काय आपल्या पण घरात मुंग्यानी थैमान घातले आहे? मुंग्या घालवण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय!

पावसाळ्याचे दिवस सुरू होण्याअगोदर मुंग्या आपल्या कुटुंबासाठी व आपल्या संपूर्ण ऋतुकाळासाठी पुरेल असा अन्नसाठा गोळा करण्यासाठी बाहेर पडतात. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बऱ्याच घरांमध्ये फटीतून, बिळातून किंवा जिथे मातीचे ढासळलेली आहे तेथून मुंग्यांच्या आगमन होते. अन्नाच्या शोधार्थ मुंग्या आपल्या टीम सोबतच एकामागे एक असे हजारोंच्या संख्येने सगळीकडे दाखल होतात, मात्र एका मुंगी मागे एक अशा अनेक मुंग्या आपल्या घरामध्ये हळूहळू येतात व संपूर्ण घर व मुंग्यामय दिसू लागते. त्यामुळे आपण अगदी त्रस्त होतो.

बऱ्याचदा या मुंग्या आपल्याला तसेच लहान मुलांना देखील चावतात ज्यामुळे हातापायावर ती पुरळ उठतात व सूज देखील येते. खरे पाहायला गेले तर पावसाळ्यात कामबंद होणार म्हणुन या मुंग्याचा समुदाय जगण्याकरता अन्नसाठा जमा करण्यासाठी आपले शिपाई पाठवतात. ज्या मुंग्यांना अन्न सापडते त्या इतरांना सुक्ष्म संकेत देतात. आपणच आपल्या घरामध्ये सांडवलेले गोड पदार्थ,पीठ व अस्वच्छतेमुळे या मुंग्यांना आमंत्रण देत असतो.

3 34

तसे पाहिले तर कोणताच प्राणी मारणे चांगले नाही. मात्र मुंग्या, झुरळे किंवा पाली हे कीटक आपल्या आरोग्याला घातक असतात. घरात स्वयंपाक करताना पदार्थ झटकताना किंवा साखर व गोड पदार्थ सांडले की मुंग्यांना त्याचा माग लागतो व मुंग्या हळु-हळु करून आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. एकदा का त्यांनी आपल्या घरामध्ये आक्रमण केले तर आपल्याला त्यांना हटवता- हटवता नाकी नऊ येतात.

वास्तविक मुंग्या फेरोमोन्स नावाचे एक रसायन आपल्या शरीरातून उत्सर्जित पदार्थ म्हणून सोडत असतात ज्याद्वारे एक मुंगी दुसऱ्या मुंगीला संकेत देते कि ती कोणत्या मार्गे गेली आहे. त्यामुळे मुंग्या एकामागे एक सरळ रेषेमध्ये आपला फौजफाटा घेऊन आपल्या घरात दाखल होतात. मुंग्या आल्या नंतर त्यांना घालवण्यासाठी, पळवून लावण्यासाठी आपण खूप त्रागा व उपाय करतो. मात्र काहीही केल्या मुंग्या जातच नाहीत!

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे आपल्या घरामध्ये मुंग्या थांबणारच नाहीत व लगेच काढता पाय घेतील.

चला तर बघुया कोणते आहे ते घरगुती उपाय?

1. व्हिनेगर

6 29

पांढरे व्हिनेगर हे मुंग्या पळवण्यासाठी अतिशय जालीम औषध मानले जाते. एक बादली पाण्यामध्ये तीन ते चार झाकण व्हिनेगर टाकून आपल्या फर्शीवर मुंग्या येणाऱ्या जागेत पोछा फिरवून घ्यावा. व्हिनेगरच्या वासामुळे मुंग्या त्या जागेत पुन्हा कधीही येत नाहीत कारण व्हिनेगर हे मुंग्यांचे विष मानले जाते.

2. लिंबू

7 23

लिंबू देखील मुंग्यांना पळवण्यासाठी प्रभावीपणे उपयोगी ठरते. लिंबाचा वापर करून झाल्यानंतर जी सालपटे उरतात त्या लिंबाच्या सालींन‍ मुंग्या येतात त्या जागेत टाकून दिल्यास त्या वासाने मुंग्या लांब पळुन जातात व परत तिथे फिरकतही नाहीत.

3. एप्पल साइडर व्हिनेगर

8 21

एप्पल साइडर व्हिनेगर देखील उग्र वासाचे असते व त्या वासामुळे मुंग्या घरात थांबत नाहीत. फेरोमोन्स नावाचे केमिकल जे मुंग्या मागे सोडतात ते देखील एप्पल साइडर व्हिनेगरमुळे पुसून जाते. ज्यामुळे मुंग्या रस्ता विसरतात व परत पावली आपल्या मार्गाने मागे निघून जातात. एक किंवा दोन चमचे व्हिनेगर पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा स्प्रे मुंग्यांच्या येण्याच्या मार्ग‍वर फवारला असता मुंग्या परत माघारी फिरतात.

4. मसाल्याचे पदार्थ

9 17

बरेचसे मसाल्याचे पदार्थ मुंग्यांचे शत्रुच मानले जातात. ज्यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनी तसेच काळी मिरी प्रमुख आहेत. साखरेच्या डब्याभोवती किंवा गोड पदार्थांवर मुंग्या जमा होतात अशा ठिकाणी तेज पत्ता किंवा दालचिनी पावडर टाकल्यास मुंग्या त्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. या मसाल्याच्या पदार्थांच्या वासामुळे मुंग्या पळुन जातात. मुंग्याचे उकीर व जेथुन आगमण होते त्या जागी दालचिनी पावडर भुरभुरावी. दालचिनीच्या वासाने मुंग्या पुढे न येता रस्ता विसरतात व परत जातात .
मुंग्या घरातून परत निघून जाण्याकरता काळी मिरी देखील खूपच उपयुक्त मानली जाते. एक कप गरम पाण्यामध्ये काळी मिरीची पावडर टाकावी व जेथून मुंग्या येतात त्या जागेवर स्प्रे करावे. काळी मिरीच्या स्प्रेमुळे मुंग्या घरात येत नाहीत.

5. बोरेक्स आणि साखरेचे मिश्रण

10 9

बोरेक्स आणि साखर देखील मुंग्या पळवुन लावण्याकरता प्रभावी औषध मानले जाते. मात्र बोरेक्स हे आपल्या पाळीव प्राणी व लहान मुलांकरता धोकादायक असते. त्या करता हे मिश्रण वापरल्यानंतर लहान मुले व पाळीव प्राण्यांन‍ा त्यापासून दूर ठेवावे.

तर हे होते काही घरगुती उपाय ज्यामुळे आपण आपल्याला हैराण करणाऱ्या मुंग्यांना पळवून लावू शकता. नक्की वापरा व आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरु नका.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories