बद्धकोष्ठता पडेल महागात! पोट साफ होत नाही तर सावध राहा वाढू शकतात हे असाध्य आजार .

आपलं पोट साफ होत नसल्याची अनेकांची तक्रार असते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सतत पोट साफ न केल्याने तुमच्या शरीराच्या कार्यक्षमतेसोबत काही आजारही वाढू शकतात. जेव्हा तुमचे पोट नियमितपणे साफ होत नाही आणि बद्धकोष्ठता कायम राहते, तेव्हा तुमची भूक, चयापचय, आतड्यांचं कार्य, लिव्हर, किडनी अशा अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होतो. याशिवाय काही आजार वाढतात. इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) चा त्रास वाढू शकतो.

डायबिटीस वाढू शकतं

3 43

जेव्हा तुम्हाला नियमित बद्धकोष्ठता असते तेव्हा डायबिटीस संतुलित राहत नाही. खरे तर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये नियमित पोट साफ न केल्याने रक्तातील साखर वाढते आणि त्यामुळे डायबिटीस वाढतं. उपवास करूनही रक्तातील साखर वाढत राहते. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी बद्धकोष्ठता टाळावी आणि त्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खावेत.

वजन वाढू शकतं

4 43

सततच्या बद्धकोष्ठतेमुळे वजन वाढू शकतं. लठ्ठ रूग्णांची चयापचय क्रिया खूप मंद असते, जी सतत पोट साफ न केल्यामुळे अधिक मंद होऊ शकते. तसेच पोटाची साफसफाई नीट न झाल्यामुळे शरीरात टॉक्सिन्स आणि फॅट जमा होऊ लागतात आणि वजन सहजासहजी कमी होत नाही आणि त्यामुळे वजन वाढायला लागतं.

मूळव्याधीचा त्रास वाढू शकतो

5 37

कठीण स्टूलमुळे तुमच्या गुदद्वाराच्या अस्तरात वेदना, जळजळ आणि कधीकधी रक्तस्त्राव होऊ शकतो. हे देखील मूळव्याधीच लक्षण आहे, जेव्हा बद्धकोष्ठता असते तेव्हा मूळव्याधीचा त्रास वाढू शकतो. पोट स्वच्छ न राहिल्यामुळे बराच काळ जास्त ताणल्याने मूत्राशयातून लघवी गळती सुरु होऊन होऊन मूळव्याध त्रास देतो.

- Advertisement -

डायव्हर्टिकुलिटिस वाढतो

6 30

डायव्हर्टिकुलिटिस हा पचनसंस्थेशी संबंधित आजार आहे ज्यामध्ये आतड्याच्या वॉलला इन्फेक्शन होतं आणि लहान पाउच तयार होतात. त्यामुळे सूज येते. अशा स्थितीत पोट साफ न होणे आणि बद्धकोष्ठता हे इन्फेक्शन आणखी वाढवून परिस्थिती गंभीर बनवू शकते.

त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ नये, पोट साफ राहावं ह्यासाठी फायबर युक्त आहार घ्या आणि सक्रिय व्हा, व्यायाम करा. आणि बद्धकोष्ठतेवर उपाय हवे असल्यास आमचे बद्धकोष्ठतेवरचे लेख वाचा.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories