बाजरी खाल्ल्यामुळे पोट दुखत असेल आणि बद्धकोष्ठता होत असेल तर तुम्ही बाजरी अशा पद्धतीने खा.

बाजरी खूप पौष्टिक आहे आपण बाजरीची भाकरी काही वेळेस खातो. पण बाजरी खाल्ल्यामुळे काही लोकांचे पोट फुगते आणि पोटाचे त्रास सुरू होतात. तर यावर काय उपाय करता येईल आणि बाजरी एवढी पौष्टीक आहे तर ती कशी सहज खाता येईल?

बाजरी योग्य प्रकारे खाल्ल्यास बद्धकोष्ठता कधीच होत नाही!

3 78

बाजरी भरड धान्य पौष्टिकतेमुळे गरजेचं आहे. पण काहींना बाजार खाल्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर नक्कीच तुम्ही बाजरी खाताना काहीतरी चूक करत आहात.

बाजरी योग्य पद्धतीने कशी खायची हे पाहूया.

4 76

बाजरीच्या बहुतेक जाती भारतात घेतल्या जातात, कारण येथील हवामान त्याच्या लागवडीस अनुकूल आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून बाजरीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे जगभरात या पौष्टिक धान्याचा वापर वाढला आहे. बाजरी उन्हाळयात शरीराला थंड ठेवतात.

- Advertisement -

बाजरी खाल्ल्यानंतर काही लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. यामुळे लोकांना खायला आवडत नाही. बाजरी खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठता टाळण्यासाठी तुम्ही बाजरी अशा पद्धतीने खा.

बाजरी तुम्ही प्रथमच खात असाल तर दिवसातून एकदाच खाल्ली पाहिजे. तुमच्या शरीराला सवय होईपर्यंत काही दिवस असच करत राहा. मग आठवडाभरानंतर दिवसातून दोन किंवा तीन वेळा तुम्ही खाऊ शकता.

बाजरीमुळे बद्धकोष्ठता होत नाही. जेव्हा तुम्ही बाजरीसारखे भरड धान्य खाता तेव्हा ते नीट चावून खाण्याचा सल्ला दिला जातो. याच्या मदतीने तुमची पचनसंस्था ते पचवण्याचे काम योग्य प्रकारे करू शकते.

- Advertisement -

बाजरी खाऊन बद्धकोष्ठता होत नाही. बाजरीची भाकरी आणि इतर पदार्थ नीट चावून खा आणि अन्न चांगलं शिजवून खाल तर शक्यतो पोटाचा त्रास होत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात बाजरी खाता तेव्हा तुम्हाला दिवसभर पुरेसं पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे.

उगाचच तुपाची भीती बाळगू नका. बाजरीच्या रोट्याला तूप लावून किंवा बाजरीच्या लापशीमध्ये चमचाभर घरचं तूप घालून आपण खाऊ शकतो. तर ही आहे बाजरी खाण्याची योग्य पद्धत. आता तुम्हाला समजली असेलच.

चला बाजरीचे काही आश्चर्यकारक फायदे पाहूया

5 75
  • बाजरी मध्ये फायबर भरपूर असल्याने लहान मुलांसाठी आणि वाढत्या वयातील तरुणांसाठी हे सुपरफूड आहे. आपल्या मुलांची वाढ चांगली होण्यासाठी बाजरी ही अतिशय पौष्टिक आहे.
  • कॅल्शियम आणि मॅग्नेशियम समृद्ध असल्याने, हाडं बळकट करते.
  • बाजरी हे उच्च अँटिऑक्सिडंट अन्न आहे, त्यामुळे बाजरी डायबिटीस मध्ये खायला चांगली आहे. त्याचबरोबर हृदयाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं.
  • ज्या लोकांना ग्लूटेनची ऍलर्जी आहे ते बाजरी खाऊ शकतात, कारण ते ग्लूटेन फ्री आहे.
  • बाजरी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे कारण ती ग्लूटेन नाही आणि अँटीऑक्सिडंट्समध्ये भरपूर आहे.
  • बाजरी, अँटिऑक्सिडेंट्सने समृद्ध असल्याने, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. त्वचा आणि केस चमकदार आणि चमकदार बनवते.
  • कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे, बाजरी हे डायबिटिस किंवा इन्सुलिन बनत नसलेल्या लोकांसाठी वरदान आहे.
  • जर पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असेल आणि तुमचं वजन वाढलय तर बाजरी खा.
  • बाजरी देखील वजन कमी करण्यास मदत करू शकते. त्यात तांदूळ आणि गव्हाच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.

तर आता ह्या सर्व गोष्टी जाणून घेतल्याने तुमची खात्री पटली असेल की ह्या सुपरफूडचा आहारात समावेश करु शकतो. पीठ आणि धान्य अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असलेल्या बाजरीचा वापर लापशी, चिल्ला, पराठा, खिचडी, उपमा, डोसा, पुलाव आणि अगदी इडली तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories