जाणून घ्या, दुपारी झोपणे शरीरासाठी फायदेशीर की अपायकारक? 

बर्‍याच लोकांना दुपारी झोपायची सवय असते तर काही लोक यापासून दूर राहतात. जरी काही लोकांना झोपायचे असेल तरीही त्यांच्या कामाची वेळ त्यांना झोपू देत नाही तरीपण दुपारच्या जेवणानंतर त्यांना सुस्तपणा जाणवू लागतो.

मात्र गृहिणी, वृध्द या घरातील सदस्यची दुपारची झोप कायम ठरलेली असते. मग आपल्याला कायम वाटते की, दुपारची झोप ही आरोग्यसाठी घातक ठरणार नाही ना?

तसे तर दुपारी झोपण्याची सवय ही शरीरास नुकसानकारक आहे व चुकीची आहे. परंतु, दुपारची थोडी झोपेचे काही फायदेसुद्धा आहेत असे बर्‍याच संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. पण, दुपारी किती वेळ झोप घेतली पाहिजे हे बहुतांश लोकांना माहीत नसते.

यूनिवर्सिटी ऑफ पेन्सिल्वेंनीयाच्या जूनियर- प्रोफेसरानी दुपारची झोप ही तब्येतीसाठी फायदेशीर आहे असे म्हटले आहे.  दुपारी झोपल्यामुळे माणसाचे रोजच्या कामात लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. माणूस याने ताजातवाना राहतो. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ति मजबूत होते. हृदयाच्या संबंधित जे काही आजार आहेत, ते या झोपेमुळे कमी होतात.

सकाळच्या वेळेत 15 ते 20 मिनिटांची झोप घ्यायला हवी .पण त्यानंतर दुपारची झोप ही पूर्ण 90 मिनिटे घ्यायला पाहिजे. कारण, झोप पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला थकवा व डोकेदुखी याचा त्रास होऊ शकतो.तसेच दुपारच्या झोपेचे काही फायदे आहेत.

दुपारी झोपल्यामुळे आपल्या मेंदूची कार्यशक्ती वाढते. जे लोक दुपारी झोपतात त्याची स्मरणशक्ती दुसर्‍या लोकांच्या तुलनेत चांगली असते. मुख्यत: मुलांना दुपारी अर्धातास तरी झोपू द्यावे. जी मुले सतत अभ्यास करून थकतात, त्यांनी दुपारची वेळी झोप काढावी, त्यामुळे त्यांच्या मेंदूला आराम मिळेल.

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकांना हृदयासंबंधित समस्या आहेत त्यांनी जर दुपारची झोप घेतली, तर त्यांना हार्ट अटॅक येण्याची भीती कमी प्रमाणात असते. जर तुम्हाला खूप जास्त आजारपण येत असेल, तर दुपारी झोपल्यामुळे शरीराला आराम मिळतो.

तसेच या झोपेमुळे शरीरातील पचनशक्ती मजबूत होते. म्हणूनच, दुपारच्या वेळी, थोड्या वेळासाठी आपल्याला झोपले पाहिजे.

दुपारी जेवण झाल्यावर तुम्ही तुमचे डोके डाव्या हातावर ठेवून झोपले, त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. याशिवाय, चिडचिड्या स्वभावाची व्यक्तिच्या स्वभावात सकारात्मक बदल होतात.

यामुळं दुपारची थोडी झोप ही आरोग्यसाठी फायदेशीर ठरते पण दुपारची जास्त झोप ही हानिकारक ठरू शकते.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories