थांबा ह्या भांड्यात नका करु स्वयंपाक! देत आहात मेंदूच्या आजारांना आमंत्रण.

तुम्ही तुमच्या घरात स्वयंपाक करण्यासाठी ॲल्युमिनियम ची भांडी वापरता का, तर तुम्हाला त्याचे तोटे माहित असणे आवश्यक आहे. आपल्या खाण्यापिण्यावरच आपलं आरोग्य अवलंबून असतं. हेच आपलं खाणंपिणं आपल्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.अशावेळी तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या गोष्टींची विशेष काळजी घ्या.

कारण नुकत्याच झालेल्या एका भारतीय अभ्यासानुसार ॲल्युमिनियम च्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचे अनेक तोटे समोर आले आहेत. कारण जेव्हा ही भांडी गरम होतात तेव्हा त्यांचे कण अन्नात मिसळतात आणि शरीरात पोहोचतात आणि काही नुकसानकारक रिऍक्शन निर्माण करतात.

ह्या रीॲक्शन मुळे अल्झायमरसारखे आजारांसारख्या न्यूरोलॉजिकल आजार होऊ शकतात. ह्या व्यतिरिक्त अभ्यास देखील याबद्दल बरंनच काही सांगतो. चला जाणून घेऊया.

हा अभ्यास ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याबद्दल काय सांगतो?

गुजरातच्या एमएस युनिव्हर्सिटीच्या अन्न आणि पोषण विभागाने हा अभ्यास केला आहे. यामध्ये त्यांनी वडोदरा येथे राहणाऱ्या ६० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांचे अन्न आणि आरोग्याचा अभ्यास केला. ज्यामध्ये संशोधकांना असं आढळून आलं की ज्यांच्या घरात ॲल्युमिनियमची भांडी वापरली जात होती अशा 90 लोकांपैकी 30 लोकांमध्ये अल्झायमरची लक्षणे आढळून आली.

- Advertisement -

यामागील संशोधक विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की जेव्हा आपण ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये काही वेळ शिजवतो किंवा तळतो तेव्हा ॲल्युमिनियमचे धोकादायक कण आपल्या पोटात जातात आणि तेथे त्यांचा पचनसंस्थेवर परिणाम होतो.

ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचे इतर तोटे

ॲल्युमिनियम लोह आणि कॅल्शियमसारखे घटक शोषून घेते. त्यामुळे जेव्हा तुम्ही या भांड्यांमध्ये अन्न शिजवता तेव्हा अन्नामध्ये या गोष्टींची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. याशिवाय या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचे इतरही तोटे आहेत जसे की ॲल्युमिनियम च्या भांड्यातील अन्नामुळे ॲसिडीटी, अपचन, पोट फुगणे, त्वचेचे आजार होऊ शकतात.

म्हणून, ह्या कारणांसाठी, आपण ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे टाळा. विशेषतः जर तुम्ही पुरी तळत असाल किंवा भाज्या शिजवत असाल किंवा कोणताही मोठा स्वयंपाक बनवत असाल.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories