जास्त वेळ बसल्याने वाढतो लवकर मृत्यू आणि हृदयविकाराचा धोका! पण काम बसूनच असेल तर काय करावं?

तुम्ही कसं काम करता बसून की शारिरीक दृष्ट्या ॲक्टीव्ह राहून? कारण दिवसातून 6 ते 8 तास बसल्याने हृदयविकाराचा धोका आणि अकाली मृत्यूचा धोका 12 ते 13 टक्क्यांनी वाढतो आणि 8 तासांपेक्षा जास्त बसल्याने हा धोका जास्त वाढू शकतो. शरीराला व्यायाम आणि विश्रांती या दोन्हीची समान प्रमाणात गरज असते आणि यापैकी कोणतेही कमी-जास्त केली तर आरोग्यासाठी वाईट असू शकते. जास्त वेळ बसल्याने शरीर अनेक रोगांचे घर बनू शकते.

तुम्हाला माहित आहे का? जे लोक जास्त वेळ बसतात त्यांना हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो. हे संशोधन वॉशिंग्टनमधील सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आले असून 21 देशांतील सुमारे 1 लाख लोकांनी यात भाग घेतला होता. म्हणूनच जे लोक दिवसातील 6 ते 8 तास बसतात त्यांना हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा धोका 12 ते 13 टक्क्यांनी वाढतो.

आणि जे लोक 8 तासांपेक्षा जास्त वेळ बसतात, त्यांना या समस्यांचा धोका 20 टक्क्यांनी वाढतो. एवढच नाही तर अभ्यासात असेही आढळून आले आहे की, जर एखादी व्यक्ती जास्त बसण्यासोबतच शारीरिकदृष्ट्या सक्रिय असेल तर त्याच्यासाठी या समस्यांचा धोका कमी होतो.

आपण किती वेळ एका जागी बसू शकतो?

3 101
- Advertisement -

हे पूर्णपणे तुमच्या शारीरिक हालचालींवर अवलंबून आहे. तसं पाहायला गेलं तर जे लोक सतत 4 तास बसतात त्यांना धोका आहे असे मानलं जातं. आणि जे कमी वेळ बसतात त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. मात्र नुसतं एका जागी न बसता जर जवळील शारीरिक व्यायाम करत असाल तर जास्त वेळ बसल्याने तुम्हाला तसा धोका नाही.

बराच वेळ बसावं लागलं तर काय करावं?

4 99

आपण बऱ्याच गोष्टी एका जागी बसल्याशिवाय करू शकत नाही त्यामुळे नाईलाज म्हणून कधीकधी एका जागी बराच वेळ बसावं लागतं. म्हणून तुम्हाला बसण्याच्या वेळेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही, तुम्ही शारीरिकदृष्ट्या किती सक्रिय आहात हे पाहावं लागेल.

जर तुम्ही कोणतही असं काम करत असाल, ज्यामध्ये बराच वेळ बसून राहावं लागत जसे की कॉम्प्युटरवर काम करणे किंवा दुकानात बसणे इत्यादी, तर तुम्हाला स्वतःला सक्रिय ठेवण्याचा मार्ग देखील शोधावा लागेल. तुम्ही दर तासाला एकदा उठून थोडावेळ चालून या आणि स्ट्रेचिंग करू शकता. यासोबतच सकाळ संध्याकाळ थोडा व्यायामही करा.

शारीरिकरित्या सक्रिय कसं व्हावं?

5 98
- Advertisement -

शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, ज्या तुमच्या शरीराचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहेत. पण नेमकं शारीरिक दृष्ट्या ॲक्टिव्ह कसा राहायचं?

शारिरीक दृष्ट्या ॲक्टिव्ह राहण्यासाठी एवढंच करा

6 87
  • रोज रात्री वेळेवर झोपा आणि सकाळी वेळेवर उठा
  • रात्री पुरेशी झोप घ्या आणि दिवसा झोपायची सवय लावू नका.
  • रोज सकाळी ताज्या हवेत फेरफटका मारा
  • दररोज व्यायाम करा
  • तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि ध्यान करा
  • चांगला आहार घ्या आणि पुरेसं पाणी प्या
  • बाहेरचं अन्न, तळलेलं आणि खूप मसालेदार पदार्थ खाऊ नका.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories