पोटात सारखं दुखत राहतं का? मग ही आतड्यांची सूज आहे, हे करून बघा 7 अचूक आयुर्वेदिक उपाय.

आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर आतड्यांमधील सूज कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. लोकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो बरं का!

तुमच्याही पोटात दुखत राहतं का? आतड्यांमध्ये सूज येण्याच्या त्रासाला अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणतात. पचनसंस्थेमध्ये दीर्घकाळ अल्सर तयार झाल्यामुळे आतड्यांना सूज शकते. आणि मग पोट खराब होऊन संडासला त्रास होतो. आतड्यांची सूज गुदाशयाच्या आतील भागावरसुध्दा परिणाम करते. आतड्यांना सूज येण्यावर त्वरित उपचार आवश्यक आहेत.

मित्रांनो, आतड्यांना सूज येण्यावर कोणताही अचूक उपचार नाही. पण योग्य आहार, योगासने आणि काही औषधी वनस्पतींच्या मदतीने हा त्रास नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याच वेळी, अनेक डॉक्टर या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी सर्जरीचा सल्ला देतात. 

आज ह्या लेखात आपण आतड्यांना सूज येण्यावर असलेल्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल माहिती घेणार आहोत. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

- Advertisement -

आतड्यांना सूज आली तर हा आजार मुळापासून दूर करणं कठीण आहे. मात्र, त्यामुळे होणाऱ्या त्रासावर मात करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करू शकता. चला जाणून घेऊया त्या उपायांबद्दल.

 1. बेल

आयुर्वेदाचार्य स्पष्ट करतात की तुम्ही आतड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी बेल वापरू शकता. बेलाच्या फळांमध्ये आणि पानांमध्ये अल्सर बरे करण्याचे गुणधर्म लपलेले आहेत.  तसेच, खराब झालेल्या टिश्युंच्या दुरुस्तीसाठी ते प्रभावी आहेत.

बेल वापरून तुम्ही फक्त तुमचं पचनच सुधारू शकत नाही, तर अल्सरेटिव्ह कोलायटिसची अनेक वेदनादायक लक्षणे कमी करण्यातही बेलफळ गुणकारी आहे. बेलामध्ये जळजळ कमी करण्याचा गुणधर्म आहे. हे फळ आतडी आणि गुदाशयातील श्लेष्मल त्वचा शांत करते आणि जळजळ कमी करते. डायबिटिस नसेल तर बेलपाक दररोज खाऊ शकता.

 2. वेखंड

आयुर्वेदामध्ये अनेक समस्या कमी करण्यासाठी वेखंडाचा वापर केला जातो. हे थंड गुणधर्मांनी समृद्ध आहे. वेखंडात विविध प्रकारची जळजळ आणि आतड्यांसंबंधीचे त्रास कमी करण्याची क्षमता आहे. वेखंड आयुर्वेदात विशेषतः अल्सरेटिव्ह कोलायटिसची लक्षणे कमी करण्यासाठी वापरलं जातं.

- Advertisement -

आतड्यांमधील जळजळ कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे.त्यात अँटिऑक्सिडेंट गुण आहेत, जे फ्री रॅडिकल्सपासून सुटका होण्यास मदत करतात. वेखंड विषारी पदार्थांपासून शरीराचं रक्षण करते.पचन सुधारते. वेखंड उगाळून किंवा वेखंड पावडर घेऊ शकता.

3. ज्येष्ठमध

लिकोरिस किंवा ज्येष्ठमधाच्या मुळांमध्ये आयसोफ्लाव्होनॉइड अल्कलॉइड्स भरपूर असतात, ज्यात सूज शांत करणारी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म भरपूर आहेत. जेव्हा आतड्यांना सूज येते तेव्हा ज्येष्ठमध चघळू शकता. यात पचन तंत्रात सेप्सिस किंवा इन्फेक्शनमुळे होणारा त्रास कमी करण्याचा गुणधर्म आहे. लिकोरिसच्या सेवनाने पोटातील ऍसिड कमी होतं. तसच जेष्ठमध आतड्यांच्या श्लेष्मल त्वचेवर असलेले व्रण बरे करतो

 4. गिलॉय किंवा गुळवेल

गिलॉय किंवा गुळवेलच्या हृदयाच्या आकाराच्या पानांमध्ये जलद पाचक आणि थंड गुणधर्म असतात जे वात आणि पित्त दोषांना मोठ्या प्रमाणात शांत करतात. गुळवेलीच्या पानांचा  रस केवळ आतड्यांतले व्रणच बरे करत नाही तर पचनमार्गावर संरक्षणात्मक आवरण देखील बनवते. अल्सरेटिव्ह कोलायटिस बरा करण्यासोबतच गुळवेल अतिसार आणि आमांश बरा करते.

 5. वावडिंग

आतड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी वावडिंगचा वापर केला जाऊ शकतो. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. वावडिंग खाल्ल्याने जळजळ आणि अल्सर लवकर कमी होऊ शकतात. त्यात अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म आहेत, जे कोलन आणि गुदाशय कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त आहेत. ही औषधी वनस्पती आहे जी अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. वावडिंग खाऊन फ्री रॅडिकल्स कमी करता येतात.

- Advertisement -

 6. ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ग्रीन टी प्यायल्याने आतड्यांमधील सूज बर्‍याच प्रमाणात कमी होते. अनेक प्रकारचे घरगुती उपाय फायदेशीर आहेत. एका ग्लासात पाणी घेऊन ग्रीन टी तयार करा आणि प्या, अनेक आजार बरे होतात.

7. पंचकर्म डिटॉक्स

पंचकर्म डिटॉक्स आतड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. याचा समावेश तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात करू शकता. पंचकर्म डिटॉक्स केल्याने शरीरातील घाण साफ होते. आणि त्याने तुमच्या आतड्यांना आलेली सूज कमी करू शकता. पंचकर्म डिटॉक्समध्ये तीन घटकांचे मिश्रण असते जे तुम्हाला मदत करेल.

बस्ती किंवा एनीमा, हर्बल डिटॉक्स, शिरोधारा ज्यात मोठ्या आतड्यांतून शरीरातील कचरा काढून टाकण्यासाठी वात उर्जेचा वापर करतात आणि कोलनला पुन्हा रोजच्या टॉयलेटसाठी सेट केलं जातं.

आतड्यांमधील सूज कमी करण्यासाठी तुम्ही या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर करू शकता. याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. पण लक्षात ठेवा की या औषधी वनस्पती वापरण्यापूर्वी, आपण एकदा तज्ञांचा सल्ला घ्यावा.

त्याचबरोबर आतड्यांमध्ये सूज असेल आहाराची काळजी घ्या. नियमितपणे योगा करा. तसच पोटाला हलके मालिश करा. याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories