ह्रदय तरुण ठेवणारा सुकामेवा नक्की कोणता? काजू, बदाम की अक्रोड?

हृदयाला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी रोज खावे हे ड्रायफ्रूट्स आपलं आयुष्य दीर्घायुषी आणि निरोगी असावं अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. दीर्घायुष्यासाठी हृदय निरोगी ठेवणे आवश्यक असून हृदय निरोगी ठेवण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात काही खास ड्रायफ्रुट्सचा समावेश करू शकता.

ड्रायफ्रूट्स तुमच्या संध्याकाळच्या स्नॅकसाठी किंवा हलक्या-फुलक्या भुकेसाठी एक पौष्टिक पर्याय असू शकतो. ड्रायफ्रूट्समध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन आणि अनेक प्रकारची खनिजे आहेत म्हणूनच ड्रायफ्रूट्स नियमित खाल तर हृदयाच्या आजारांपासून दूर राहाल.

पण ड्रायफ्रूट्स हृदयासाठी पौष्टिक का असतात?

3 102

ठराविक प्रमाणात ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी, रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते. यामुळे हार्ट ब्लॉकेज, हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते.

चला तर मग आज जाणून घेऊया त्या ठराविक ड्रायफ्रूट्स बद्दल जे तुमच्या हृदयाला आजारांपासून दूर ठेवण्यासाठीच नव्हे तर शरीरासाठीही फायदेशीर मानले जातात.

शेंगदाणे हृदयासाठी चांगले आहेत

4 100

शेंगदाण्यामध्ये प्रोटिन्स पुरेशा प्रमाणात आहेत. एक वाटी शेंगदाणे खाल तर पोट बराच काळ भरलेलं राहील. ज्यामुळे वजन नियंत्रित राहायला मदत होते. जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, आठवड्यातून दोनदा शेंगदाणे मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोका 15 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

काजू हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत

5 99

बरेच लोक म्हणतात आम्ही कोणते ड्रायफ्रूट्स खावेत जे हृदयासाठी गरजेचे आहेत. निरोगी ह्रद्यासाठी काजूमध्ये अ‍ॅसिड असतं जे हृदय मजबूत करायला आवश्यक असतं. यासोबतच काजूमध्ये आयर्न, झिंक, कॉपर, मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. दररोज ७ ते ८ काजू खाल्ल्याने हृदयविकार टाळता येतो.

ह्रदय आणि बुद्धीसाठी अक्रोड

6 88

जेव्हा बुद्धी तीक्ष्ण बनवण्याचा विचार येतो तेव्हा आपले पूर्वज अक्रोड खाण्याचा सल्ला देतात. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडने समृद्ध असलेले अक्रोड हृदय आणि मेंदू या दोन्हींसाठी फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोस्टेरॉल असतात जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. दररोज 1 ते 2 अक्रोड खाल्ल्याने हार्ट ब्लॉकेजची समस्या दूर राहते.

बदाम हृदयासाठीही आरोग्यदायी असतात

7 78

बदामामध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि प्रथिने असतात, ज्यामध्ये असंतृप्त चरबी असते. ते शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांना दररोज बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. बदाम नियमित खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories