आयुष्यभर निरोगी राहायचं तर आयुर्वेदानुसार हे पदार्थ दररोज खा!

Advertisements

आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदानुसार रोज काय खावं? निरोगी राहण्यासाठी काय करावं लागतं? निरोगी राहण्यासाठी औषध आधी सुद्धा चांगलं खावं लागतं. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार, निसर्गाने आपल्याला असे काही पदार्थ दिले आहेत, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि आपण ते दररोज खाल्ले पाहिजेत. या पदार्थांना पौष्टिक पदार्थ म्हणतात, हे पदार्थ आपल्या ऊतींचे पोषण करू शकतात. हे पदार्थ हलके आणि पचायला सोपे असतात.

आपण असे पदार्थ खावेत जे शरीरातील तीन दोष (वात, पित्त, कफ) संतुलित करण्यास देखील मदत करतात. शरीरातील या दोषांचे असंतुलन झाल्यामुळेच आपल्याला आजार होतात. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही खाल्ले पाहिजेत.

आयुष्यभर निरोगी राहायचं आहे तर आयुर्वेदानुसार रोज हे 10 पदार्थ खा.

सैंधव मीठ

3 84

पांढरे मीठ जर आरोग्यासाठी धोकादायक आहे तर सैंधव मीठ अमृतासमान आहे. पांढऱ्या मिठाच्या तुलनेत सैंधव मीठ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अनेक खनिजे रॉक सॉल्टमध्ये आहेत जी आपल्याला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. सैंधव मिठाचा थंड प्रभाव असतो, जो आपल्या शरीरातील उष्णता काढून टाकायला मदत करतो. इतकच नाही तर त्याच्या कूलिंग इफेक्टमुळे पित्त दोष दूर करण्यासाठीही रॉक सॉल्ट फायदेशीर आहे.

लाल तांदूळ

4 82

पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत लाल तांदळात जास्त पौष्टिक घटक असतात. लाल भातामध्ये लोह,मॅंगनीज, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स चांगल्या प्रमाणात असतात.

हे तुमचे चयापचय गतिमान करतात, शरीरातील पेशी निरोगी ठेवतात. तसेच वजन वाढणे, डायबिटीस हृदयविकार आणि श्वसनासंबंधी आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय सूज, ॲलर्जी आणि फ्री-रॅडिकल्सशी लढण्यासाठी देखील हे तांदूळ उपयुक्त आहेत.

हिरवी मूग डाळ

5 81

मूग डाळीमध्ये प्रोटिन्स, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन बी-6, नियासिन, थायामिन आहेत. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. हिरव्या मूगडाळीत पुरेशा प्रमाणात फायबर असल्याने आपली पचनक्रिया एकदम ठणठणीत राहते. फिरवीन गाडीवर रोज काल मला अनेक आजारांपासून दूर ठेवते आणि शरीराला एनर्जी देते.

देशी गाईचं तूप

6 72

देशी गाईचं तूप हेल्दी फॅट्सचा चांगला स्रोत आहे. याशिवाय अनेक जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा ३ ॲसिड आणि संयुग्मित इनोलिक ॲसिडही त्यात चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे मेंदू, हाडं बळकट राहतात, वजन नियंत्रणात राहतं, दृष्टी वाढते आणि गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

Advertisements

आवळा

7 65

आवळा हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे. आवळ्याला आयुर्वेदात अमृतफळ म्हटलं गेलं आहे. कारण तो रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो आणि सर्दी, ताप, विषाणूजन्य संसर्गाचे आजार टाळायला मदत करतो. तुमचे त्वचा, केस, पोटाशी संबंधित समस्यांवर आवळा हे उत्तम औषध आहे. हाडं, डायबिटिस, रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी देखील आवळा फायदेशीर आहे.

देशी गायीचे A2 दूध

8 37

A2 गाईचे दूध अतिशय आरोग्यदायी आहे. A2 जातीचे दूध देशी गायीपासून मिळते. त्यात A1 प्रकारच्या दुधापेक्षा (सामान्य दूध) जास्त प्रोटीन आणि पोषक घटक असतात. हे दूध दररोज प्याल डायबिटिस, हृदयविकार आणि न्यूरोलॉजिकल विकारांना प्रतिबंधित करते, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि गंभीर आजारांपासून दूर ठेवते.

मध

9 23

मधामध्ये सूज कमी करणारे अँटी इन्फ्लेमेशनरी, अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. तसेच, मधामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, कार्बोहायड्रेट्स, एमिनो ॲसिड यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो. एक लहान चमचाभर मध दररोज खाल तर रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि सर्दी, व्हायरल इन्फेक्शन सारखे आजार दूर राहतात.

बार्ली किंवा बाजरी

10 18

बार्ली हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर धान्य आहे आणि त्यात असलेले गुणधर्म शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. बार्लीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे वजन कमी करण्यासाठी आणि पचन तंत्र मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. बार्लीमध्ये कॅलरी, प्रोटीन्स, कॅल्शियम, फॅट, लोह, कार्बोहायड्रेट, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम पुरेशा प्रमाणात आढळतात.

डाळिंब

11 11

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी डाळिंब खूप फायदेशीर आहे. डाळिंबात अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे तुम्हाला आजारांपासून वाचवण्यासाठी फायदेशीर असतात. डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात जे तुमची त्वचा सुधारण्यात मदत करतात.

मनुका

12 7

मनुका खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते, हाडं मजबूत करते, पचनाला मदत करते. मनोज जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार नसेल तर तुम्ही रात्री मनुका भिजवून सकाळी खाऊ शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories