पर्यावरणासाठी आणि आपल्यासाठी घातक गोष्टींना द्या आरोग्यदायी पर्याय. आपलं आरोग्य आणि पर्यावरण एकत्र जपूया.

आपल्या आजूबाजूला पर्यावरण निरोगी असणे गरजेचे आहे. पण आपण वापरत असलेल्या अनेक गोष्टींमुळे या निरोगी पर्यावरणाला धोका पोहोचत असतो आणि त्याचा त्रास आपल्यालाही होत असतो. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण वापरल्यामुळे निसर्गाला किंवा पर्यावरणाला धोका पोहोचतो. आणि निसर्ग बिघडतो.

तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण रोज वापरण्यास टाळल्याने पर्यावरणाचं रक्षण व्हायला मदत होईल. हेल्दी एन्व्हायरमेंट फ्रेंडली वस्तू आपण वापरल्या पाहिजेत चला तर पाहूया असे एन्व्हायरमेंट फ्रेंडली पर्याय.

तर या आहेत अशा चार वस्तू या पर्यावरणाला धोकादायक आहेत आणि हे त्यांचे चार एन्व्हायरमेंट फ्रेंडली पर्याय.

ॲल्युमिनियम फॉइल्स

आपण जेव्हा पदार्थ पार्सल आणतो किंवा देतो तेव्हा सहजपणे ॲल्युमिनियम मध्ये बांधून देतो. ॲल्युमिनियम फाईल च्या वापरामुळे विचार करण्याची शक्ती आणि स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते. शरीरात ॲल्युमिनियम वाढल्याने हाडे कमकुवत होणे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे असे त्रास लवकर दिसून येतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऑस्टियोपोरोसिस, डिमेंशिया अशा आजारांची सुरुवात यामुळे होऊ शकते. त्याचप्रमाणे तुम्ही आंबट पदार्थ कधीच ऍल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून ठेवू नका. हे पर्यावरणाला धोकादायक वापरण्याऐवजी तुम्ही कपड्याचा वापर करू शकता किंवा पदार्थ देण्यासाठी धातूच्या भांड्याचा वापर करा.

सिंथेटिक कपडे वापरत आहात

आपण सिंथेटिक कपडे निवडतो कारण त्याला सुरकुत्या पडत नाहीत आणि त्यावर डाग लवकर लागत नाहीत. हे कपडे आपल्या शरीरावर आपल्याला आरामदायी वाटतात परंतु सिंथेटिक कपडे तयार करण्यासाठी विषारी केमिकल्सचा वापर केला जातो यामुळे आपल्या शरीराला अनेक त्रास होऊ शकतात.

सिंथेटिक कपड्यांमध्ये ऍक्रेलिक, नायलॉन, रेयोन डॅक्रोन अशा फॅब्रिक चा समावेश होतो. सिंथेटिक कपडे ब्लिच करताना डाय करताना वापरल्या जाणाऱ्या केमिकल्स मुळे रोगप्रतिकारशक्ती कमी, कॅन्सर, हार्मोनल असंतुलन अशा आजारांना सुरुवात होऊ शकते.

सिंथेटिक कपड्यांना पर्याय द्या कॉटनच्या कपड्यांचा. आपली त्वचा आणि आपला मेंदू म्हणजे एकंदरीतच संपूर्ण आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या सिंथेटिक कपड्यांना रामराम करा आणि कॉटनचे कपडे वापरायला सुरुवात करा. कॉटनचे कपडे सहज विघटन होणारे असतात त्यामुळे सिंथेटिक कपडांच्या तुलनेत कॉटनच्या कपड्यांमुळे पर्यावरण स्वच्छ राहतं.

सॅनिटरी नॅपकिन अतिशय धोकादायक

भारतात दरवर्षी प्रचंड प्रमाणात वेगळ्या कंपनीतर्फे सॅनिटरी नॅपकिन चा उत्पादन होतं. मेंस्ट्रुअल हेल्थ अलायन्स इंडिया यांच्या बताये भारतातील पूर्णपणे विघटन व्हायला पाचशे ते आठशे वर्षे लागतात. कारण ह्या सॅनिटरी नॅपकिन मध्ये नॉन बायोडीग्रेडेबल प्लास्टिकचा वापर केला जातो. आणि या सॅनिटरी नॅपकिन्स पर्यावरणामध्ये फेकून दिल्यामुळे पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

त्याचप्रमाणे असे सॅनिटरी नॅपकिन्स स्त्रियांनी बराच वेळ वापरल्यामुळे व्हजायनल इन्फेक्शन, जळजळ आणि इतरही स्त्रियांचे गंभीर आजार होऊ शकतात. अशा धोकादायक सॅनिटरी नॅपकिन्स ऐवजी तुम्ही मेंस्ट्रुअल कपचा वापर करू शकता. ह्यांचा वापर अतिशय सुरक्षित आहे आणि पर्यावरणासाठी मेंस्ट्रुअल कप धोकादायक नाहीत. ह्याची जनजागृती होणे गरजेचे आहे.

प्लास्टिकच्या बाटल्या म्हणजे महासंकट

प्लास्टिकच्या बाटल्या पर्यावरण खराब करतात आणि आपला आरोग्य सुद्धा बिघडवतात. जर तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीत गरम पाणी भरून प्याल तर पाणी विषारी होण्याची शक्यता असते. पाण्याच्या बाटल्यांचा जो वापर सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे तो थांबला पाहिजे आणि ह्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा पर्याय असलेल्या धातूच्या बाटल्यांचा वापर आपण वाढवला पाहिजे.

तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्या ऐवजी तांब्याची बाटली पाण्यासाठी वापरू शकता. कॉपर बॉटल जास्त वेळ टिकते आणि यामधील पाणी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ कमी करते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने आपल्याला लोह मिळतं. आयरनच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो. कॉपर बॉटलमध्ये एंटीऑक्सीडेंट असतात जे निसर्ग आणि आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

तर आता आपण पर्यावरण आणि स्वतःसाठी असलेल्या ह्या वरील आरोग्यदायी पर्यायांचा वापर सुरू करू शकता. पर्यावरणाचे संवर्धन ही आपली सर्वांची पहिली जबाबदारी आहे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories