सर्दी, ताप, खोकला या घरगुती आयुर्वेदिक उपायाने कमी करा… 

आजकाल ताप येणे जरी ही सध्या अत्यंत सामान्य समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या वातावरणामध्ये फरक पडला किंवा कोणत्याही गोष्टीचे इन्फेक्शन झालं की, ताप आपल्याला ताप येतो.

ताप आल्यावर आपण ती सामान्य गोष्ट म्हणून डॉक्टरकडे जात नसतो. त्यामुळे परिणामी ताप आल्यावर घरगुती उपाय करण्यावर भर दिली पाहिजे.

सध्याच्या वेगवान जीवनशैलीमध्ये जर आपण कोठे बाहेर पडलो आणि आपलं वातावरण बदलले की लगेच आपल्याला सर्दी, खोकला, घशामध्ये खवखव आणि इतर रोगांनी आपण आजारी पडत असतो. याचे कारण म्हणजे अशा लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आपल्याला अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

यावेळी जर आपल्याला खूप ताप आला असेल तर आपण तातडीनेकडे औषधे घेण्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो. तिथं आपल्याला अँटिबायोटिक गोळ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिल्या जातात, मग परिणामी त्या आपल्या शरीराच्या मानाने खुप जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण करत असल्याने आपल्याला या गोळ्यांचा साईड इफेक्ट होत असतो.

- Advertisement -

त्यामुळे या गोळ्या खाऊन आपले शरीरातील इतरत्र भागावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण घरच्या घरी हा उपाय करून तुमची ताप नियंत्रणामध्ये आणू शकता आणि त्यानंतरच आपण डॉक्टरांकडे जाऊ शकता. यामुळे आपला खर्चही कमी लागेल आणि आपल्या शरीराची देखील काही नुकसान होणार नाही.

 त्यामुळे असा उपाय करून आपण सर्दी खोकला आणि घशातील खवखव आणि इतर आजार नक्कीच नियंत्रणात येण्यास मदत होते.

हा प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला गरम पाणी लागणार आहे.  दुसरा घटक मीरे लागणार आहे. मग त्यानंतर तिसरा घटक आहे की, हा अद्रक लागणार आहे. याशिवाय थोडासा गवती चहा लागणार आहे.

तर हा उपाय करण्यासाठी पाणी गरम केल्यावर त्यामध्ये 3 ते 4 मिरे टाकुन मग त्यानंतर त्यामध्ये आल्याचा कीस करून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यावे आणि त्यानंतर हे पाणी चांगले उकळून घ्यावे. 

- Advertisement -

मग थोड्या वेळाने त्यामध्ये योग्य प्रमाणात किंवा आपल्या चवीनुसार साखर टाकावी पण ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी मधाचा वापर करू शकता. हे मिश्रण खाली उतरून थोडे वेळ तसेच ठेवावे. मग हे चाळणीने गाळून घेऊन थंड करून याचे दिवसातून 3 ते 4 वेळेस सेवन करावे.

जर हे मिश्रण लहान मुलांना देताना सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा घ्यायचे आहे. यामुळे तुमचा ताप कायमस्वरूपी बंद होईल.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories