दात दुखीवर घरगुती उपाय – 10 Natural Home Remedies For Teeth Pain In Marathi

- Advertisement -

दात दुखीवर घरगुती उपाय – आपली सुंदर स्माईल ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते आपले चमकदार पांढरे, निरोगी दात हे चांगल्या आरोग्याची पहिली निशाणी समजली जाते.

बरेचदा अनेक लोकांना दातांचे आरोग्य जपण्याचे व दात मजबूत राहण्यासाठी दातांची निगा कशी ठेवावी हे माहितच नसते! दात घासण्याचे अजब  गजब प्रकार पाहुन हसु ही आवरत नाही आणि चिंता देखील वाटते.

- Advertisement -
दात दुखीवर घरगुती उपाय

आजकाल काही लोकांचे 38- 39 वर्षाच्या वयामध्ये दात दुखीमुळे सगळे दात काढून कृत्रिम दात किंवा कवळी बसवल्याची उदाहरणे आपण आपल्या आजुबाजुला व नातलगांत पाहिली असतीलच!  दातांची काळजी न घेणे, दातांच्या आरोग्याबाबत गाफिल राहणे ही दात गमावण्याची कारणे असतात.

बर्‍याच लोकांना सतत दातदुखीचा त्रास होतो. दातांचा संबंध थेट मेंदूशी असल्यामुळे दातदुखी ही खूपच वेदनादायक असते. दातदुखीमध्ये डोके ठणकते, तोंडाला गालांना प्रचंड सुज येते,डोळ्यांपर्यंत सुज चढते. अशा स्वरुपात दुखणे गंभीर होते. याच साठी आम्ही तुम्हाला दातदुखीची कारणे व दात दुखीवर घरगुती उपाय सांगणार आहोत.

दातदुखीची कारणे पुढीलप्रमाणे – Daat Dukhichi Karane

दात दुखीवर घरगुती उपाय

ठिसुळ झालेले दात-

बऱ्याच लोकांचे दात जन्मताच ठिसूळ असतात. अशा दातांना काहीही गरम किंवा अति थंड वस्तू खाल्ली तर ठणक लागते. त्यामुळे दातासहीत संपूर्ण जबडा दुखू लागतो. दाताचा ठणका जाईपर्यंत या लोकांची अवस्था बिकट होऊन जाते. सेन्सिटिव्ह दात शक्‍यतो ठिसूळ दातच असतात, ज्यांना पीठाळ दात असे देखील म्हटले जाते.

- Advertisement -

कडक पदार्थांचे सेवन-

बऱ्याच लोकांना कडक पदार्थ कुडुम -कुडुम खायची सवय असते. भाकरीचे तव्यावर कडक केलेले कोरके किंव मांसाहारी पदार्थ सेवन करताना दातांवर जास्त जोर द्यावा लागतो, त्यामुळे दाताचे दुखणे वाढते. कडक पदार्थ खाल्ल्यामुळे दातांवर अधिकचा भार येतो व दातांना अन्न चावण्यासाठी त्रास होतो. कडक पदार्थ लाळेमध्ये नरम होईपर्यंत दाताचा व्यायाम जास्त होतो. सतत कडक पदार्थ खाल्ल्यामुळे देखील दात पडू शकतात.

दाताला मार लागणे किंवा इजा होणे-

काही लोकांना अपघातामध्ये तोंडावर पडल्यामुळे दातांना इजा होते यामुळे देखील दातदुखी होते, तसेच लहान मुलांना खेळताना एकमेकांच्या अंगावर आदळल्यामुळे दातांना दणका बसतो त्यामुळे दातांच्या आतील नसा दुखावल्या जातात तर कधी-कधी दातांच्या नसा तुटून देखील जातात. ज्यामुळे दातांकडे जाणारा रक्तप्रवाह थांबतो व दाताला तीव्र वेदना होतात.

- Advertisement -

दातातील कीड- 

बर्‍याच लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात गोड पदार्थ किंवा चॉकलेटचे सेवन केल्यामुळे दातामध्ये कॅव्हिटी तयार होते, कॅव्हिटी म्हणजे दातांमध्ये छिद्र पडून त्यामध्ये किडा तयार होतो, ही कीड आतून दाताला व दाताच्या मधील मांसाला कुरतडत असते. यामुळे दाताच्या किडीमध्ये प्रचंड वेदना होतात. बरेच वेळा या वेदना इतक्‍या असह्य असतात की दातच काढून टाकावा लागतो.

आंबट पदार्थांचे सेवन- 

जास्त प्रमाणात आंबट पदार्थांचे सेवन केल्यामुळे दातावरील एनॅमलचा थर नष्ट होतो व दाताचा वरचा थर निघुन गेला तर दातावर डाग व खड्डे पडतात यामुळे देखील दात दुखी होते.

जास्त वेळ दात घासणे-

अनेक लोकांना सकाळी जास्त वेळ दात घासण्याची सवय असते. तीन मिनिटाच्या वर दात घासू नये. त्यामुळे दातदुखी जास्त होते. बरेच लोक दात साफ करण्याकरता बऱ्याच वेळ दात घासून बसतात आणि यामुळे दातावरचे एनॅमल दात घासून निघून जाते. एनॅमल थर हा दातांचे रक्षण करणारा दातांवरील थर असतो, त्यामुळे दाताला थंडावा व उष्णता याचा त्रास होत नाही व दातांची संरक्षण होते. मात्र सतत दात घासल्यामुळे एनॅमलचा थर निघून गेल्यास दाताला तीव्र ठणके बसतात व कोणतीही वस्तू खाता येत नाही.

पायरिया –

या आजारांमध्ये दाताच्या हिरड्यांलगत भागांमध्ये जखमा होतात व पु तयार होतो, त्यामुळे अन्न चावण्याचे व खाण्याचे खुप हाल होतात व रक्त येऊ लागते. पायरियामध्ये देखील भरपूर प्रमाणामुळे दातदुखी होते.

पायरिया आजाराबद्दल अधिक जाणून घ्या इथे : पायरिया (हिरड्यांचा आजार) – Gum Disease (Periodontitis) in Marathi

दातांच्या नसामध्ये प्रॉब्लेम होणे-

बरेचदा एकाएकी लोकांच्या दाताच्या आतील नसा तुटतात, साधा ऊस खाल्ला  किंवा घाईमध्ये कडक पदार्थ खाल्ला गेला तरी देखील असे होऊ शकते. अशावेळी दाताच्या आतील नसा तुटून दाताच्या रक्तवाहिन्यांचा पुरवठा थांबतो व दात काळा होऊ लागतो. अशावेळी दातांच्या आत पु तयार होतो व आतील भाग पूर्ण खराब होतो. यामुळे दात हायपर सेन्सिटिव्ह होऊन स्पर्श देखील करता येत नाही व प्रचंड दात दुखी होते.

तर ही होती दातदुखीची काही कारणे.

दात दुखीवर घरगुती उपाय – Daat Dukhivar Gharguti Upay

दात दुखीवर घरगुती उपाय
  • दात दुखत असतील तर हाताच्या बोटाने दात घासावेत. साधे मंजन वापरावे. दातदुखीमध्ये कधीही ब्रशचा वापर करू नये, त्यामुळे दात जास्त सेन्सिटीव्ह होतात व त्यामुळे जास्त वेदना होतात.
  • कांदा- दातदुखी करता आपण एक छोट्या आकाराचा कांदा घेऊन त्याचे चार काप/तुकडे करावे. आता त्यातील प्रत्येक तुकड्यातील एक एक पाकळी काढून जो दात दुखतो त्या दाताच्यावर ही पाकळी ठेवून दात दाबून धरावा असा पूर्ण कांदा संपेपर्यंत करावे. कांद्यामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात. यामुळे आपली दातदुखी ताबडतोब थांबते.
  • लसुन – कांद्याप्रमाणेच लसणाच्या सर्व पाकळ्या सोलून घ्याव्यात व दुखणाऱ्या दातावर लसणाची पाकळी दाबून धरावी. लसणाच्या पाकळीमध्ये असलेल्या अँटीबॅक्टरियल गुणांमुळे दात दुखताना लसणाची पाकळी दातावर दाबून धरल्यास लसणाचा रस दाताच्या आजूबाजूला पसरतो व दाताची ठणक थांबते.
  • लवंग-  लवंगाचा वापर पूर्वापार पद्धतीने दातदुखीसाठी केला जातो. एक लवंग घेऊन ती दातामध्ये दाबून धरावी दातांमध्ये लवंग दाबून धरल्यावर लवंगातील रस बाहेर निघतो व दात बधीर होतो. त्यामुळे दातदुखी थांबते. मात्र या प्रयोगाला जास्त वेळ लागतो. कारण लवंग कडक असते व नरम होण्यासाठी वेळ लागतो. लवंगाचे तेल देखील आपण याकरता वापरू शकता. लवंगाचा तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून दुखर्‍या दातावर दाबून धरले असता दुखरा दात लगेच दुखायचा थांबतो.
दात दुखीवर घरगुती उपाय

हिंग आणि मोसंबीचा रस

दात दुखीवर घरगुती उपाय म्हणून आपण हिंगाचा वापर करू शकतो.घरामध्ये भाजीला फोडणी देताना आपण जो हिंग वापरतो त्या हिंगाचा उपाय दात दुखीवर देखील होतो हे आपल्याला माहीत नसेल! एक चमचा हिंग घेऊन त्यामध्ये तीन चमचे मोसंबीचा रस टाकावा हे मिश्रण चांगले एकजीव मिक्स करावे. कापसाचा एक बोळा घेऊन या मिश्रणामध्ये बुडवावा व आता हा बोळा दुखणार्‍या दातावर दाबून धरावा. हा बोळा पूर्णपणे रस निघुन कोरडा होईपर्यंत दाबून धरावा. असे पाच ते सहा वेळेस केल्यास आपल्याला वेदना हळूहळू कमी होताना जाणवेल. हिंग व मोसंबीचा हा उपाय दातदुखीवर खूपच प्रभावी आहे.

गरम पाण्याच्या गुळण्या- 

दात दुखत असल्यास गरम पाण्याच्या गुळण्या केल्याने देखील दाताच्या ठणकण्यावर आराम मिळतो.

तुरटी-

तुरटी फोडून तव्यावर भाजून घ्यावी. दोन ते तीन वेलदोडे फोडून त्यातील वेलची तुरटीसोबत भाजुन घ्यावी व हे मिश्रण चांगले बारीक दळून घ्यावे. दातदुखी होत असल्यास हे मिश्रण चिमटीत पकडून दुखऱ्या दातावर चारही बाजूंनी लावावे. तुरटीमुळे तोंडाला लाळ सुटते मात्र लाळ थुंकून द्यावी व हे मिश्रण पुन्हा पुन्हा दुखणार्‍या दातावर लावावे. तुरटीमुळे तोंडाचे निर्जंतुकीकरण होते व दातदुखी थांबते.

मीठ –

दात दुखीवर मीठदेखील प्रभावीपणे काम करते. दात दुखत असेल व आपल्याकडे दुसरे कोणतेही साधन नसेल तर आपण चिमूटभर मीठ दुखर्‍या दातावर पकडून दाबुन धरावे. मिठामधील सोडियममुळे वेदना कमी होतात व दात दुखायचे देखील थांबते.

हळद –

हळद, मीठ व पाणी एकत्र व हे मिश्रण गॅसवर थोडे गरम करावे. सोसवेल एवढे गरम मिश्रण दुखणार्‍या दातावरत लेपासारखे दाबून चिटकवावे. यामुळे देखील आपली दातदुखी थांबते.

तर हे होते दात दुखीवरचे घरगुती उपाय!

हे ही वाचा : वजन कमी करण्याचे घरगुती उपाय

हे ही वाचा : गुणकारी ओव्याचे जाणून घ्या हे फायदे

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow
Urjas Vigour & Vitality Capsules for Men - ✅100% Ayurvedic | ✅No Side Effects
1 Month Pack @ ₹719 Only!

Recent Stories