हृदय चालेल! दिवसातून फक्त एवढीच मिनिटं चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होईल.

Advertisements

चालाल तर चालाल हे तुम्ही ऐकलं असेलच आता प्रत्यक्षात करण्याची वेळ आली आहे. आठवड्यातून फक्त 21 मिनिटे म्हणजेच सुमारे अडीच तास चालल्याने तुम्ही हृदयविकार टाळू शकता. दिवसातून 21 मिनिटे चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. चालणे आपल्या आरोग्यासाठी आणि शरीराच्या अवयवांसाठी फायदेशीर आहे. 

21 मिनिटे चालणे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. 21 मिनिटे चालण्याने तुम्ही हृदयविकाराचा धोका 30 टक्क्यांनी कमी करू शकता. बरेच रुग्ण व्यायाम करायला किंवा चालायला तयार नसतात. वेळ आणि उर्जेच्या कमतरतेमुळे व्यायामासाठी वेळ देणे त्यांच्यासाठी कठीण काम आहे.

अशा लोकांसाठी हा नवीन प्रयोग फायदेशीर ठरणारा आहे. फक्त व्यायाम करूनच तुम्ही निरोगी राहू शकता असे नाही. दररोज थोड्या वेळासाठी जरी चालतात तरी हृदय निरोगी ठेवता येतं.

फक्त 21 मिनिटं चाला, हृदयविकार होणार नाही

दिवसातून 21 मिनिटे चालल्याने तुम्ही हृदयविकाराचा धोका 30 टक्क्यांनी कमी करू शकता. दिवसातून 21 मिनिटे चालणे हे आठवड्यातून दोन ते अडीच तास चालण्यासारखे आहे. चालण्याने तुम्ही हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, हाय बीपी आणि उच्च कोलेस्ट्रॉल इत्यादी अनेक प्रकारचे हृदयविकार टाळू शकता. चालणे हा कार्डिओ वर्कआउटचा एक प्रकार आहे. कार्डिओ व्यायामामुळे हृदय निरोगी राहण्यात मदत होते.

हार्ट ब्लॉकेज टाळता येतात

चालणे हा सर्वात सोपा व्यायाम असल्याचं सगळेच डॉक्टर सांगतात. चालण्याने तुम्ही हार्ट ब्लॉकेजचा धोका टाळू शकता. आजच्या काळात तरुण वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे आपण पाहत आहोत.

Advertisements

अलीकडेच आपण पाहिले की गायक केके, सिद्धार्थ शुक्ला आणि सरोज खान इत्यादी अनेक मोठ्या कलाकारांच्या मृत्यूचे कारण देखील हृदयविकारामुळे होते. चालण्याची सवय तुमच्या दिनचर्येत समाविष्ट केल्यास तणाव कमी होईल, ब्लॉकेजचा धोका कमी होईल, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होईल आणि तुम्ही निरोगी जीवन जगू शकाल.

चालण्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो का?

चालण्याने वजन कमी व्हायला मदत होते. वजन कमी केल्याने बीपी नियंत्रणात राहण्यात मदत होते. कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रित राहते, त्यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

नुकत्याच येऊन गेलेल्या कोरोना नंतर हृदय निरोगी ठेवणे अधिक महत्त्वाचे झाले आहे कारण कोविडची लक्षणे अशा लोकांना त्रास देऊ शकतात ज्यांना कधीही हृदयविकाराचा झटका आला आहे किंवा हाय बीपी आणि डायबिटिस इत्यादी आजार झाले आहेत. हृदयावर कोविडचा वाईट परिणाम पाहून तुम्ही निरोगी जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करा आणि दररोज चाला.

सतत काम करणे टाळा

अनेक तास काम केल्याने हृदयविकाराचा धोका 13% वाढतो. पण जर तुम्ही चालत असाल तर तुमचे मानसिक आरोग्यही चांगले राहील. ऑफिसला जाणारे लोक अनेकदा तणावाने वेढलेले दिसतात. जर तुम्ही रोज चालत असाल तर नैराश्याची लक्षणे कमी होतील. तुम्ही ऑफिसला जात असाल तर कामाच्या दरम्यान थोडा वेळ नक्कीच ब्रेक घ्या. ब्रेक दरम्यान तुम्ही चालणे किंवा स्ट्रेचिंग करू शकता.

तज्ज्ञांच्या मते, 21 मिनिटांपेक्षा जास्त चालणे देखील फायदेशीर आहे, परंतु जे अजिबात व्यायाम करत नाहीत त्यांच्यासाठी 21 मिनिटे चालणे फायदेशीर ठरेल. तर आता निदान एवढा व्यायाम करायला काहीच हरकत नाही. लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

Advertisements

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories