पायाच्या तळव्यांची आग का होते? पायाच्या तळव्यांची आग होणे यावर हे सात घरगुती उपाय केल्यास मिळेल लगेच आराम.

पायाच्या तळव्यांची आग का होते? मानवी शरीरात नेहमीच काही ना काही दुखणं येतच असतं. आज आपण अशा लोकांबद्दल बोलत आहोत ज्यांना पायाच्या तळव्यांना जळजळ किंवा आग होण्यामुळे चालायला खूप त्रास होतो. कधीकधी तळवे दुखतात. पण असेही लोक आहेत जे बर्‍याचदा त्याकडे दुर्लक्ष करतात.


खरतर हे फक्त असह्य त्रास, वेदनाच नाही तर तर इतर समस्यांना देखील कारणीभूत ठरू शकेल. म्हणून तळवे दुखण्याचा त्रास असेल तर पायाचे तळवे दुखण्याची / पायाच्या तळव्यांची आग होण्याची कारणे आणि उपाय ह्या लेखातून जाणून घ्या.

कधीकधी तळवे दुखतात तेव्हा चालणेसुध्दा कठीण होते. काही लोक ह्यावर औषध किंवा तळव्यांना लावायला कोल्ड क्रिम घेतात. परंतु यामुळे त्यांना थोड्या काळासाठीच आराम मिळतो. सर्व उपाय करण्याआधी तळवे दुखण्याचे किंवा जळजळ होण्याचं कारण काय आहे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे, तरच आपण हे दुखणं टाळू शकता.

पायाचे तळवे दुखण्याची /पायाच्या तळव्यांची आग होण्याची कारणे

पायाच्या तळव्यांची आग
  • बराच काळ एकाच ठिकाणी उभे रहाणे : शक्यतो हालचाल करत रहा. किंवा बसा. पण उभे राहू नका त्यामुळे हा त्रास कमी होईल.
  • जास्त वजन असणे : वजन जास्त असेल तर शरीराचा भार शेवटी तळव्यावर येऊन तळवे दुखतात. वजन कमी करण्यासाठी उपाय करून बघा.
  • खूप चालणे : खूप पायपीट करत असाल किंवा पूर्वी केली असेल तर आता तळवे दुखण्याची शक्यता आहे. तळवे दुखण्याची सवय असेल तर वाहनांतून प्रवास करा.
  • काही औषधांचे दुष्परिणाम : काही गोळ्या औषधांचे दुष्परिणाम शरीरावर जाणवतात. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच आपल्या गोळ्या सुरू करा. कदाचित डॉक्टर गोळ्या बदलून देतील.

पायाच्या तळव्यांची आग होण्याची आणखी काही कारणे म्हणजे

पायाच्या तळव्यांची आग

तर तळवे दुखतात तेव्हा आपल्याला आपली रोजची कामे करण्यात खूप अडचण येते, म्हणून घरी बसूनही काही घरगुती उपाय करून आपण त्यातून बरे होऊ शकता.

- Advertisement -

पायाच्या तळव्यांची आग होणे ह्यांवर घरगुती उपाय

पायाच्या तळव्यांची आग

1. तळव्यांना मालिश करा.

कोमट तेलाने तळव्यांना मालिश करून, रक्ताचा प्रवाह चांगला होईल जो आपल्याला तळव्यांची जळजळ कमी करण्यासाठी काम करतो. कधीकधी आपण बर्‍याच वेळेस उभे असता, त्यामुळं आपल्या तळव्यांकडे रक्त प्रवाह कमी होतो.

2. मुलतानी मिट्टी

तुम्ही चेहऱ्याला अनेक वेळा मुलतानी मिट्टी लावली असेल. पण आपल्या तळव्यात जळजळ होण्याचा त्रास असेल तर आपण मुल्तानी मिट्टी पेस्ट लावावी, यामुळे काही काळांतच थंडावा मिळेल आणि पाय बरे होतील.

3. लोणी आणि साखर

लोणी आणि साखर ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या घरात आहेत, जर त्या नसतील तर आपण त्या किराणा दुकानातून आणि डेअरीतून सहजपणे खरेदी करू शकता. या दोन्ही गोष्टी समान प्रमाणात मिसळून आणि आपल्या तळव्यांवर लावल्यास तळव्यांची आग कमी होईल.

4. तळव्यावर मेंदी लावा

मेहंदी जी अगदी नैसर्गिक गोष्टींपैकी एक आहे, जर तुमचे केस पांढरे झाले तर तुम्ही केसांना मेंदी लावता. अगदी त्याचप्रमाणे, जर आपल्या तळव्यांना बर्‍यापैकी जळत असेल तर आपण मेंदीमध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस मिसळू शकता आणि ते आपल्या तळव्यावर लावू शकता, यामुळे आपल्या जळजळ थांबेल. हा उपाय नियमित करा. मेंदीची पानं पण वाटून घेऊ शकता.

- Advertisement -

5. थंड गोष्टी खा

कधीकधी जेव्हा तुम्ही जास्त मसालेदार अन्न खाता, तर त्याने पायात जळजळ होऊ शकते, म्हणून उसाचा रस, दही, डाळिंब, लस्सी, काकडी यासारख्या पदार्थांचा आपल्या खाण्यात समावेश करण्याचा प्रयत्न करा. कडुलिंब पाला चावल्यानेही बराच आराम मिळेल.

6. दुधीचा रस

प्रथम दुधी किसून घ्या, त्यानंतर तो लगदा आणि रस घ्या आणि काही काळ आपल्या तळव्यावर ठेवा. असे केल्याने तुमच्या तळव्यातली जळजळ कमी होईल. आणि तळवे दुखायचे थांबतील.

7. धणे खा

धणे आणि साखर समान प्रमाणात घ्या. नंतर 2 चमचे धणे आणि 2 चमचे साखर घालून दिवसातून 4 वेळा थंड पाण्यातून प्यायल्यास ते आपल्या तळव्यातली जळजळ दूर करेल.

तर ही समस्या येत्या काळात बर्‍याच लोकांमध्ये दिसून येते, विशेषत: वृद्धांमध्ये. जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर आपण आपल्या स्वत: च्या शरीराचे नुकसान करत आहोत. जेव्हा आपण यावर उपचार करीत नाही तेव्हा काही वेळा आपली ही समस्या आणखी वाढू शकते.

- Advertisement -

म्हणूनच, हे घरगुती उपचार वेळेत घेतल्यास आपण पायाच्या तळव्यांची आग किंवा तळवे दुखणे कमी करू शकता. जर आपल्याला या घरगुती औषधांचा फायदा मिळाला नाही तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories