डाएट प्लॅन मध्ये अननस खाल्ल्याने काही दिवसात 5 किलो वजन कमी होऊ शकतं? जाणून घ्या सत्य !

मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी लोक काय करत नाहीत. अशा परिस्थितीत अननस खाऊन वजन कमी करण्याचा हा डाएट प्लॅन खूपच क्रिएटिव्ह आहे. आणि खूप सोपा आणि चविष्ट आहे. 

वजन कमी करण्यासाठी जगभरात अनेक डायट प्लॅन  आहेत. वजन कमी करण्याच्या अनेक डायट प्लॅन  सोप्या असतात तर काही कठीण असतात. पण अलीकडचा डाएट प्लॅन ऐकण्यात जितकी मजा येते तितकीच ती फॉलो करणेही सोपे असते.

होय, प्रत्यक्षात या डाएट प्लॅनचे नाव आहे अननस डायट प्लॅन . हा डाएट प्लान सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे आणि बरेच लोक त्याला फॉलो करत आहेत. चला तर मग, वजन कमी करण्याच्या या खास डाएट प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पाईनॲपल डायट प्लॅन काय आहे?

3 23

१९७० साली आलेल्या “द सेक्सी पाईनॲपल डायट ” या पुस्तकातून हा वजन कमी करणारा डायट प्लॅन  प्रसिद्ध झाला. हे पुस्तक स्टेन हेगेलर नावाच्या डॅनिश मानसशास्त्रज्ञाने लिहिले आहे. अननस डायट प्लॅन काही दिवसात 5 किलो पर्यंत वजन कमी करू शकतो.  असं हया पुस्तकात सांगितलं आहे. ह्या डाएट प्लॅनमध्ये फक्त अननस खाण्याबाबत बोललं गेलं आहे.

पाईनॲप्पल डायट पालन कसा करायचा?

4 22

ह्या डाएट प्लॅन पालन करण्यासाठी, आठवड्यातून दोन दिवस अननसशिवाय काहीही खायचं नाही. फक्त अननस.. हा डाएट प्लॅन कसा फॉलो करायचा हे तुम्ही किंवा तुमच्या आहार तज्ञावर अवलंबून आहे. यामध्ये, उउरलेले 5 दिवस तुम्हाला सामान्य खावं लागेल.

  • ह्या डाएट प्लॅन अंतर्गत तुम्हाला नाश्त्यात अननस खावं लागेल.
  • नंतर दुपारच्या जेवणासाठी 1 काप अननस घ्या.
  • रात्री फ्रूट सॅलडमध्ये अननस खा.
  • अशा प्रकारे, तुम्हाला हे सलग दोन दिवस करावे लागेल आणि उरलेले दिवस आरामात प्रमाणात सर्व खाऊ शकता.

पायनापल डायट प्लॅन चे फायदे 

5 19

पायनापल डायट प्लॅनचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम, ते तुमचा चयापचय दर वाढवते, ज्यामुळे तुम्ही जे काही खाता ते लवकर पचायला लागतं. याशिवाय अननसात ब्रोमेलेन असते जे प्रोटीओलाइटिक एन्झाइम असते जे सूज कमी करण्यास मदत करते.

याशिवाय, हे शरीरातील हार्मोनल बॅलन्स वाढवतं. आणि जलद वजन कमी करण्यात मदत करते. अशा प्रकारे जलद वजन कमी करण्यात पायनापल डायट प्लॅन जबरदस्त आहे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories