आवळ्याचा वापर करून थांबवा संपूर्ण केसगळती, 100% परिणामकारक उपाय..

सध्याची अतिशय जटिल समस्या म्हणजे महिला असो व पुरुष, केसगळतीने सर्वचजण हैराण झाले आहेत. बदलते जीवन व खाण्याच्या सवयी यामुळे त्याचा थेट परिणाम हा केसांवरती होत आहे, केस पातळ होणे, केस गळणे, केस पांढरे होणे, खराब होणे यासारख्या अनेक समस्यांनी हैराण करून सोडलंय.

बरेच नैसर्गिक, आयुर्वेदिक उपाय जर आपण केले तर त्याचा नक्कीच फायदा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी होईल. केस गळणे असो व केस तुटणे याची कारणे जरी अनेक असली तरी प्रमुख कारणे धूळ, माती व हवा प्रदूषण हीच आहेत.

यामुळेच केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो, यावर जे उपाय आहेत ते पूर्ण करावे कारण जर मध्येच करता करता सोडले तर त्याचे अपाय होतात व केसांसाठी हानीकारक ठरू शकते. फास्ट फूड हा उपाय सुरू असताना पूर्ण बंद करायच आहे व घरातील साधं जेवण , 8 तास पुरेशी झोप या उपायांसाठी अतिशय आवश्यक आहे.

त्यामुळे हा उपाय अगदी नीट समजून घेऊन पूर्ण 30 दिवस केल्यास 30 दिवसात केस गळती बंद होईल, केस दाट होतील. आपल्या सर्वांना आवडणारा, तोंडाला पाणी आणणारा,  आवळा हा केसांसाठी खूपच लाभदायी आहे.

आवळ्यातून केसांना हवे असणारे सर्व घटक मिळतात. यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स, व्हिटॅमिन्स ,आयर्न असते. रोज ताज्या ताज्या 2 आवळ्यांचा 2 चमचे रस घ्यायचा आहे, त्यासाठी आवळ्यातील बिया बाजूलां करून त्याच चूर्ण बनवा व गाळणीच्या साहाय्याने त्यातील रस काढून घ्या.

रोज 2 चमचे रस न चुकता घ्यायचा आहे. संत्र्यापेक्षा जास्त 8 पटीने व्हिटॅमिन सी असते, ज्याचा भरपूर फायदा केसांना होत असतो. हा रस थेट न सेवन करता रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाण्यात 2 चमचे ताजा रस मिक्स करा व त्याचे सेवन सलग 30 दिवस करायचे आहे.

रस बनवून फ्रीज मध्ये ठेवणे कटाक्षाने टाळावे कारण या उपायासाठी आवळ्याचा ताजा रसच घेणे गरजेचे आहे. हा रस पाण्यासोबत सेवन केल्यानंतर 1 तास काही खाऊ अथवा पिऊ नका.

दुसरा उपाय म्हणजे केसांच्या मुळाशी हा रस लावणे. कापसाच्या सहाय्याने हा आवळ्याचा रस मुळांना लावा, शक्य असल्यास रात्रभर ठेवा किंवा 1 तासाने केस धुवू शकता. आपण केसांसाठी आवळ्याचे तेल वापरावे जे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते.

तसेच तुमच्या आहारात साधं ताक किंवा मसाला ताक याचा जरूर समावेश करा. त्यातील पोषक घटक केसांना मजबूत बनवतात. इतकेच नाही तर ओव्हर प्रोसेस केलेलं फूड टाळावे. हा उपाय न चुकता सलग 30 दिवस करा व पहा तुमचे केस किती लांब व दाट होतील.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories