फॅटी लिव्हर म्हणजे काय ? लिव्हरला सूज येत असेल तर वेळीच सावध होऊन हे घरगुती उपाय करा.

यकृत (लिव्हर) आपल्या अन्नाचं पचन आणि शरीरातून विष काढून टाकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आजची जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पोटाशी संबंधित समस्या वाढल्या आहेत. एका मद्यपान करणारी व्यक्ती तसेच मद्यपान न करणारी व्यक्ती यांना लिव्हर च्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात.

(Normal Liver Vs Alcoholic Liver) चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे लिव्हरवर परिणाम होतो आणि अनेक समस्या सुरू होतात, यातील एक समस्या म्हणजे लिव्हरला सूज येणे आणि लिव्हर कमकुवत (Moderately Fatty Liver) होणे.

लिव्हर ला सूज येणे (Fatty Liver) ह्यावर जर योग्य वेळी उपचार केला गेला नाही तर तो यकृताच्या कर्करोगात/ लिव्हर कॅन्सर (Liver cancer) मध्ये बदलतो आणि समस्या वाढतात. परंतु असे काही घरगुती उपचार आहेत ज्यांच्या मदतीने लिव्हर ची सूज कमी होऊ शकते आणि लिव्हर मजबूत होईल.

चला लिव्हरला सूज येणे ह्यासाठी असलेल्या घरगुती उपायांबद्दल माहिती घेऊया. (Home remedies for fatty liver)

- Advertisement -

ॲप्पल सायडर व्हिनेगर

2 15

अँप्पल सायडर व्हिनेगर यकृत/लिव्हर चा दाह कमी करायला मदत करतो, खरं तर, लिव्हर भोवती भरपूर प्रमाणात चरबी जमा झाल्यामुळे लिव्हर ला सूज येते (Fatty Acid Liver Disease). ॲप्पल सायडर व्हिनेगर यकृताभोवती जमा होणारी ही चरबी (Fatty Tissue In Liver) कमी करायला मदत करते म्हणून जेवण करण्याच्या अर्ध्या तासापूर्वी, एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा सफरचंदाचे हे ॲप्पल व्हिनेगर प्या. जर त्रास जास्त असेल तर ते दिवसातून दोन वेळा प्यावे लिव्हर चा त्रास बरा होईल.

जांभूळ

3 15

जांभूळ लिव्हर च्या सर्व रोगांमध्ये खूप फायदेशीर आहे आणि जांभूळ खाल्ल्याने लिव्हरची कार्यक्षमता वाढते आणि लिव्हर ला सूज असेल तर जांभळाची पाने बारीक करून त्याचा रस काढून पाण्यात मिसळा आणि प्या. दोनदा घेतल्याने लिव्हर ची सूज आणि वेदना कमी होईल. याशिवाय जांभूळ सेवनाने लिव्हरमधली सूज देखील कमी होते.

जेष्ठमध/ मुलेठी

4 15

जेष्ठमध किंवा मुलेठी ही एक प्रकारची वनस्पती आहे, ज्याची मुळे गोड असतात. जेष्ठमधा च्या मुळांमध्ये सर्व औषधी गुणधर्म आहेत, म्हणून आयुर्वेदात तो अगदी पूर्वीपासून वापरला जात आहे, लिव्हर ला सूज आल्यास, जेष्ठमधा ची कोरडी मूळे बारीक करा आणि पावडर बनवा. उकळत्या पाण्यात एक चमचा जेष्ठमध पावडर घाला आणि थोडावेळ शिजू द्या.जेव्हा हे मिश्रण तीन-चतुर्थांश राहील, तेव्हा ते कोमट करून प्या. लिव्हरला सूज आली असेल तर ती कमी होईल.

गाजर आणि पालकाचा रस-

5 14

लिव्हर च्या बाबतीत गाजर आणि पालकाचा रस देखील फायदेशीर आहे, म्हणून काही पालक पाने आणि गाजर कापून 15 मिनिटे पाण्यात भिजवा. आणि मग त्याचा रस बनवा आणि प्या. पोटाच्या सर्व समस्याही ह्या रसामुळे बऱ्या होतात, पालकाच्या रसामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि अशक्तपणासारखे आजार दूर ठेवले जातात. गाजराचा रस डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे.

- Advertisement -

ग्रीन टी –

6 14

ग्रीन टी मुळे यकृतातील/ लिव्हर च्या सर्व समस्या दूर होतात. ग्रीन टी पिणे यकृतातील/ लिव्हर ला सूज येणे ह्यांवर आणि वेदनांमध्ये फायदेशीर आहे कारण त्यात असे बरेच अँटीऑक्सिडेंट्स आहेत जे लिव्हर आणि शरीराची चयापचय शक्ती वाढवतात पण लक्षात ठेवा की, ग्रीन टी अति पिणे चांगलं नाही आणि त्याने आम्लपित्त होऊ शकतं म्हणून दिवसातून सतत दोन ते तीन वेळा ग्रीन टी पिऊ नका.

वरील घरगुती उपाय सातत्याने केल्यावर लिव्हर ला आलेली सूज कमी होते आणि निरोगी आयुष्य मिळतं.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories