तुम्ही जेवणासाठी कोणतंही महागडं तेल वापरत असलाही पण खोबरेल तेल काही दिवस वापरून पहा. बरेच लोक खोबरेल तेल पूर्वीपासून जेवणात वापरतात. खोबरेल तेलाच्या अँटी-मायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे, हे तेल त्वचेचे आरोग्य आणि वजन कमी करण्यासाठी देखील उत्तम आहे. त्याच्या इतर फायद्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आपल्या घरी स्वयंपाकासाठी तेल निवडताना तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की असे कोणतं तेल घ्यावे जे वजन नियंत्रित राखण्यासाठी उपयुक्त आहे. खोबरेल तेल तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. कारण त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी यांसारख्या आवश्यक पोषक घटकांसह अँटी-मायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे तुम्हाला आतून निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत.
पण तुम्हाला माहित आहे का? की कोणत्या आजारामध्ये खोबरेल तेल खाणं खूप फायदेशीर आहे. ह्या फायद्यांसाठी खोबरेल तेल तुमच्या जेवणात वापरा
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा
रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी नारळाचे तेल फायदेशीर ठरू शकते. यामध्ये आढळणारे पोषक तत्व तुमच्या साखरेची पातळी संतुलित ठेवतात. 2009 मध्ये ऍनिमल स्टडीजमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, खोबरेल तेलामध्ये आढळणारी सॅच्युरेटेड फॅट इन्सुलिन वाढू देत नाहीत. त्यामुळे शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर
शारीरिक आरोग्य निरोगी ठेवण्यासोबतच खोबरेल तेल मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. नारळाच्या तेलात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे ते तणाव कमी करण्यास मदत करते. यासोबतच नारळाच्या तेलातील पोषक तत्त्वे नैराश्याच्या समस्येवर मदत करत असल्याचेही संशोधनात आढळून आलं आहे.
गुड कोलेस्ट्रॉल वाढवा
खोबरेल तेल नियमित खाल्ल्याने तुमच्या शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यात मदत होते. ह्याच कारण म्हणजे नारळात आढळणारे कंपाऊंड मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स (एमसीटी) शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यात मदत करतात. खोबरेल तेल 8 आठवडे नियमित खाल्लं तर चांगले परिणाम मिळू शकतात.
लिव्हरचे रोग दूर राहतात
लिव्हरशी संबंधित आजारांमध्ये खोबरेल तेल हा एक चांगला पर्याय असू शकतो. वायली ऑनलाइन लायब्ररीतून उंदरांवर केलेल्या संशोधनात आढळून आलं कोणताही त्रास असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित खोबरेल तेल खाऊ शकता.
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
खोबरेल तेलाचा वापर दीर्घकाळापासून घरगुती उपचारांसाठी केला जात आहे. त्यात व्हिटॅमिन सी आणि ओमेगा ३ फॅट एसिड आहेत. ज्यामुळे त्वचा आणि केस बाहेरून सुधारतात आणि आतून निरोगी राहतात.
वजन कमी करण्यात मदत होते
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी उत्तम स्वयंपाकासाठी तेल शोधत असाल तर खोबरेल तेल हा एक चांगला पर्याय असू शकतो.नारळाच्या तेलातील सॅच्युरेटेड फॅट मिडीयम चेन ट्रायग्लिसराइड्स (MCT) भूक नियंत्रित करण्यास मदत करतात ज्याने तुम्ही तुमच्या पुढच्या जेवणात कमी कॅलरीज खाऊ लागता.
म्हणून वजन कमी करण्याच्या डायट मध्ये खोबरेल तेल वापरायला सुरुवात करा.