करवंदाला कोकणची काळी मैना म्हणतात. करवंद हे लहान आकाराचे आंबट फळ आहे, ज्याचे फायदे फार कमी लोकांना माहिती आहेत. म्हणूनच आज या लेखाच्या माध्यमातून आपण करवंद खाल्ल्यानं होणारे फायदे पाहणार आहोत. तुम्हीही कधीतरी करवंद खाल्लं असेलच, हे एक आंबट फळ आहे जी काटेरी झुडपात सापडतात.
हलक्या लाल आणि गुलाबी रंगाचे हे छोटे फळ खायला आंबट गोड आहे खरं पण यातून मिळणारे फायदे खूपच आश्चर्यकारक आहेत. करवंदाचं लाल गुलाबी काळसर फळ खाल्ल्याने शरीरातील अनेक मोठे आजार दूर होतात आणि त्याचबरोबर शरीराची अनेक कार्ये योग्य प्रकारे कार्य करू लागतात.
विविध जीवनसत्त्वे आणि इतर अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेले हे फळ मुलांनाही खाऊ घालणे आवश्यक आहे. म्हणून असं फळ घरात असायलाच हवं ना! त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बाजारात जाल तेव्हा करवंद फळ शोधून आणा. करवंद खाऊन नक्की काय फायदे होतात चला जाणून घेऊया.
करवंद खाऊन काय फायदे होतात?
पचन सुधारण्यासाठी
ज्याचं पचन चांगलं आजारांपासून राहतो दूर. कोणताही आजार टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी सर्वप्रथम पचनक्रिया व्यवस्थित असणे आवश्यक आहे. आजकाल व्यस्त जीवनशैलीत आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होत आहे.
त्यामुळे आपल्याला अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा लागतो, ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. अशा परिस्थितीत, आपल्या आहारात करवंद समाविष्ट करणे हे पचन सुधारण्यासाठी एक स्मार्ट पाऊल असू शकतं.
शरीराची सूज दूर करण्यासाठी
अनेक वेळा शरीराच्या अंतर्गत भागात सूज येते, जी कोणत्याही इमेजिंग चाचणीशिवाय दिसत नाही आणि त्यामुळे समस्याही निर्माण होतात. अशी सूज काही वेळा गंभीर आजाराचे कारण बनते, ज्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
त्यामुळे तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणेही महत्त्वाचे आहे, ज्यामुळे सूज आणि लालसरपणा यासारख्या समस्या दूर राहतात. तुमच्या आहारात करवंदचा समावेश करुन सूज येण्याच्सारखा सर्व समस्यांपासून सुटका मिळू शकते.
मानसिक आजार करवंद खाऊन कमी होतात
धावपळीने भरलेल्या आयुष्यात ऑफिस घर पैसा मुलं यासोबतच ताण आणि नैराश्य येतं. हे मानसिक आजार असे आहेत, ज्यावर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे आणि योग्य पद्धतीने न हाताळल्यास गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.
करवंद मानसिक आरोग्य सुधारते, ज्यामुळे तणाव आणि नैराश्य यासारख्या समस्या दूर व्हायला मदत होते. तुम्ही तुमच्या आहारात करवंदचाही समावेश केला पाहिजे.
या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही पहिल्यांदाच करवंद खाणार असाल तर एकाच वेळी जास्त खाऊ नका. काहीवेळा लोकांना नवीन गोष्टीची ॲलर्जी असू शकते, म्हणून सुरुवातीला करवंद कमी प्रमाणात खा. फळे इत्यादींची ॲलर्जी होणे हे फार क्वचित प्रसंगी दिसून येत असले तरी तरीही डॉक्टरांच्या सांगण्यानुसार करवंद खायला सुरू करा.