मानवी जीवनात सभोवतालच्या हवामान बदलाचा आणि प्रदूषण, धुळीचे वाढते प्रमाण या गोष्टीमुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी सर्दी, खोकला, डोके दुखणे, हातपाय सुजणे किंवा दुखणे यांचे प्रमाण अधिक होत चालले आहे.
त्यामध्ये खोकलाचे प्रमाण वाढत जात आहे. म्हणून हा येणारा खोकला वेळीच आटोक्यात आणणे आवश्यक असते. खोकला हा रोग नसून घसा व फुफ्फुसाची बिगडलेलं स्थिती आहे. हा येणारा खोकला कोरडा व थांबुन येणार खोकला हे त्यांचे प्रकार आहेत.
त्यात थांबुन येणार खोकलामध्ये घसा खराब होतो व रात्री याचा जोर वाढतो. यामध्ये जास्त पाणी प्यावेसे वाटते. तर कोरडा खोकला हालचालीमुळे जास्त प्रमाणात वाढू लागतो. मग यामुळे परिणामी डोकेदुखी होते, माणूस जास्त चिडचिड करतो.
या खोकल्यावरती एक रामबाण उपाय करण्यासाठी काही पदार्थची गरज आहे. यामध्ये प्रामुख्याने अद्रक लागणार आहे कारण अद्रक हा आयुर्वेदिक घटकामधील मुख्य घटक आहे. कप , दमा , भरलेले छाती , सर्दी या आजारासाठी याचा उपयोग होतो.
यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम , फोसफरर्स , लोह, व्हिटीमीन C असते ज्यामुळे फुफ्फुसची आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
आपल्याला या उपायासाठी आल्याच्या तुकड्यांचा 1 चमचा रस लागणार आहे. त्याला थोडेसे गरम करायचे आहे. यामध्ये मध हे अर्धा चमचा मिक्स करायचे आहे. असा हा उपाय घरातील सर्व व्यक्तीसाठी आहे. हा उपाय कोरडा खोकल्यावर अतिशय उपयुक्त आहे. याचे मिश्रण दिवसातून 2, 3 वेळा घायचे आहे.
ज्या व्यक्तीना कफयुक्त खोकला आहे त्या लोकांसाठी दुसरा उपाय आहे. हा उपाय तयार करण्यासाठी प्रामुख्याने लसुण घायचा आहे, कारण यांचे सेवन केल्यास शरीरातील रक्त शुद्धीकरण होण्यास मदत होते. तसेच रक्त पातळ होते.
तसेच हृदयाला ऑक्सिजन पुरवठा होतो. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, म्हणून या उपायांसाठी लसण्याच्या 5 ते 6 पाखल्या किसुन घायचे आहे आणि त्यात मध मिक्स करायचे आहे.
एक चमचा मधामध्ये या लसणाचे 5 थेंब रस टाकायचा आहे. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यायाचे आहे. यांचे कोणत्याही साईड इफेक्ट नाहीत, त्यामुळे हा पुर्णपणे आयुर्वेदिक औषधमधील उपाय आहे.