शुगर राहील तुमच्या ताब्यात. डायबिटीस असेल तर रोज घरात ह्या भाज्या बनवा.

- Advertisement -

मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा एक असा आजार आहे जो जगभरात महामारीसारखा पसरत आहे. आज बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्यामुळे जवळपास प्रत्येक घरात मधुमेहाचा रुग्ण पाहायला मिळतो. मधुमेहावर वेळीच नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर व्यक्तीची तब्येत जास्त धोकादायक बनू शकते.

म्हणजेच डायबिटीसचा  हळूहळू शरीराच्या इतर भागांवरही परिणाम होऊ लागतो. मधुमेहींच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध उपलब्ध असलं तरी ते पुरेसं \ नाही, यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारात काही बदल करणे आवश्यक आहे. अशा वेळी तुम्ही ह्या देशी आणि खाद्यपदार्थांचा करण्याचा विचार करू शकता, ज्यामुळे तुमची रक्तातील साखर आणि डायबिटीस तुमच्या ताब्यात राहील. 

मित्रांनो कोविड नंतर डायबिटीस हा जगातील सर्वात घातक आजारांपैकी एक बनला आहे. जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा डायबिटीसमुळे मृत्यू होतो. कोणालाही डायबिटीस होऊ शकतो, अशी स्थिती ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी असामान्यपणे जास्त असते. शरीर पुरेसं  इंसुलिन तयार करत नसल्यामुळे किंवा तयार केलेल्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देण्यास सक्षम नसल्यामुळे रक्तदाब वाढतो. अशा वेळी डायबीटीस रुग्णांनी आपल्या आहाराबाबत जागरुक आणि सतर्क राहणं गरजेचं आहे.

डायबिटीस असलेल्या लोकांनी हाय फायबरयुक्त पदार्थ खायचा सल्ला दिला जातो, कारण फायबर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करते आणि स्पाइक टाळते. चला तुम्हाला अशाच काही घरगुती खाद्य पदार्थांबद्दल समजून घेऊया. ज्यामुळे तुमची रक्तातील साखर वेगाने नियंत्रित राहील. 

- Advertisement -

मुळा खा 

मुळ्यामध्ये  हाय फायबर आहे आणि आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मुळा उपयुक्त आहे. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही मुळा सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता किंवा पराठे बनवूनही मुळा खाऊ शकता. लिंबाचा रस आणि थोडं मीठ टाकून तुम्ही ते मुळ्यासोबत हंगामी भाज्यांसोबत खाऊ शकता, त्यामुळे त्याची चव सुधारेल आणि तुम्हाला त्याचे फायदेही मिळतील.

कारलं मारक साखरेला 

डायबिटीस असेल तर कडू चवी तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. औषध जितकं कडू आहे तितकच ते लवकर प्रभावी ठरतं, कारलं औषधी तितकच कडू सुद्धा आहे. चवीमुळे अनेकांना ते आवडत नाही, परंतु कारलच  आपलं वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. कारल्यामध्ये पॉलीपेप्टाइड-पी किंवा पी-इन्सुलिन नावाचे संयुग असते, जे डायबिटीस नियंत्रित करण्यास एकदम उपयुक्त आहे.

नाचणी खा 

गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचा वापर कमी करणे योग्य मानले जाते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी नाचणी वापरू शकता, जो तुमच्या आरोग्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय आहे. नाचणीमध्ये फायबर, कॅल्शियम आणि अत्यावश्यक अमीनो ऍसिड असतात, ज्यामुळे ते पौष्टिक धान्य म्हणून ओळखले जाते. तुम्ही रागी डोसा किंवा नाचणी आलू पराठा देखील ट्राय करू शकता.

बकव्हीट / कुट्टू

कुट्टू हे सर्वसाधारणपणे उपवास किंवा उपवासाचे अन्न  म्ह्णून खाल्लं जातं. हे एक पौष्टिक धान्य आहे, जे रक्तातील साखर नियंत्रित करते. डायबिटीस असेल तर तुम्ही आठवड्यातून कितीही वेळा कुट्टू खाऊ शकता.  तर साखर वाढली की ती कमी करण्यासाठी असे काही घरगुती पदार्थ खायला काहीच हरकत नाही.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories