मुलगा होण्याची लक्षणे कोणती? तुम्हाला होणारे अपत्य मुलगा आहे की मुलगी? ओळखा या 10 लक्षणांवरून!

मुलगा होण्याची लक्षणे कोणती हे जाणून घेण्यापूर्वी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की मुलं आणि मुली दोघांवर ही आई वडिलांचा सारखाच जीव असतो, त्यांच्यात भेदभाव केला जात नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या लिंगभेदाला प्रोत्साहन देत नाही. बाळ होणार असेल तर त्याच्या लिंगाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. काही संशोधनाच्या अनुसार आपल्याला होणारे अपत्य हे मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्यासाठी काही घटक महत्वाचे ठरतात. चला तर मग आजच्या या लेखात अशाच काही घटकांबद्दल जाणून घेऊया.

युनायटेड स्टेट्समध्ये 4.8 दशलक्ष पेक्षा जास्त जन्म चाचण्या असलेले संशोधन असे सांगते की विवाहित जोडप्यांना पहिला मुलगा होण्याची शक्यता थोडी जास्त असते. 86,000 पालकांचा समावेश असलेल्या दुसर्‍या अभ्यासात असे आढळून आले की गर्भधारणेदरम्यान एकत्र राहणाऱ्या जोडप्यांना मुलगा होण्याची अधिक शक्यता असते. एकत्र राहणाऱ्या 51.5 टक्के जोडप्यांना मुलं झाली होती, आणि या तुलनेत 49.9 टक्के वेगळे राहणाऱ्या जोडप्यांना मुलगी झाली.

मुलगा होण्याची लक्षणे कोणती?

सहवासाचा कालावधी मुलगा असण्याच्या शक्यतेवर परिणाम करू शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की जे जोडपे एका वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र राहतात त्यांना पुरुष संतती होण्याची शक्यता जास्त असते. पुरुष शुक्राणू, जे मुलं होण्यासाठी जबाबदार असतात, ते हलके असतात आणि त्यांचे डोके लहान आणि लहान शेपटी असते. हे त्यांना स्त्री बिजपर्यंत अधिक जलद पोहण्यास सक्षम करते आणि स्त्रीच्या प्रजनन कालावधी दरम्यान ते अंड्यापर्यंत पोहोचू शकते.

खाण्यापिण्याच्या सवयी:

लिंग निश्चिती मधे आहाराची महत्वाची भूमिका असते. एका अभ्यासात 740 ब्रिटीश महिलांना त्यांच्या उष्मांकाच्या आधारावर गटांमध्ये विभागले गेले. ज्यांनी सर्वाधिक कॅलरी खाल्ल्या (सुमारे 2,413) त्यांना मुलं होण्याची 56 टक्के शक्यता होती. याउलट, ज्या स्त्रिया कमी कॅलरी खात होत्या (अंदाजे 2,283) त्यांना मुले होण्याची शक्यता ही फक्त 45 टक्के होती. या वरून हे दिसते की कमी कॅलरी खाल्ल्याने मुलं होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

गर्भधारणा जर उन्हाळ्यात होत असेल तर:

तुमची गर्भधारणा ज्या ऋतूमध्ये होत आहे त्यावरून सुद्धा लिंगाबद्दल अंदाज लावता येऊ शकतो. काही देशांमध्ये, उन्हाळ्यात जास्त मुले आणि हिवाळ्यात जास्त मुली होतात. हिवाळ्यात व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण जास्त प्रमाणात दिसून येते. आणि पुरुष शुक्राणू आणि भ्रूण हे जास्तच नाजूक असतात आणि आईद्वारे प्रसारित होणाऱ्या संसर्गाचा प्रतिकार करण्यास ते कमी सक्षम असतात. त्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या गर्भधारणेमुळे मुलं होण्याची शक्यता अधिक असते असे मानले जाते.

आई वडिलांचे वय:

दोन्ही पालकांचे वय त्यांच्या संततीच्या लिंगावर प्रभाव टाकू शकते. वृद्ध पालक, विशेषत: 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माता आणि 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वडिलांना मुली होण्याची शक्यता जास्त असते. हे स्त्रियांच्या वयानुसार हार्मोनल बदलांमुळे होऊ शकते. वृद्ध पुरुष कमी पुरुष शुक्राणूंची निर्मिती करतात.

मॉर्निंग सिकनेस:

मॉर्निंग सिकनेस, ज्याला हायपरमेसिस ग्रॅव्हिडारम म्हणून ओळखले जाते, अनुभवणे हे होणारे अपत्य मुलगी असण्याचे लक्षण जास्त असते. काही तज्ञ याबद्दल सांगताना म्हणतात की हे इस्ट्रोजेनच्या वाढलेल्या पातळी मुळे होते कारण इस्ट्रोजेन हा मॉर्निंग सिकनेसशी संबंधित आहे.

तुम्ही राहता तिथले हवामान:

हवामान आणि पर्यावरणीय घटक होणाऱ्या अपत्याच्या लिंगावर प्रभाव टाकू शकतात. काही अभ्यास असे सूचित करतात की उष्ण तापमान ज्या ठिकाणी असते ते ठिकाण जास्त मुली असण्याशी जोडलेले आहे. अतिउष्णता किंवा थंडी यासारख्या अत्यंत हवामानातील फरकांमुळे ताण येऊ शकतो. अशा परिस्थितीचा गर्भाच्या विकासावर विपरीत प्रभाव पडतो, विशेषतः पुरुष गर्भांवर, जे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात अधिक असुरक्षित असतात.

कामावरील ताण:

तणावपूर्ण कामाचे वातावरण लिंग निश्चित करण्यात परिणाम करू शकते. ब्रिटीश रुग्णालयात 16,000 हून अधिक बाळंतपणाचा समावेश असलेल्या अभ्यासानुसार मानसिकदृष्ट्या तणाव असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना मुली होण्याची शक्यता जास्त असते.

वडीलांच्या कामात ताण असेल तर:

वडिलांची नोकरी किंवा काम देखील एक महत्वाची भूमिका बजावू शकते. जास्त ताण-तणावाच्या नोकरीत गुंतलेल्या वडिलांना जास्त मुली असतात, तर कमी तणाव असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या कठीण काम नसलेल्या वडिलांना मुलगे होण्याची जास्त शक्यता असते.

हार्मोनल उपचार:

क्लोमिफेन सारख्या हार्मोनल उपचारांचा वापर केल्याने मुलगी होण्याची शक्यता किंचित वाढू शकते.

कोणाला जर आधीच 2 किंवा जास्त मुलं असतील तर:

एकापेक्षा जास्त मुलगे झाल्यामुळे शेवटी मुलगी होण्याची शक्यता वाढते. कारण जेवढ्या जास्त वेळ गर्भधारणा होते तेवढीच गोनाडोट्रोफिन हार्मोनच्या पातळीत वाढ होऊ शकते. काही तज्ञांनी असे सुचवले आहे की या वाढलेल्या हार्मोन पातळीमुळे मुलगी होण्याची शक्यता वाढू शकते.

गर्भधारणा कालावधी

ज्यांना मुलगी होणार असेल त्या मातांना सामान्यतः जास्त काळ गर्भधारणा होते. मुलांचा जन्म वेळेआधी किंवा वेळेवर होण्याची शक्यता जास्त असते, तर मुलींचा जन्म हा दिल्या गेलेल्या तारखेपेक्षा उशिरा होतो.

तर ही काही घटके होणाऱ्या अपत्याच्या लींगाबद्दल माहिती सांगू शकतात. मात्र मुलगा आणि मुलगी यामधे कोणताही भेदभाव कोणी मानू नये.

Leave a Comment