हिंग दुधात मिसळून प्यायला तर काय होईल माहित आहे का? वाचा.

हिंग हा अँटीबॅक्टेरियल पदार्थ आहे आणि बुरशीविरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे जे शरीरासाठी अनेक प्रकारे उपकारक आहेत. त्यामुळे अनेक जुन्या घरगुती उपचारांमध्ये याचा वापर केला जातो.

हिंग आणि दूध औषध आहे का?

3 111

हिंग आणि दुधाचे मिश्रण ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल, परंतु हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. खरंतर, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दुधात हिंग मिसळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामागे एक मोठे कारण म्हणजे हिंगाचे औषधी गुणधर्म.

हिंगामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. हिंग अँटीमाइक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म अनेक प्रकारच्या वेदना बऱ्या करतात. पण जेव्हा तुम्ही हींग दुधासोबत पीता तेव्हा ते शरीरासाठी अनेक प्रकारे काम करते. चला तर मग जाणून घेऊया हिंग आणि दुधाचे फायदे, पण त्याआधी आपण हिंग आणि दूध कसं पिता येईल ह्याची माहिती घेऊ.

हिंग आणि दुध कसं प्यावं

4 109

हिंग आणि दुध अनेक प्रकारे पिऊ शकता. तुम्ही दोन प्रकारे घेऊ शकता. पहिल्या पद्धतीने थंड दुधात मिसळून आणि दुसरा गरम दुधात मिसळून. 

जर तुम्हाला गॅसमुळे त्रास होत असेल तर हिंग तव्यावर गरम करून थंड दुधात मिसळून प्या. ज्यांना दूध पचत नाही त्यांच्यासाठीही ही पद्धत फायदेशीर आहे. दुसरं म्हणजे, बद्धकोष्ठता आणि अँटी बॅक्टेरियल फायद्यासाठी हिंग कोमट दुधासोबत घ्या. यासाठी कढईत थोडं तूप टाकून त्यावर हिंग टाकून त्यात दूध घालून एक उकळी आणा. ते प्या.

हिंग आणि दुध पिण्याचे फायदे

5 108

रिकाम्या पोटी गॅसच्या समस्येमध्ये हे फायदेशीर आहे. काही लोकांना रिकाम्या पोटी गॅस होतो. अशा लोकांसाठी थंड दुधात हिंग मिसळून खाणे खूप फायदेशीर आहे. कारण होतं काय की हिंग हा अँटासिडसारखं काम करतो

याव्यतिरिक्त, त्यातील फ्लेव्होनॉइड्स पोटात ऍसिड कमी करतात. आणि दुधामुळे पोट थंड व्हायला मदत होते. रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटातील आम्लाचा थर शांत होतो आणि गॅसचा त्रास होत नाही.

बद्धकोष्ठतेच्या त्रासावर खात्रीशीर उपाय

6 95

हिंग आणि दुध प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यासाठी गरम दुधात हिंग मिसळून रात्री झोपण्यापूर्वी हे दूध प्या. यामुळे तुमची पचनक्रिया गतिमान होईल आणि आतड्यांमध्ये अडकलेली घाण साफ व्हायला मदत होईल. अशाप्रकारे, हे दोन्ही गुणधर्म एकत्र केल्याने सकाळी पोट साफ होईल आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून तुम्ही मोकळे व्हाल.

रोग प्रतिकारशक्ती वाढते

7 84

तुम्हाला माहित आहे का की हिंगामध्ये काही अँटिऑक्सिडंट्स सुद्धा असतात? त्यात टॅनिन आणि फ्लेव्होनॉइड्स सारख्या फिनोलिक संयुगे देखील असतात, जे अँटिऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात. याशिवाय त्याचे अँटीमाइक्रोबियल, अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीराला अनेक संसर्गजन्य रोगांपासून वाचवण्यास मदत करतात.

अशा प्रकारे दुधात हिंग मिसळून पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण तुम्हाला यामुळे काही त्रास होत असेल तर मात्र हा उपाय पुन्हा करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories