पचनशक्ती चांगली ठेवा, स्वतःला आणि मुलांना ह्या चांगल्या सवयी लावा. पोट राहील कायम ठणठणीत आणि आरोग्य सुधारेल.

पचन चांगलं व्हावं म्हणून आपण बरेच उपाय करतो. पचनक्रिया चांगली ठेवायची असेल, तर आजपासून ह्या काही आरोग्यदायी सवयी लावा. पोट नेहमी निरोगी राहील आणि अपचनाचा त्रास अजिबात होणार नाही. आपल्यापैकी बहुतेकांना दररोज पोट किंवा पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि रोजच्या जगण्यातल्या चुकीच्या सवयींमुळे पोट खराब होणे, पोटात गॅस होणे, फुगणे, छातीत जळजळ, मळमळ, बद्धकोष्ठता आणि अतिसार यासारखे त्रास सुरु होतात.

थांबा. जर एखाद्या व्यक्तीला कायमच पोटाशी संबंधित समस्या किंवा खराब पचनाचा त्रास होत असेल तर त्यामुळे शरीरात गंभीर आजार होतात. आपल्या एकूण आरोग्यासाठी आतडे निरोगी ठेवणे खूप गरजेचं आहे. जर आपलं पोट निरोगी असेल तर आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहतो.

जेव्हा पचनाच्या आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही काय खाता आणि काय नाही हे महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, आपल्या अनेक सवयी पचनशक्ती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कोणत्या आहेत ह्या चांगल्य सवयी ?

पचन सुधारण्यासाठी तुम्ही सर्वात सोपी गोष्ट करू शकता ती म्हणजे आपल्या काही साध्या सवयी बदलणे. पचन सुधारू शकतील अशा सवयींबद्दल जाणून घेणार आहोत, पचन सुधारण्यासाठी दररोजस्वतःला ह्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत.

- Advertisement -

पचन सुधारू शकतात ह्या आरोग्यपूर्ण सवयी

1. आहारात बदल करा

3 124

जर तुम्हाला अधूनमधून, वारंवार किंवा जुनाट पचनाची लक्षणे जाणवत असतील तर, साधा आहार आणि बदल तुमचे पचन सुधारण्यास मदत करू शकतात. फायबर, हेल्दी फॅट्स आणि पोषक तत्वांनी समृध्द संपूर्ण आहार घेणे ही चांगली पचनशक्तीच्या दिशेने पहिली पायरी आहे.

याव्यतिरिक्त, प्रीबायोटिक्स देखील एक प्रकारचे फायबर आहेत जे आपल्या आतड्यांमधील निरोगी जीवाणूंना फीड करतात. प्रोबायोटिक्स आतड्यांतील दाहक परिस्थितीचा धोका कमी करण्यात मदत करतात. अनेक फळे, भाज्या आणि धान्यांमध्ये प्रीबायोटिक्स आढळतात.

2. तुमच्या आहारात हेल्थी फॅट्स खा

4 124

हेल्दी फॅट्सचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे, ते फक्त तुमच्या पचनासाठीच फायदेशीर नसतात तर इतर अनेक आरोग्यदायी फायदे देखील देतात. ओमेगा-३ फॅटी ऍसिड असलेले पदार्थ जसे की फ्लेक्ससीड्स, चिया सीड्स, नटस – विशेषत: अक्रोड खा. याशिवाय तूप हेल्दी फॅट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. ओमेगा-३ फॅटी सिड्स आतड्यांमधील जळजळ कमी करण्यास मदत करतात.

3. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा

5 123

रात्री उशिरा खाणे टाळा, रात्री 8 च्या आधी जेवण करण्याचा प्रयत्न करा. दिवसभर काही शारीरिक हालचाली करा आणि सक्रिय रहा. तुमचा नाश्ता किंवा दिवसाचे इतर आवश्यक जेवण वगळू नका. जेवणानंतर लगेच झोपू नका, सर्वसाधारणपणे तुमची पचनशक्ती सुधारण्याचा आणि आम्ल रिफ्लक्स कमी करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.

- Advertisement -

4. फायबर युक्त आहार घ्या

6 115

पचन सुधारण्यासाठी आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थ अत्यंत आवश्यक आहे. ओट ब्रान, शेंगा, सुका मेवा आणि बियांमध्ये विरघळणारे फायबर आढळतात, तर भाज्या, संपूर्ण धान्य आणि गव्हाचा कोंडा हे अघुलनशील फायबरचे चांगले स्रोत आहेत.

जर एखाद्या व्यक्तीने जास्त प्रमाणात फायबरयुक्त आहार घेतला तर त्यांना पोटात अल्सर, रिफ्लक्स, मूळव्याध आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) होण्याचा धोका कमी असतो आणि त्यांची पचनक्रिया चांगली होते. तर आजपासून भाज्या खात जा.

5. लक्षपूर्वक खा आणि व्यायाम करा

7 96

जेवताना टीव्ही पाहू नका किंवा मोबाईल किंवा लॅपटॉप वापरू नका. अन्न चांगले चावून खा आणि पूर्ण खा. ताण आणि दररोज व्यायाम करा. तर आजपासून स्वतःला शिस्त लावा आणि पचनासाठी ह्या सवयी पाळा.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories