सकाळी उठल्यावर सर्दी, डोकेदुखी किंवा अंगदुखी मॉर्निंग ॲलर्जी असू शकते, जाणून घ्या असं का होतं आणि त्यावरचे उपाय.

सकाळी उठल्यावर अनेकांना मॉर्निंग ऍलर्जी असू शकते. त्यासाठी हे उपाय अवश्य करा. सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटत नाही का? कधी कधी तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या पापण्या जड झाल्यासारख्या वाटतात. यासोबतच थकवा, खोकला-सर्दी, डोकेदुखी, शिंका येणे अशा समस्यांनीही तुम्ही तत्रासून जाता का?

हे मॉर्निंग ॲलर्जीचे कारण असू शकते, ही ॲलर्जी तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्हाला खूप त्रास देते. परंतु हळूहळू ही लक्षणे कमी होऊ शकतात परंतु मॉर्निंग ॲलर्जीमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच, त्याचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो.

खरं तर, जेव्हा तुमचा दिवस चांगला सुरू होत नाही, तेव्हा तुम्हाला दिवसभर थकवा वाटतो आणि कामात अजिबात मन लागत नाही.तसेच रात्री झोप सुध्दा चांगली येत नाही. अशा मॉर्निंग ऍलर्जीची अनेक कारणे असू शकतात आणि वेळेत त्याचे निदान करणे खूप महत्वाचे आहे, नाहीतर ही समस्या आणि लक्षणे वाढू शकतात. तुम्हालाही मॉर्निंग ॲलर्जीचा त्रास असेल तर ह्या प्रकारच्या ॲलर्जीची कारणे आणि लक्षणे आणि ती कशी कमी करता येईल याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मॉर्निंग ॲलर्जी कशामुळे होते?

3 6

मॉर्निंग ॲलर्जी घरात साचलेल्या धुळीच्या कणांमुळे किंवा तुमच्या पलंगाच्या आजूबाजूला साचलेल्या घाणीमुळेही असू शकते. याशिवाय अनेकांना धुळीची ॲलर्जीही असते, त्यामुळे ही समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे सकाळी शिंका जास्त येतात.

- Advertisement -

जर तुमच्याकडे पाळीव प्राणी असतील आणि ते तुमच्या बेडरूममध्ये आले तर तुम्हाला मॉर्निंग ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. मॉर्निंग ऍलर्जी पाळीव प्राण्यांच्या कोंडा किंवा त्यांच्या केसांमुळे देखील होऊ शकते.

हे हंगामी ऍलर्जीमुळे देखील होऊ शकते. हवामान बदलत असतानाही अनेकांना मॉर्निंग ऍलर्जी होऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांना थकवा आणि डोकेदुखीची समस्या उद्भवते.

फुलांच्या किंवा वनस्पतींच्या परागकणांमुळे देखील ऍलर्जी होऊ शकते. जर तुमच्याकडे फुलं आणि झाडं असतील तर ते तुमच्या कपड्याला चिकटून देखील तुमचे नुकसान करू शकतात. याशिवाय धान्याची भुशी आणि वाळलेल्या पानांमुळेही लोकांना ॲलर्जीचा त्रास होतो.

घरातील ओलसरपणामुळे तुम्हाला सकाळी ऍलर्जीची समस्या देखील होऊ शकते. खरं तर, अनेक वेळा ओलसर वातावरणात घरात ओलसरपणा असतो, ज्यामुळे लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

- Advertisement -

मॉर्निंग ऍलर्जीची लक्षणे

4 6

सकाळच्या वेळी ऍलर्जीची लक्षणे थोडी गंभीर असतात, त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

 • शिंका येणे
 • वाहणारे नाक
 • थकवा
 • डोळे पाणावले आणि जडपणा
 • कान खाजणे
 • खोकला-सर्दी
 • श्वास लागणे

मॉर्निंग ॲलर्जी कशी बरी करता येईल.

5 5

ॲलर्जी शोधण्यासाठी तुम्ही स्कीन टेस्ट किंवा ब्लड टेस्ट घेऊ शकता. ह्या टेस्ट करून ऍलर्जीची कारणे देखील शोधू शकता. इंट्राडर्मल टेस्ट : ऍलर्जीचं कारण आणि प्रतिक्रिया रेकॉर्ड करण्यासाठी त्वचेखाली थोड्या प्रमाणात ऍलर्जीन इंजेक्शन दिले जाते.

मॉर्निंग ॲलर्जी टाळण्यासाठी मार्ग

6 5
 • खिडक्या बंद ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बाहेरील घाण तुमच्या खोलीत प्रवेश करू शकणार नाही.
 • झोपण्यापूर्वी आंघोळ करा. जेणेकरून शरीरात साचलेली धूळ काढता येईल नाहीतर कपडे बदलावे.
 • तुमच्या खोलीची फरशी किंवा कार्पेट व्यवस्थित स्वच्छ करा आणि झोपण्यापूर्वी बेड स्वच्छ करा.
 • पाळीव प्राण्यांना बेडरूमपासून दूर ठेवा किंवा त्यांची कोंडा आणि केस पूर्णपणे स्वच्छ करा.
 • झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि ॲलर्जीचे औषधही वेळेवर घ्या.
- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories