तुमच्या शरीरात हे बदल दिसले तर समजून जा. तुम्ही जास्त कोमट पाणी पीत आहात.

हिवाळ्यात लोक इतर दिवसांपेक्षा जास्त पाणी पितात. परंतु, ते अन्ननलिका आणि शरीराला अनेक प्रकारे नुकसान पोहोचवू शकतं. मित्रांनो, तुमच्या शरीरात हे 3 बदल दिसले तर समजून घ्या तुम्ही जास्त कोमट पाणी पीत आहात, जाणून घ्या दिवसात किती ग्लास प्यावं?

अती कोमट पाण्यामुळे नुकसान होऊ शकतं.  सध्या संपूर्ण भारतात थंडी पडत आहे. अशा परिस्थितीत हिवाळ्यात थंडीच्या दिवसात लोक कोमट पाणी पीत आहेत. काही लोक थंडी जाणवू नये म्हणून सतत कोमट पाणी पितात. पण कोमट पाणी पिणे चांगलं आहे, परंतु, हिवाळ्यात, आपण बरेचदा ते जास्त पिण्याची चूक करतो. त्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. चला जाणून घेऊया कोमट पाणी पाण्याचे तोटे आणि त्रास.

अन्ननलिकेचं नुकसान होऊ शकतं

अन्ननलिकेला जास्त कोमट पाण्याने त्रास होतो. अति कोमट पाणी प्यायल्याने अन्ननलिकेचे नुकसान होऊ शकते. ही एक नळी आहे जी तोंडातून पोटात जाते. त्यामध्ये लहान दाणे बाहेर येऊ शकतात, ज्यामुळे जळजळ होऊ शकते. तसेच, ही वेदना आणि जळजळ दीर्घकाळ टिकते.

मल कोरडा होतो 

जास्त कोमट पाणी पिण्याचे अनेक तोटे आहेत. कारण यामुळे, तुमचा मल कोरडा होऊ शकतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. खूप कोमट पाणी प्यायल्याने पोटाचं तापमान वाढतं आणि त्यामुळे मल कोरडा होतो. याशिवाय यामुळे मूळव्याधीचा असाध्य त्रास सुरु होऊ शकतो. 

निर्जलीकरण/ डीहायद्रेशन 

जास्त कोमट पाणी पिऊन तुमची तहान जात नाही. परिपूर्णतेची भावना मिळत नाही. ज्यामुळे निर्जलीकरण होऊ शकतं.यामुळे डिहायड्रेशनची समस्या सतावू शकते. तुमचे ओठ कोरडे होऊ शकतात आणि पाय दुखू शकतात.

पाचक प्रणाली बिघडू शकते.

कोमट पाणी आपल्या पचनसंस्थेसाठी काही प्रमाणात आरोग्यदायी आहे. परंतु, जेव्हा तुम्ही ते जास्त प्रमाणात पिता तेव्हा ते पचन प्रक्रियेवर परिणाम करतं आणि पाचक एन्झाईम्स धुवून जातात. तसेच जास्त कोमट पाणी पोटातील चांगल्या बॅक्टेरियाचं नुकसान करते, ज्यामुळे पचन प्रक्रियेवर परिणाम होतो.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories