ह्या प्रकारच्या लोकांना किडनी कॅन्सर होतो. तुम्हीसुद्धा ह्या काही गोष्टी सवयीने करता का?

ह्या काही वाईट सवयींमुळे तुम्हाला किडनी कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. जेव्हा रक्त योग्यरित्या फिल्टर केले जात नाही, तेव्हा रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि विषारी घटक एकत्र होतात आणि मूत्रपिंड आणि इतर अवयवांना नुकसान पोहोचवतात.

किडनी कॅन्सर कधी सुरु होतो?

3 16

कर्करोग किंवा कॅन्सर हा एक प्राणघातक आणि धोकादायक आजार असून त्याचे अनेक प्रकार आहेत. आजच्या काळात बहुतांश कॅन्सरवर उपचार सापडले आहेत, पण त्याची किंमत आणि त्यामुळे होणारे त्रास खूप जास्त आहेत, त्यामुळे त्याला प्रतिबंध करणे म्हणजेच होऊ नये म्हणून आधीच काळजी घेणे आवश्यक आहे.

चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे किडनी रक्त योग्य प्रकारे फिल्टर करू शकत नाही. जेव्हा रक्त योग्यरित्या फिल्टर केले जात नाही, तेव्हा रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि विषारी घटक एकत्र होतात आणि मूत्रपिंड आणि इतर अवयवांना नुकसान पोहोचवतात.

मूत्रपिंड किंवा किडनी ही पाठीच्या मणक्याच्या हाडाच्या दोन्ही टोकांना चवळीच्या आकाराचे दोन अवयव असतात. शरीरातील रक्ताचा मोठा भाग किडनीमधून जातो.

मूत्रपिंडात असलेल्या लाखो नेफ्रॉन नळ्या रक्त फिल्टर करतात आणि ते शुद्ध करतात. तुमच्या रोजच्या काही सवयींमुळे किडनीचा कॅन्सर होतो. त्यामुळे ह्या सवयी ताबडतोब बदला म्हणजे हा गंभीर आजार टाळता येईल.

धूम्रपानाचे व्यसन

4 15

जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर तुम्हाला किडनीच्या कॅन्सरचा धोका वाढतो. सरासरी, धूम्रपान करणाऱ्यांना किडनीच्या कर्करोगाचा धोका 50 टक्के असतो. पण तुमचे धूम्रपानाचे व्यसन असेच वाढत राहिले तर ही टक्केवारीही वाढू शकते. जे लोक दिवसातून 20 सिगारेट ओढतात त्यांना किडनीच्या कर्करोगाचा धोका धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा दुप्पट असतो.

दारू पीत असाल तर

5 15

अल्कोहोलचे सेवन करणार्‍या लोकांना किडनी कॅन्सरची लागण होऊ शकते. दारूच्या व्यसनामुळे किडनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे मूत्रपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे दिसू लागतात. जे लोक मद्यपान करत नाहीत त्यांना किडनी कॅन्सरचा धोका दारू न पिणार्‍यांपेक्षा कमी असतो.

उच्च रक्तदाब / हाय ब्लड प्रेशर

6 15

उच्च रक्तदाबामुळे किडनीची समस्या देखील उद्भवू शकते कारण किडनी आपल्या शरीरातील दूषित पदार्थ काढून टाकते. उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्या अरुंद किंवा जाड होतात. या कारणामुळे किडनी नीट काम करू शकत नाही आणि रक्तामध्ये दूषित पदार्थ जमा होऊ लागतात आणि किडनीच्या कॅन्सरची लक्षणे दिसू लागतात.

लठ्ठपणा नियंत्रित करत नसाल तर

7 15

पॅन इंडियाच्या अहवालानुसार, भारतात 50 टक्क्यांहून अधिक किडनीच्या आजारांचे कारण लठ्ठपणा असल्याचे आढळून आले आहे. बरेच लोक शरीरातून चरबी वाढलेले नसतात परंतु त्यांचे पोट बाहेर पडलेले असते.

लठ्ठपणामुळे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका सुमारे 70 टक्क्यांनी वाढतो. पोटातील लठ्ठपणा हे दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराचे सर्वात मोठे कारण आहे. किडनी ६० ते ६५ टक्के खराब झाल्यावर किडनीच्या आजाराची लक्षणे दिसून येतात. म्हणूनच याला सायलेंट किलर असेही म्हणतात.

मधुमेह/ डायबिटिस

8 10

मधुमेह हा देखील किडनी निकामी होण्याचे प्रमुख कारण आहे. ३० ते ४० टक्के डायबिटिस रुग्णांमध्ये किडनी निकामी होते. यापैकी ५० टक्के रुग्ण असे आहेत ज्यांना या आजाराचे निदान खूप उशिरा होते आणि नंतर त्यांना डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण करावे लागते.

तीव्र मूत्रपिंडाचा आजार कोणत्याही उपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. किडनीच्या शेवटच्या टप्प्यातील आजारांवर उपचार फक्त डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणाने शक्य आहे. किडनीशी संबंधित त्रास असतील तर आजच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि वेळेवर उपचार घेउन आणि ही वरची व्यसने टाळून लवकर बरे व्हा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories