डायबिटीस होण्याआधी दिसून येतात प्रीडायबिटीसची लक्षणे, प्रीडायबिटीसच्या ह्या 8 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

प्रीडायबीटिस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये तुम्हाला डायबिटिस होण्यापूर्वी काही लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे ओळखून भविष्यातील डायबिटिसचा धोका टाळता येतो.

प्रीडायबिटिस म्हणजे काय?

प्रीडायबिटिस म्हणजे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा जास्त आहे. पण तरीही आपण अद्याप पूर्णपणे मधुमेहाच्या पकडीत आलेला नाही. हीच ती अवस्था जेव्हा आपल्याला प्रीडायबेटिसची लक्षणे दिसतात तेव्हा आपण आपली जीवनशैली ताबडतोब बदलणे आवश्यक आहे, जेणेकरून टाइप-2 डायबिटिसचा धोका टाळता येईल.

जर तुम्ही प्रीडायबेटिसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला मधुमेहाच्या इतर गुंतागुंती सुरु होण्याचा धोका देखील वाढू शकतो जसे की हृदय, रक्तवाहिन्या आणि किडनीच्या समस्या सुरु होऊ शकतात.

आज ह्या लेखात आपण प्रीडायबिटिसची काही लक्षणे सांगणार आहोत, जेणेकरुन तुम्‍ही तो ओळखून त्यावर योग्य वेळी उपचार करू शकाल. ह्या अवस्थेत उपचार घेतल्यास मधुमेहाचा धोका टाळता येतो. चला जाणून घेऊया प्रीडायबेटिसच्या लक्षणांबद्दल डॉक्टर काय म्हणतात.

- Advertisement -

सीडीसी (सेंट्रल डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन) नुसार प्रीडायबिटिसची लक्षणे लक्षात घेऊन योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास प्री-डायबेटिस बरा होऊ शकतो. तसेच टाईप-2 डायबिटीसचा धोका टाळता येतो. त्यामुळे मधुमेह/डायबिटिस टाळायचा असेल तर ही लक्षणे ओळखून आजच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. ही आहेत प्रीडायबिटिसची लक्षणे

वारंवार लघवी होणे

3 8

प्रीडायबिटिस असलेल्या व्यक्तीच्या शरीरात लघवीचे प्रमाण वाढते. या स्थितीत व्यक्तीला वारंवार लघवी होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला लघवीची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचा उपचार वेळेवर होऊ शकेल.

ह्याशिवाय, हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल तर त्याचा तुमच्या किडनीवरही परिणाम होऊ शकतो. कारण जर तुम्ही लघवी थांबवली तर त्याचा भार तुमच्या किडनीवर पडू शकतो. त्यामुळे वेळेवर उपचार सुरु करा.

वारंवार भूक लागणे

4 7

प्रीडायबीटिस अर्थात प्री-डायबीटिसच्या स्थितीत माणसाला खूप भूक लागते. तसेच त्यांना पुन्हा पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशा परिस्थितीत, जर अशी लक्षणे तुमच्या शरीरात दिसत असतील, तर ताबडतोब शुगर लेवल चेक करा. तसेच, बाहेर जाताना भूकेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून मधुमेहासारखे आजार टाळता येतील.

- Advertisement -

जास्त तहान

5 7

प्रीडायबीटिसच्या लक्षणांबद्दल बोलायचे तर ते मुख्य लक्षण असू शकते. अशा डायबिटिस मध्ये व्यक्तीला वारंवार तहान लागू शकते. वास्तविक ह्या स्थितीत शरीरात लघवीचे प्रमाण वाढू लागते. तुमच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्त्राव होतो. यामुळे व्यक्तीला जास्त तहान लागते.

वजन वाढणे

6 7

तुम्हाला डायबिटिस होण्याच्या काही काळापूर्वी तुमच्या शरीराचे वजन वाढू शकते. तुमचे वजन अचानक वेगाने वाढत असेल तर लगेच मधुमेहाची तपासणी करून घ्या. अचानक वाढलेल्या वजनाकडे दुर्लक्ष करू नका. कारण ती गंभीर स्थिती असू शकते. त्याच वेळी, मधुमेहाव्यतिरिक्त, इतर अनेक कारणांमुळे तुमचे वजन देखील वाढू शकते. त्यामुळे तुमचे वजन नियमितपणे करून बघा.

मुरुम

7 7

शरीरातील साखरेच्या पातळीत चढ-उतार झाल्यामुळे तुम्हाला फोड आणि पिंपल्सचा त्रास होऊ शकतो. किंवा निळे डाग दिसू शकतात. अशा परिस्थितीत, आपण निश्चितपणे शुगर टेस्ट केली पाहिजे. जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील.

जखमा लवकर बऱ्या होत नाहीत

8 3

डायबिटिस आधीची लक्षणे ही डायबिटीससारखीच असतात. काही प्रकरणांमध्ये, जर तुमच्या जखमा लवकर भरल्या नाहीत, तर ते प्रीडायबिटीस आहे असे समजा. म्हणजेच तुम्हाला डायबिटिस होण्याची सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत तुमची साखरेची पातळी नक्कीच तपासा. तुमच्या रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार होत असल्यास, ताबडतोब उपचार सुरू करा.

- Advertisement -

कमकुवत डोळे

9 2

प्रीडायबिटीसच्या स्थितीत व्यक्तीचे डोळे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या डोळ्यांसमोर अचानक अंधार किंवा अशक्तपणा दिसला तर तत्काळ तुमची शुगर टेस्ट करून घ्या. जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील.

ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम

10 1

तुम्हाला मधुमेह होण्यापूर्वी तुमच्या कानावरही परिणाम होऊ शकतो. प्रीडायबिटीसच्या बाबतीत, व्यक्तीच्या कानाच्या काही पेशींना नुकसान होऊ शकते, ज्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला काही वाटत असेल तर स्वतःची डायबिटिस टेस्ट करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डायबिटीस होण्यापूर्वी व्यक्तीच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. अशा परिस्थितीत ह्या बदलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. ही लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार केल्यास डायबिटिसचा धोका टळू शकतो.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories