती आपण घेऊया.
आपले सर्व मानवी शरीरातील अवयव एकमेकांना जोडलेले असल्याने जेव्हा एक अवयव दुखत असतो तेव्हा त्याचा परिणाम दुसऱ्या अवयवावर होतोच. कान, नाक आणि घसा हे अवयव एकमेकांना पूरक आहेत. म्हणून जेव्हा घसा दुखतो तेव्हाच कान दुखी सुरू होते आणि नाक सर्दीने दुखून वाहू लागते. काही लोकांच्या बाबतीत हे वर्षभर सूरू असतं. लोक वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात आणि उपचार करतात. पण ह्यासाठी काही खास डॉक्टर असतात.
पण त्यासाठी आधी आपण ईएनटी इन्फेक्शन ची लक्षणे समजून घेऊ
ईएनटी इन्फेक्शन (ENT Infection) ची लक्षणे (ENT symptoms)
कान दुखी

कानाची निगा न ठेवल्याने, कान स्वच्छ न ठेवल्याने कान दुखी वाढते. ह्यात कानातून पांढरे पाणी येणे, कमी ऐकू येणे, आणि ह्यारसारखी अनेक दुखणी उद्भवतात. कानातून पाणी येणे ह्या प्रकारात कानात जंतू संसर्ग होतो. कान लाल होतो आणि खाज येते. ईएनटी इन्फेक्शन जो कानात जंतू संसर्ग झाल्याने होतो. त्यामुळे कान दुखतो आणि क्वचित ताप येतो.
ही लक्षणे असतील तर बरी होतील. शक्यतो कान दुखी ही गंभीर समस्या बनत नाही. आपला कान साफ करायला त्यातला मळ काढायला माचिस ची काडी, सेफ्टीपिन वापरू नका. हळूवार पणाने आठवड्यातून एकदा कापसाचे बड घालून कान स्वच्छ करा.
नाकाची समस्या

पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सर्दी होते. ती सासंर्गिक असते. दुषित पाणी, हवा, लोकांचा संपर्क ह्यामुळे अशी सर्दी होते आणि नाकात शेंबूड जमा होतो, नाक वाहते. ही सर्दी उपायांनी बरी होते. पण कधीकधी सर्दी बरीच होत नाही. इम्यूनिटी कमी होते आणि सर्दी वाढते. जी सायनस च रूप घेते. ह्यामध्ये सर्दी सोबत डोकेदुखी, कोरडा खोकला,दात दुखी, आणि घसा दुखतो. पोटात गडबड आणि जीव घाबरतो.
घसा दुखी :

घसा दुखणे, टॉन्सिल्स वाढणे, आवाज बसणे, घशात खवखव ही घसा दुखण्याची सामान्य लक्षणे आहेत. जी हवेतील बदलांमुळे होतात. ती साध्या उपचारांनी बरी होतात. पण जेव्हा कान किंवा नाकात इन्फेक्शन होऊन दुखू लागतं तेव्हा घसा पण दुखू लागतो. दात दुखतात. तोंडात लहान फोड येतात. अशी लक्षणे आढळतात.
तर व्हायरल इन्फेक्शनमुळे कान, नाक आणि घशाच्या समस्या उद्भवतात. नाक दुखले की कान आणि घसा दुखतो. आणि सर्वात जास्त लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कान, नाक आणि घसा तीनही अवयवांचा उपचार एकच डॉक्टर करत असतो.
हवामान, धूळ आणि धूर यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागत असल्यानेच आणि आपल्या आजूबाजूचे जीवाणू लगेच संसर्ग करतात आणि कान, नाक, घसा एकत्र ह्यात अडकतात.
असं असलं तरी, सहसा आठवड्यातून त्यांच्या ईएनटीचा संसर्ग (ENT Infection) आपोआप साध्या उपचारांनी बरा होतो, पण जर बरा होत नसेल तर आपल्याला आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधण्याची आवश्यकता आहे.
ईएनटी संसर्ग टाळण्याचे मार्ग (Prevent ENT Infection)

- जर आपण पोहत असाल तर, आपल्या कानात सूती बोळे घालून ठेवा, जे खोल पाण्यात आपल्या कानात पाणी जाऊ देत नाहीत आणि आपल्याला भविष्यात कानाच्या कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
- तसचं किरकोळ रोग टाळण्यासाठी, आपली प्रतिकारशक्ती सुधारणे फार महत्वाचे आहे, म्हणून अशा परिस्थितीत रोग प्रतिकारशक्ती वाढविणार्या अन्नाला अधिक प्राधान्य द्या. पौष्टीक आणि चौरस आहार घ्या.
- आपल्या नाकात, घशात आणि कानात कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ देऊ नका कारण वर सांगितल्याप्रमाणे, जर तीनही अवयवांपैकी कोणत्याही एकामध्ये इन्फेक्शन असल्यास, उर्वरित अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
- जर सर्दी आणि खोकला बराच काळ टिकत असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण दीर्घ खोकला आणि आजारपण हा इतर कोणत्याही आजाराचे लक्षण असू शकतो.