आलं घरोघरी असावं. कोरोनाच्या साथीमध्ये आयुष मंत्रालयाने आल्याचा वापर कसा करावा याचा एक मार्ग सुचविला आहे.
आल्याला इतकं महत्व का आहे?
आलं हे औषधी गुणधर्म आणि आरोग्य फायद्यांसाठी घरोघरी प्रसिद्ध आहे. आयुर्वेद आणि चायनीज औषधांव्यतिरिक्त, अनेक आणि आजारात पटकन् बरे वाटण्यासाठी आजीच्या बटव्यातलं औषध म्हणजे आलं. ऋतू बदलासोबत उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आल्याचं सेवन आयुर्वेदात करायला सांगितलेलं आहे.
आल्याचा वापर ताजं आलं आणि सुंठ पावडरच्या स्वरूपात केला जाऊ शकतो. दुसरीकडे, आल्याचा चहा भारतात सर्वांनाच खूप आवडतो. म्हणूनच आलं आपला देशी उपाय आहे. अलीकडेच, आयुष मंत्रालयाने आल्याचे सेवन करण्याचा एक मार्ग सुचवला आहे जो सोपा आणि प्रभावी आहे.
आयुष मंत्रालयाने का सांगितलं आहे आलेपाक खा?
अदरक बर्फी किंवा आले पाक वापरण्याची सूचना आयुष मंत्रालया सोशल मीडिया पेजवर करण्यात आली आहे. आले पाक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आयुषने सविस्तरपणे सांगितले. त्याच वेळी, त्याच्या सेवनाच्या आरोग्य फायद्यांशी संबंधित माहिती सुद्धा लोकांसोबत शेअर केली आहे. पण आलेपाक खाण्याचे असे कोणते फायदे आहेत.
आले पाक खाण्याचे फायदे
आले पचनतंत्रासाठी खूप फायदेशीर ठरू शकते कारण, या मसाल्याच्या पदार्थांमध्ये पचनशक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत. आले पाक खाल्ल्याने भूक वाढते आणि भूक वाढल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात पोषक तत्व अन्नाद्वारे पुरवणे सोपे होते. म्हणजेच खाल्लेले अन्न पचते आणि त्याचा शरीराला फायदा होतो.
हिवाळ्यात घसा खवखवणे, घसा दुखणे आणि इतर त्रास होतातच. आले पाकचे सेवन केल्याने या समस्यांपासून आराम मिळतो. आल्यामधील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म सर्दी आणि फ्लूसारख्या लक्षणांपासून देखील आराम देतात.
ह्या लोकांनी आले पाक खाऊ नये
काही लोकांनी आलेपाक खाताना खबरदारी घ्यावी, असही आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. आयुष मंत्रालयाच्या मते, आले पाकाचा उष्ण प्रभाव पडतो आणि म्हणूनच जर योग्य प्रमाणात काळजीपूर्वक आलेपाक खाल्ला नाही तर नाही तर आरोग्यासाठीही अपायकारक ठरू शकतो.
ज्या परिस्थितीत आयुष मंत्रालयाने आले पाक न खाण्याचा सल्ला दिला त्या पुढीलप्रमाणे आहेत
आले पाक रिकाम्या पोटी खाऊ नये. ॲसिड पेप्टिक विकार किंवा संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी आले पाक खाऊ नये. आल्याचे आरोग्य फायदे मिळवण्यासाठी, तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्या रोजच्या आहारात आल्याची चटणी, आल्याचा चहा आणि आल्याचा पाक खाऊ शकता.