पांढरा भोपळा खाल्लाय कधी? का प्रसिध्द आहे जगभर चला वाचूया.

पांढऱ्या भोपळ्याला पोषक तत्वांचे पॉवरहाऊस मानले जाते.  कॅलरी कमी आणि व्हिटॅमिन ए, बी6, सी आणि ई जास्त असतात. काय आहे हा प्रकार?

हिरव्या आणि लाल भोपळ्यापेक्षा पांढरा भोपळा आरोग्यदायी आहे, जाणून घ्या त्याचे 5 आरोग्यदायी फायदे

लोक बऱ्याच भाज्या खातात पण भोपळा सहसा दुर्लक्षित केला जातो, विशेषत: मुलं आणि तरुणांना भोपळा आवडत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की भोपळा ही एक अशी भाजी आहे, ज्यामध्ये कमी कॅलरी आणि जास्त व्हिटॅमिन असतात. पिवळा, हिरवा आणि केशरी अशा भोपळ्याचे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील. 

पण तुम्ही कधी पांढरा भोपळा पाहिला आहे का? पांढरा भोपळा पिवळ्या आणि केशरी भोपळ्यापेक्षा अधिक पौष्टिक आणि चवदार असतो. परदेशात थँक्सगिव्हिंग म्हणून पांढरा भोपळा वापरला जातो. त्या देशांत असा भोपळा देणे अत्यंत शुभ मानलं जातं. कारण ही खास आहे कारण हा पांढरा भोपळा औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, जो गोड आणि खारट कोणत्याही प्रकारे सर्व्ह केला जाऊ शकतो. याचा उपयोग कोलेस्ट्रॉल आणि तणाव कमी करण्यासाठी केला जातो.

पांढऱ्या भोपळ्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.

पांढरा भोपळा आहे तरी काय प्रकार?

पांढरा भोपळ भोपळ्यासारखाच असतो, त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, फोलेट, नियासिन आणि थायामिन यांसारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पांढरा भोपळा इंग्लंडमध्ये नॉर्मली मिळतो. भारतात औषध म्हणून मिळतो. हा भोपळा मुख्यतः कोरीव काम आणि सजावटीच्या उद्देशाने वापरका जातो.  पेंटिंगसाठी तर हा सर्वोत्तम मानला जातो. 

पांढरे भोपळे ल्युमिना, बेबी बू, कॉटन कँडी आणि कॅस्पर इत्यादी अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. हा खाण्याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत.

डोळे निरोगी राहतील 

पांढऱ्या भोपळ्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन भरपूर प्रमाणात असते, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करते. हे मोतीबिंदू आणि अंधुक दृष्टीची प्रगती रोखू शकते. यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी वरदान आहे. 

कॅन्सर ची भीती कमी करा 

पांढऱ्या भोपळ्यामध्ये फायटोस्टेरॉलचे प्रमाण खूप जास्त असते. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, यामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका देखील कमी होऊ शकतो. पांढरा भोपळा 6 आणि 12 व्हिटॅमिन युक्त आहे. 

सूज कमी होते 

पांढऱ्या भोपळ्याच्या हिरव्या बियांमध्ये अँटी इन्फ्लमेशनरी गुणधर्म असतात, जे संधिवात आणि सांध्यांची सूज कमी करण्यासाठी औषधी आहेत. भोपळ्याच्या लगद्यापासून बनवलेले हर्बल काढे आतड्याची सूज कमी करण्यासाठी वापरले जातात.

रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते 

पांढऱ्या भोपळ्याच्या रसामध्ये भरपूर पोषक असतात, जे पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवून रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. रोगप्रतिकारक शक्ती सुधारून आरोग्याच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.

दम्यामध्ये फायदेशीर

पांढऱ्या भोपळ्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स श्वसनसंस्थेतील संसर्ग कमी करतात, तसेच श्वासोच्छवासाचे आजार असतील तर कमी होतात.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories