पोट साफ होण्यासाठी एक जुना आणि गुणकारी आयुर्वेदिक उपाय…

 तुम्हाला खोकला येत असेल, बरेच दिवस होऊनही खोकला कमी होत नसेल, तर तुमच्या शरीरात म्हणजे छातीमध्ये कप साचलेला असेल किंवा कफाचे प्रमाण वाढलेले असतील. हा चमत्कारिक उपाय नक्कीच केला पाहीजे.

कारण जोपर्यंत कफाचे प्रमाण कमी होणार नाही, तोपर्यंत खोकला कमी होत नाही. हा वाढलेला कफ कमी करण्यासाठी उपाय अत्यंत रामबाण असून यासाठी लागणारे सर्व साहित्य त्याला सहज मिळते.

त्याचप्रमाणे बऱ्याच व्यक्तींना धुळीची ऍलर्जी असते, धुळीचे प्रमाण वाढल्यावर छातीमध्ये कफ होतो आणि त्यामुळे खोकला होतो. तसेच काही वेळा सर्दी सुद्धा होण्याची शक्यता असते. 

तर हा चमत्कारिक उपाय कफ, सर्दी आणि खोकला पूर्णपणे कमी करण्याचं काम हा आजचा उपाय करतो. याचबरोबर, अजून एक फायदा म्हणजे पोट झटपट साफ होण्यास मदत होते.

तसेच गॅसेस, अपचन आणि पोट गच्च होणे या समस्या पूर्णपणे कमी होतात. असा हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे, तो म्हणजे खाऊचे पान होय.

याला काही ठिकाणी विड्याचे पान किंवा नागवेलीचे पान असेही म्हणतात. हे खाऊचे पान तुम्हाला कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध होईल.

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या उपायांसाठी तुम्हाला साधे पान लागणार आहे. कारण यामध्ये अनेक प्रकार असतात जसं की, कलकत्ता पान, बंगाली पान, बॉम्बे पान आपल्याला अशा कोणत्याही प्रकारचे पाने नको आहेत.

तर आपल्याला या उपायांसाठी एकदम साध्या स्वरुपात पान लागणार आहे. कारण विड्याचे पान हे आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्वाचे असते.

हे अग्निदीपक, वायूहारक, कफ नाशक असते आणि या विड्याच्या पानांमध्ये चविकुल नावाचा एक घटक असतो जो तोंडाचा वास कमी करतो, दात स्वच्छ ठेवतो व सर्वात महत्त्वाचे छातीमधील कफ कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे खोकला कमी होतो.

तसेच यामुळे पोटातील गॅस झटपट कमी होतो व पोट झटपट साफ होते, असे गुणकारी विड्याचे पान आपल्याला वापरायचे आहे. एक वेळेसच्या उपायासाठी आपल्याला 1 पान वापरायचे आहे. तसेच या उपायांसाठी दुसरा घटक म्हणजे 1 लवंगा लागणार आहे.

कारण ही लहान दिसणारी आपल्यासाठी अत्यंत उपयोगी असते, म्हणूनच त्याचा आहारात वापर केलेला आहे. लवंगा नुसती चावून खाल्ली आणि रस गिळल्यास तरीही सर्दी, खोकला आणि कफ तात्काळ थांबते आणि अनेक रोगांवर उपयोगी आहे.

अशी ही गुणकारी लवंग आपल्याला एक वेळच्या उपायासाठी फक्त 1 लवंग घ्यायची आहे. तसेच यात लागणारा तिसरा व अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ओवा होय.

कारण ओवा हा प्रत्येकाच्या किचनमध्ये असतो, कारण हा पोटासाठी अत्यंत गुणकारी असतो. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. खूप जुन्या काळापासून याचा वापर जेवणात केला जातो.

त्यामुळे जसा हा ओवा पोटासाठी उपयोगी आहे, तसाच हा छातीमधील कफ आणि खोकला आणि सर्दी कमी करण्यासाठी फारच उपयोगी आहे.

कारण ओव्यामध्ये थायमॉल नावाचा एक घटक असतो जो छातीतील कप कमी करतो आणि घशाचे इन्फेक्शन करतो आणि सर्दी होऊ देत नाही असा हा गुणकारी ओवा आपल्याला साधारणत चिमूटभर एक वेळचे उपायासाठी लागणार आहे.

जर तुम्ही पोट साफ करण्यासाठी वापरत असाल तर याचे प्रमाण वाढू शकता. त्यावेळी याचे प्रमाण 1 चमचा एक वेळच्या उपायासाठी वापरू शकता.

हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक खाऊचे पान स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि याचा देठ तोडून घ्यायचा आहे. तसेच ज्या लोकांना सर्दी, खोकला आणि कफ झाला आहे अशा व्यक्तीने दुधाचे पदार्थ व दुधाचे सेवन काही काळासाठी थांबवायला पाहिजे.

मग पाने घेतल्यानंतर 1 लवंगा घ्या आणि चिमुटभर ओवा घ्या. मग हे तिन्ही घटक एकत्र केल्यानंतर हे पान आपल्याला चावून खायचे आहे. पण चावून खाताना हे पान आपल्याला जेवढं जमेल तेवढं हळू-हळू चावून खायचे आहे व त्याचा रस पूर्णपणे गिळून घ्यायचा आहे.

कारण याचा रस चवीला थोडं तिखट लागतं, मात्र तो अत्यंत गुणकारी आहे. याचा रस आपला कप पातळ करून बाहेर काढण्यास मदत करणार आहे. या चमत्कारिक आणि आयुर्वेदिक उपायाने एक दिवसात तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळेल.

तसेच सर्दी, कफ पूर्णपणे कमी होतील. याशिवाय, हे पान आपण दुपारी, रात्री जेवणानंतर किंवा जेवणापूर्वी केव्हाही खावू शकतो. त्याला वेळेचं बंधन नाही.

हा उपाय आपल्याला साधारणत 5 ते 7 दिवस सलग करायचा आहे, त्यामुळे छातीत पूर्णपणे निघून जातो. तसेच हा अत्यंत गुणकारी उपाय एक वेळ नक्की करा..

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories