घर म्हटलं की आपण अशी औषधं शोधत असतो जी आपल्याला अचानक काही त्रास सुरु झाला तर असावीत. काळे मीठ, हिंग आणि ओव्याच्या मिश्रणाचे अनेक फायदे आहेत. हे मिश्रण एका डबीत भरून ठेवू शकता. त्याआधी जाणून घ्या ह्याचे 7 औषधी फायदे.
ओवा, काळे मीठ आणि हिंग यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. ओव्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते, जे कोणत्याही प्रकारच्या अपचनाच्या त्रासात आराम देते. हिंगाचे सेवन केल्याने पोटफुगीच्या त्रासापासूनही आराम मिळतो. हिंगामध्ये अँटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-मायक्रोबियल आणि अँटीस्पास्मोडिक सारखे घटक असतात. हिंगाचे सेवन केल्याने तणावही कमी होतो.
पचनाशी संबंधित विकार काळ्या मीठाने दूर होतात. याशिवाय पोटाशी संबंधित कोणत्याही समस्यांपासून सुटका मिळते. पण आपण त्याच्या प्रमाणाची काळजी घेतली पाहिजे. तसं बघायला गेलं तर सहज उपलब्धतेमुळे हा उपाय करायला सोपा आहे. चला तर समजून घेऊया काळे मीठ, हिंग आणि ओव्याचे फायदे आणि औषध म्हणून वापर कसा करायचा.
1. गॅसच्या त्रासावर रामबाण

हिंग, ओवा आणि काळे मीठ यांचे सेवन केल्याने पोटात गॅस झाला असेल तर खूप आराम मिळतो. कारण त्यात अँटीसेप्टिक आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत, ज्यामुळे लवकर आराम मिळतो आणि छातीतली जळजळ सुध्दा कमी होते.
2. पचन संस्था चांगली करा

जर तुम्हाला अन्न सहज पचत नसेल तर तुम्ही सकाळी एक चमचा ओवा, काळे मीठ आणि हिंग यांचे मिश्रण घेऊ शकता. यामुळे अन्न सहज पचते. याव्यतिरिक्त, हे मिश्रण वजन कमी करण्याात देखील मदत करेल.
3. अपचन दूर करा

ओवा, काळे मीठ आणि हिंग यांचे सेवन केल्याने अपचन किंवा आम्लपित्त सुध्दा दूर होते. या तिन्हींच्या मिश्रणाने चयापचय वाढते, त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. यामुळे मासिक पाळीच्या वेदनांमध्येही आराम मिळतो. ह्या मिश्रणाचे रिकाम्या पोटी सेवन करणे आरोग्यासाठी उत्तम उपाय आहे.
4. सर्दी आणि फ्लू पासून मिळवा आराम

सर्दी आणि घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी हिंग, ओवा आणि काळे मीठ यांचे मिश्रण खूप फायदेशीर आहे. काय कराल सर्दी झाली की हे मिश्रण कोमट पाण्यात मिसळून प्या. सर्दीतून लवकर आराम मिळतो.
5. लो बीपी मध्ये आहे फायदेशीर

तुमचं बीपी कमी झालं असेल तर तुम्ही ह्या मिश्रणाचे सेवन करू शकता. हे 4 ग्रॅम मिश्रण कोमट पाण्यात मिसळून सकाळी आणि संध्याकाळी पिऊ शकता. यामुळे लो बीपी नॉर्मल येईल.
काळे मीठ, हिंग आणि ओवा ह्यांचा वापर असा करा.

गॅस किंवा अपचन झाल्यास ह्या मिश्रणाचे सेवन फायदेशीर ठरते. यासाठी 3 ग्रॅम काळे मीठ, चिमूटभर ओवा आणि चिमूटभर हिंग मिसळून सकाळ-संध्याकाळ पाण्यातून घेतल्यास खूप आराम मिळेल.
आम्लपित्त होत असेल तर हे तीन गोष्टीचं मिश्रण थंड पाण्यासोबत सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने खूप फायदा होतो.
कोणत्याही प्रकारची डोकेदुखी असू दे आणि अंगदुखीचा त्रास होत असला तरी ह्या तिन्हींचे मिश्रण सकाळ-संध्याकाळ साध्या पाण्यासोबत घेतल्याने खूप आराम मिळतो.
याशिवाय लिव्हरच्या ताकदीसाठी ओवा, काळे मीठ आणि हिंग यांचे अनेक फायदे आहेत. या तिन्ही गोष्टीच्या मिश्रणाचे समतोल प्रमाणात पाण्यासोबत सेवन करू शकता.
पोटात दुखत असल्यास किंवा गॅस होत असल्यास, पोट फुगत असल्यास नाभीमध्ये काळे मीठ, हिंग आणि ओवा मोहरीच्या तेलात मिसळून लावल्यास पोटातली वेदना लगेच बरी होईल.
तर अशा रीतीने काळे मीठ, ओवा आणि हिंग या नैसर्गिक घरगुती औषधात कोणताही अपाय नाही, परंतु उच्च रक्तदाबाच्या/हाय ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांनी प्रमाणाची पुरेपूर काळजी घ्यावी.
तसेच या मिश्रणाचे सेवन फक्त सकाळी आणि संध्याकाळी करा. हे घरगुती औषधी मिश्रण घरी तयार करण्यासाठी 10 ग्रॅम हिंग, 300 ग्रॅम ओवा आणि 200 ग्रॅम काळे मीठ तयार करून घरी ठेवा. पोटाशी संबंधित सर्व समस्यांवर हा रामबाण उपाय आहे.