पोट साफ होईल झटपट! ह्या घरात असलेल्या गोष्टी रात्री खा सकाळी पोट साफ!

आजसुद्धा पोट दुखत असेल किंवा पोट जड वाटत असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. तर आपल्यापैकी बहुतेकांना दररोज पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. यामागे एक प्रमुख कारण म्हणजे आपला निकृष्ट आहार. तसेच फायबरयुक्त पदार्थ अजिबात न खाणे. बद्धकोष्ठतेपासून सुटका करुन घेण्यासाठी लोक बरेच घरगुती उपाय करतात, परंतु काहीवेळा हे उपाय फायदेशीर ठरण्याऐवजी परिस्थिती बिघडवू शकतात.

त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास काहीही खाण्यापूर्वी खूप काळजी घेणे आवश्यक आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे बद्धकोष्ठतेपासून सुटका होण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. आपल्या आजूबाजूला असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांचे सेवन करून तुम्ही बद्धकोष्ठता दूर करू शकता.

पण तुम्हाला माहीत आहे का, दिवसाऐवजी रात्री हे पदार्थ सेवन केल्याने बद्धकोष्ठतेवर परिणाम होऊ शकतो? ह्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे रात्री खाऊन सकाळी पोट सहज साफ होतं.

बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी रात्री ह्या गोष्टी खा.

चिया सिड्स

जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी भिजवलेली चिया सीडस् खाल्ल्यास ते बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मोकळं होण्यासाठी चांगला उपाय आहे. याशिवाय, तुम्ही गरम दुधात किंवा पाण्यात मिसळून चीया सिडस्ची पावडर घेऊ शकता. पण पावडर एक चमच्यापेक्षा जास्त घेऊ नका.

त्रिफळा चूर्ण

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी ही एक प्राचीन कृती आहे. आयुर्वेदानुसार, त्रिफळा अँटीइन्फ्ल मेशनरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण खाऊ शकता. हे तुम्हाला सकाळी आतड्याच्या हालचालीत खूप मदत करेल.

मनुका आणि खजूर

दोन्ही फायबरचे उत्कृष्ट स्रोत आहेत. तसेच रात्री दुधात उकळून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. हे मल कठीण बनवते आणि आतड्यांसंबंधी हालचाल करण्यास मदत करते. हा उपाय बद्धकोष्ठतेपासूनच मोकळं करत नाहीत तर इतर अनेक आरोग्य फायदेसुद्धा देऊन जातो.

मध खा निर्धास्त व्हा

रात्रीच्या वेळी कोमट दुधात १-२ चमचे मध घालून सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तुम्हाला हवे असल्यास कोमट पाण्यात मध टाकूनही तुम्ही याचे सेवन करू शकता. यामुळे सकाळी पोट सहज साफ होईल.

इसबगोल चूर्ण

गॅस, अपचन आणि पोटाशी संबंधित इतर समस्यांवर इसबगोलच्या चूर्ण सेवन खूप फायदेशीर आहे. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपचार आहे. दुधात इसबगोल भुसा घालून रात्री झोपण्यापूर्वी खाऊ शकता. हवं असल्यास दह्यात इसबगोल भुसा घालून खाऊ शकता. यामुळे बद्धकोष्ठतेपासून लवकर आराम मिळेल.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories