बदलत्या जीवनात मानवी शरीराला अनेक असंख्य अश्या आजाराची लागण झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बदलत्या काळात मनुष्याचे अवेळी जेवन, उशिरा झोपणे, उशिरा उठणे परिणामी पित्तचा त्रास होतो.
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पोटाचे वाढते विकार वाढत असल्याचे तज्ञांमार्फत सांगितले जाते.
मात्र, एका उपायाने हे आजर बरे होतील हा उपाय पुर्णपणे आयुर्वेदिक असून याने तुमचे वाढलेले वजन, स्थुलपणा, पोटाचा वाढलेला घेरा, मांड्या, नितंब या ठिकाणी वाढलेले चरबी कमी होण्यास सुरुवात होईल.
तसेच ज्यांना पोट साफ होण्याची किंवा गॅसची समस्या आहे किंवा पचन तंत्र ठीक नसेल हे सर्व या उपायाचे पूर्ववत होण्यास मदत होते. याने शरीरातील वात, कमी पडलेले कॅल्शिअम यांची उपयुक्तता भरून काढण्यासाठी हा उपाय महत्वाचा ठरतो.
यासाठी सर्वात आधी काळे मीठ लागणार असून याने पोटाचे विकार, सदी, खोकला, पोट साफ न होणे यासाठी हे काळे मीठ उपयुक्त ठरते. या मिठाचा लहान तुकडा घेऊन तो पावडरी प्रमाणे बारीक करायचा आहे. याचे 3 ते 5 ग्रॅम अशी मात्रा घ्यायची आहे. तसेच दुसरा पदार्थ म्हणजे या उपायांसाठी आपल्याला बडीशेप लागणार आहे.
कारण यामधे व्हिटीमीन C मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामध्ये प्रामुख्याने कॅल्शिअम, सोडियम, फोसफरर्स आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. तसेच डोळ्याची कार्यशक्ती आणि स्मरण शक्ती वाढते. हे 5 ग्रॅम लागणार आहे.
यानंतर लागणार पदार्थ म्हणजे, आपल्याला ओवा लागणार आहे. कारण पोटाच्या सर्व आजारावर हा कार्यशीलपणे उपाय करत असतो. याचा उपयोग पोटातील गॅस कमी करण्यासाठी आणि पोटातील जंत मारण्यासाठी होतो. यातील थोयमोल या घटक मूळव्याध ही समस्या कमी करण्यासाठी मदत करतो.
तर या उपायांसाठी एक चमचा हा आयुर्वेदिक ओवा लागणार आहे. त्यानंतर लागणार आहे जिरे. कारण यामुळे पचनतंत्र सुधारते, पोटाच्या समस्या दूर होतात. गॅस व वात यावर हे गुणकारी आहे. याने पचन क्षमता वाढते.
तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जिरे आणि ओवा भाजुन घायचा आहे. जे काही साहित्य असेल त्यामध्ये भाजलेले जिरा आणि ओवा टाकुन घ्या आणि यात बडीशेप आणि काळे मीठ घालून याची बारीक पावडर होऊ पर्यत कुटून घायचे आहे आणि शेवटी एक ग्लास गरम पाण्यात हे एक चमचा पावडर मिसळून घ्याची आहे.
एक चमचा एक वेळेस असे रोज संध्याकाळी जेवून झाल्यानंतर 30 मिनिटांनी घायची आहे. असा हा उपाय 15 दिवस करायच्या आहे. या आयुर्वेदिक उपायामुळे सर्व आजार कमी करण्यासाठी मदत होईल.