मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी काय करावे व काय करू नये… सविस्तर आरोग्यदायी माहिती

मासिक पाळी बऱ्याच महिलांसाठी वेदनादायक असते. त्यामुळे या दिवसात त्यांना कमी एनर्जी भेटते. त्यामुळे त्या शांत बसूनच राहतात. तसेच मासिक पाळी दरम्यान मूड स्वींग्स होणे, चिडचिड होणे साहजिक आहे.

मासिक पाळी दरम्यान अनेकदा कोणाशीही बोलायची इच्छा होत नाही, कधी खूप आनंद होतो तर कधी मन दुःखी होते. तसेच बऱ्याच प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यांना जास्त काम करणे शक्य नसते, अशावेळी काय करावे आणि काय नको असा संभ्रम निर्माण होतो.

मासिक पाळी दरम्यान कुठलाही उदासीन चित्रपट किंवा कार्यक्रम बघू नये. ज्यामुळे आपल्या भावना दुखावणार नाही. चित्रपट किंवा कार्यक्रमात दाखविलेले क्षण बघून आपणही भावूक होऊन जातो. म्हणून होईल तेवढं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या गोष्टी, कार्यक्रम बघा.

ह्याने तुमचा मूड पण चांगला राहिलं आणि इतरांना देखील त्रास होणारं नाही. मासिक पाळी दरम्यान फिक्या रंगाचे किंवा पांढरे कपडे घालणे टाळावे. तसे तर हे रंग एव्हरग्रीन आहेत त्यामुळे आपल्याला ते आवडतातच, पण मासिक पाळी दरम्यान असे रंग घालणे खूप रिस्की असू शकते. कारण असे केल्यास डाग लागण्याची भीती असते.

त्यामुळे गडद रंगाचे कपडे परिधान करा. मासिक पाळी दरम्यान थोडाफार व्यायाम करत रहावा. व्यायाम किंवा योगा केल्याने बॉडीपेन कमी होते तसेच मासिक पाळीत होणारा त्रास देखील कमी होतो. अनेक स्त्रिया सांगतात की, मासिक पाळीमध्ये देखील व्यायाम केल्याने त्यांचा त्रास कमी झाला.

शरीरातील कॅलशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपण दुध-दही खात असतो. पण मासिक पाळी दरम्यान हे पदार्थ खाऊ नये.नोकरी करणाऱ्या स्त्रिया ह्या कामाच्या नादात कधीकधी पॅड बदलायचं टाळतात. पण हे खूप घातक असत. मासिक पाळी दरम्यान स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेचे असते.

मासिक पाळी दरम्यान शरीर कमकुवत झालेलं असतं त्यामुळे थकवाही जाणवतो.

म्हणून ह्या दरम्यान पुरेश्या प्रमाणात खाणे गरजेचे असते. या काळात न खाण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. या दरम्यान जमेल तेवढं पौष्टिक आहार घ्या. मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवणे टाळावे.

त्या दरम्यान शारीरिक संबध ठेवल्यास गर्भधारणा होत नाही हा निव्वळ एक गैरसमज आहे. मासिक पाळी दरम्यानही गर्भधारणा होण्याची शक्यता असते. पण संक्रमण होण्यापासून वाचण्यासाठी ह्या दरम्यान संबंध टाळावे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories