हिंग आणि देशी तूपाचं मिश्रण आरोग्यासाठी आहे खूप फायदेशीर, आयुर्वेदाचार्यांकडून जाणून घ्या कसे वापरावे.

हिंग आणि तुपाचं सेवन केल्याने पोटाच्या समस्या आणि डोकेदुखीमध्ये खूप आराम मिळतो. याव्यतिरिक्त, हे लहान मुलांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. चला वाचूया ह्याचे फायदे आणि खाताना घ्यायची काळजी.

कोणताही पदार्थ हिंगाच्या फोडणीशिवाय अपूर्ण आहे. आणि भारतीय जेवणात तुपाचं महत्व जास्त आहे. हिंग आणि तुपाचे अनेक फायदे आहेत. तुपाचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत.

पण हिंग आणि तुपाच्या मिश्रणात अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. हिंगामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, रिबोफ्लेविन आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. याशिवाय प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट्सही यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात.

यासोबतच देशी तुपात व्हिटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. त्यात ब्युटीरिक ॲसिड सुध्दा आहे.  हिंग आणि तुपाच्या मिश्रणाने अपचन, गॅस आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. याशिवाय डोकेदुखी आणि गुडघेदुखीमध्ये हिंग आणि तूप यांचे मिश्रण खूप फायदेशीर आहे. तुम्ही हे अनेक प्रकारे वापरू शकता. हे मिश्रण वापरण्यात कोणताही अपाय नाही. तसेच तुम्ही ते कधीही वापरू शकता. 

- Advertisement -

1. पोटाच्या त्रासामध्ये

3 32

हिंग आणि देशी तूप या दोन्हीच्या वापरामुळे पोटाशी संबंधित समस्यांमध्ये खूप आराम मिळतो. यामध्ये भरपूर फायबर असतं, जे अन्न पचन, अपचन, गॅस आणि दुखण्यात खूप आराम देते. ह्या मिश्रणाचं सेवन केल्याने पोटदुखीवर लवकर आराम मिळतो.

2. रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

4 32

हिंग आणि तुपात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्याच्या मदतीने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ह्या औषधाच्या मदतीने हिवाळ्यात खोकला आणि सर्दीशी लढण्यास मदत होते. हे औषध अनेक प्रकारे सेवन केलं जाऊ शकतं.

3. डोकेदुखीमध्ये गुणकारी

5 33

डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या या समस्यांवरही हिंग आणि तुपाचे फायदे आहेत. यात अँटिऑक्सिडंट आणि अनेक गुणधर्म आहेत, जे मेंदूच्या रक्तवाहिन्या शांत करतात आणि डोकेदुखीपासून आराम देतात.

4. लहान मुलांना पोटात जंत होण्याच्या समस्येवर

6 32

लहान मुलांना पोटात जंत किंवा पोटात दुखत असेल तरीही तुम्ही हिंग आणि तूपाचं मिश्रण पिण्यासाठी देऊ शकता. त्यामुळे पोटातील जंत मलमार्गे सहज बाहेर पडतात. यासोबतच लहान मुलांना पोटदुखीमध्येही खूप आराम मिळतो.

- Advertisement -

5. हाडं बळकट करा

7 28

हिंग आणि तूप देखील हाडांच्या मजबुतीसाठी खूप चांगले मानले जाते. हिंग आणि तुपात कॅल्शियम आहे, जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. यामुळे हाडांमधील घर्षणही कमी होते.

हिंग आणि तूप कसं वापरावं

8 22
  • तुम्ही हिंग आणि तूपाचं मिश्रण बनवून रिकाम्या पोटी खाऊ शकता. त्यामुळे पोटात कृमींचा त्रास होत नाही.
  • सकाळ संध्याकाळ जेवल्यावर हिंग आणि तूप देखील घेऊ शकता. त्यामुळे पोटदुखीवर खूप आराम मिळतो.
  • याशिवाय हिंग, तूप आणि मध यांचं मिश्रण घसादुखीवर फायदेशीर ठरते.
  • रात्री झोपताना हिंग आणि तुपाचे सेवन करू शकता. त्यामुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या तक्रारी कमी होतात.
  • याशिवाय हिंग आणि तूपाचं मिश्रण मुलांच्या नाभीवर लावल्याने गॅसच्या त्रासात खूप आराम मिळतो.

पण हे लक्षात ठेवा.

9 14

हिंग आणि तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु हिंगाचा प्रभाव गरम असल्याने तर जास्त हिंगाचं सेवन करू नये. हिंग आणि तूप यांचे मिश्रण दिवसातून तीन वेळा घ्या.

जर तुम्हाला हींग तुपाच्या सेवनाने कोणतीही ॲलर्जी किंवा समस्या असेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच, जर तुम्ही ह्या मिश्रणाचं जास्त सेवन केलं तर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories