कांदा खिशात ठेवल्याने होत नाही उष्माघात? यात किती तथ्य आहे हे डॉक्टरांकडून जाणून घ्या.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कांदा गुणकारी आहे. पण कांदा खिशात ठेवल्याने उष्माघाताचा धोका कमी होऊ शकतो का? मार्च आणि एप्रिलच्या उन्हाचा तडाखाही असाच सहन करावा लागतो. मात्र मे-जूनमध्ये वाऱ्याचा चटका सहन करणे कठीण होऊन बसते. या दरम्यान फिरणारी गरम हवा उष्णतेच्या लाटेचे रूप घेते, जी आपल्यासाठी घातक ठरते. उष्माघात हा सर्व वयोगटातील लोकांसाठी धोकादायक असतो.

उष्माघातामुळे पायाच्या तळव्यांत जळजळ होणे, मूर्च्छा येणे, डोळ्यांत जळजळ होणे अशा समस्या सुरू होतात. अशा परिस्थितीत उष्माघात टाळण्यासाठी आपण निश्चितपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.

उष्माघात टाळण्यासाठी अनेक आरोग्य तज्ञ ताज्या हिरव्या पालेभाज्या आणि फळे खाण्याचा सल्ला देतात. तसेच, उष्ण हवेपासून वाचण्यासाठी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. या पद्धतींनी तुम्ही उष्माघाताचा धोका टाळू शकता.

पण या सगळ्या बचावादरम्यान तुम्ही लोकांच्या तोंडून आणखी एक सूचना ऐकली असेल, ती सूचना म्हणजे गरम हवा असताना खिशात कांदा घेऊन बाहेर गेलात, तर उष्णता जाणवत नाही. अनेकजण घरगुती उपाय म्हणूनही याचा अवलंब करतात, पण यात काही तथ्य आहे का? चला याविषयी जाणून घेऊया.

- Advertisement -

खिशात कांदा ठेवल्याने काही फायदा होतो का?

उन्हाळ्याच्या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी खिशात कांदा ठेवल्याने काही फायदा होत नाही. मात्र कच्च्या कांद्याचे सेवन केल्यास उष्माघात ब-याच प्रमाणात टाळता येतो. विशेषतः उन्हाळ्यात लाल रंगाच्या कांद्याचे सेवन केल्याने तुमचे शरीर थंड राहते.

लाल रंगाच्या कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचे तत्व असते, ज्यामध्ये हिस्टामाइन विरोधी प्रभाव असतो. कांद्यामध्ये असलेले हे घटक उन्हाळ्यातील त्वचेवरील पुरळ, कीटकांच्या चाव्याव्दारे होणार्‍या पुरळ यासारख्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

याशिवाय कांद्यामध्ये असलेले वाष्पशील तेल आपल्या शरीराला थंड ठेवते. उन्हाळ्यात कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने तुम्ही इलेक्ट्रो*लाइट्सची कमतरता पूर्ण करू शकता.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories