तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील, वेलची खूपच फायदेशीर आहे. १०१% खात्रीशीर व अनुभवी उपाय.

वेलची खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित व्हायला मदत होते, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी वेलची कशी खावी हे तज्ज्ञांकडून जाणून घ्या. रक्तदाब/ ब्लड प्रेशर अनियंत्रित असणे ही अतिशय गंभीर समस्या आहे. रक्तदाब नियंत्रणात नसेल तर हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, किडनी निकामी होण्याबरोबरच इतर अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. अनेकदा उच्च रक्तदाबाचे निदान झालेले लोक बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांचा अवलंब करतात.

पण आपल्यापैकी बहुतेकांना माहित नाही की रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचं पालन करणे खूप महत्वाच आहे, त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे आपला आहार. तुम्ही काय खात आहात किंवा नाही, तेही बीपी नियंत्रित करण्यात महत्त्वाचं आहे.

तुमच्या आहारात वेलचीचा समावेश करणे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं हे तुम्हाला कदाचित माहीत असेल. डॉक्टरांच्या मते वेलची एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे, वेलचीमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. या लेखात आपण ह्यांवर सखोल माहिती घेऊ.

ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी वेलची कशी फायदेशीर आहे?

3 102

शिरा आणि इतर गोड पदार्थात वापरल्या जाणाऱ्या वेलचीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरससारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी वेलची आहारात समाविष्ट करणे महत्वाचे आहे. कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे रक्तदाब नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावतात.

त्यामुळे पूर्ण वेलचीचे दाणे किंवा चूर्ण स्वरूपात दीर्घकाळापर्यंत वेलची खाल्ली उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना खूप फायदा होतो. तीन महिने दररोज 1.5 ग्रॅम वेलची दिवसातून दोनदा खाल्ल्याने पहिल्या टप्प्यातील उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये रक्तदाबाची पातळी कमी होते. हे अनुभवी सत्य आहे.

वेलची खाण्याचे इतरही भरपूर फायदे

वजन नियंत्रित राहील

4 104

वेलचीमध्ये आहारातील फायबर असते जे चयापचय metabolizm गतिमान करते. यामुळे वेलची खात असाल फारशी भूक लागत नाही. पचन चांगलं होतं. वजन कमी करू पाहणाऱ्या लोकांसाठी वेलची अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

रोग प्रतिकारशक्ती सुधारते

5 103

निरोगी राहण्यासाठी मजबूत रोग प्रतिकारशक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. वेलचीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंटमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, ताप, व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी करण्यास मदत होते.

हृदयविकाराचा धोका कमी होतो

6 97

वेलचीचे सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो. वेलचीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

चांगली झोप

7 81

वेलचीचे सेवन केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची गरम पाण्यात उकळून पाणी थंड केल्यानंतर सेवन करा. त्यामुळे चांगली झोप येते आणि घोरणेही कमी होते.

ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी वेलची कशी खावी.

8 56

तुम्ही वेलचीचे थेट खाऊ शकता, ती एक उत्तम माउथ फ्रेशनर म्हणून काम करते आणि तुम्हाला ताजे श्वास देते. तुम्ही वेलचीच्या बिया थेट चावून खाऊ शकता. तुम्ही वेलची चहा घेऊ शकता किंवा तुमच्या भाज्या आणि इतर पदार्थांमध्ये वेलची घालू शकता. यासाठी तुम्ही संपूर्ण वेलचीच्या बिया किंवा पावडर वापरू शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories