संगीत गर्भातील बाळाच्या मेंदूसाठीही का फायदेशीर आहे? सत्य समजून घ्या.

- Advertisement -
घर बैठे ऑनलाइन अनुभवी डॉक्टर से संपर्क करें और सलाह लें। चैट या कॉल पर बात करें।

चांगलं संगीत तुमच्या मूडसाठी आणि गर्भातील बाळाच्या मेंदूसाठीही फायदेशीर आहे, जाणून घ्या काय आहे ह्यामागचं कारण.

जेव्हा मुलं  लहान असतात, तेव्हा आई अनेकदा त्यांच्यासाठी अंगाई गाते,  ज्यामुळे बाळाला खूप लवकर झोपायला मदत होते. त्याचप्रमाणे बाळ जेव्हा गर्भात असतं तेव्हा चांगल्या संगीताचा त्याच्या मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो.

- Advertisement -
Lose Weight Safely & Naturally with myUpchar Ayurveda
Includes : Medarodh Ayurvedic Supplement + Personalized Diet & Workout Plan
3 Month Pack @ ₹1998 Only | Flat 33% Off
🚚Free Shipping | 💵 COD Available

जेव्हा आपण निष्क्रिय बसतो आणि काय करावं हे समजत नाही, तेव्हा आपल्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे गाणी ऐकणे. तुमचा मूड खराब असल्यास, संगीत हे एक माध्यम आहे जे तुमचा मूड झटपट वाढवू शकते. हे तुमच्या मनावर आणि मेंदूवर थेरपीसारखे काम करते. पण तुम्हाला माहित आहे का की ते फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या मुलासाठीही फायदेशीर आहे.

जेव्हा तुमच्या पोटात बाळ असेल, तेव्हा तुमचं संगीत ऐकणे त्याच्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकतं. संगीताचा मेंदूवर होणारा परिणाम दाखवणारी अनेक संशोधने आहेत. चला तर मग जाणून घेऊया गर्भातील बाळावर संगीताचा काय परिणाम होतो.

संगीत आणि बाळाच्या मेंदूच्या कार्याशी संबंधित या अभ्यासात काय निष्पन्न झाले ते जाणून घ्या

युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर लर्निंग अँड ब्रेन सायन्सेस (I-LABS) मधील शास्त्रज्ञांनी केलेल्या नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की गर्भात असताना संगीत ऐकल्याने बाळाच्या मेंदूचे कार्य सुधारू शकते.

- Advertisement -
Urjas T-Boost Capsules for Men - ✅100% Ayurvedic | ✅No Side Effects
3 Month Pack @ ₹1598 Only!

याशिवाय, अभ्यासातून हेही समोर आले आहे की जर एक वर्षाच्या लहान मुलांना संगीताच्या संपर्कात आणले तर ते त्यांचे उच्चार आणि त्यांचे बोलणे अनेक प्रकारे सुधारू शकते. यामुळे त्यांना बोलण्याची आणि गाण्याची पद्धत समजण्यास मदत होते.

  • त्यापासून दूर पळण्याऐवजी तणावाचा सामना करा
  • न जन्मलेल्या मुलांवर संगीताचा काय परिणाम होतो?
  • जन्मापूर्वी मेंदूच्या विकासात संगीत महत्त्वाची भूमिका बजावते हे सिद्ध झाले आहे.

युनिसेफच्या म्हणण्यानुसार – गर्भधारणेदरम्यान संगीत ऐकण्याचा केवळ गर्भवती महिलेवरच चांगला परिणाम होत नाही तर जन्मलेल्या मुलावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.

- Advertisement -
Diabetes Management Package by myUpchar Ayurveda
Includes : Madhurodh Ayurvedic Capsules + Personalized Diet & Workout Plan
3 Month Pack @ ₹1998 Only | Flat 33% Off
🚚Free Shipping | 💵 COD Available

गर्भधारणेच्या 16-18 आठवड्यात, बाळाला त्याचे पहिले आवाज ऐकू येतात. 24 आठवड्यांनंतर, लहान कान वेगाने विकसित होऊ लागतात आणि गर्भधारणेच्या शेवटच्या काही महिन्यांत लहान मुलं  आवाज आणि आवाजाच्या प्रतिसादात डोके फिरवताना दिसतात. गर्भात असतानाच न जन्मलेले मूल त्याच्या आईचा आवाज, तिची मातृभाषा आणि बोलण्याची पद्धत ओळखू शकते.

संगीताच्या मदतीने मुलं नीट बोलायला शिकू शकतात

नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने प्रकाशित केलेल्या अभ्यासात असेही दिसून आले आहे की संगीताप्रमाणेच भाषेमध्येही अनेक तालबद्ध नमुने आहेत. अक्षरे बोलण्यासाठी लागणारा वेळ श्रोत्यांना एक आवाज दुसर्‍यापासून वेगळे करण्यास मदत करतो, ज्यामुळे एखादी व्यक्ती काय बोलण्याचा प्रयत्न करीत आहे हे समजते. त्याचप्रमाणे संगीताच्या मदतीने लहान मुलं ही बोलायला शिकू शकतात.

संगीत तुमच्या मुलाला समाजात मिसळायला मदत करू शकतं 

चांगलं संगीत ऐकणे तसेच गाणे आणि ते इतर लोकांसोबत वाजवणे यामुळे लोकांना एकमेकांशी आणि समाजात सामील होण्यास मदत होते. यामुळे, तुम्हाला तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी जोडलेलेले वाटता.

लहान वयात संगीत मुलांना व्यक्त होण्यास आणि भावना शेअर करायला मदत करते. अगदी लहान वयातही मुलं ऐकलेल्या संगीतावर प्रतिक्रिया देऊन नृत्य करू शकतात. याशिवाय अनेकवेळा असंही दिसून आलं आहे की मुलं स्वतःची गाणीही गाऊ लागतात.

गर्भवती आईने कोणतं संगीत ऐकावं?

तिसऱ्या तिमाहीत, बाळाला तुम्ही वाजवलेलं कोणतंही संगीत नक्कीच ऐकू येईल. शास्त्रीय संगीत ऐकण्याचे खास फायदे आहेत. अंगाई सारखे मृदू आवाज, आनंद आणणारे सकारात्मक संगीत असो,  ह्या काळात बाळासाठी चांगलं संगीत ऐकत जा.

- Advertisement -
Kesh Art Anti-Dandruff Kit | Includes - Premium Bhringraj Hair Oil + Anti-Dandruff Shampoo with Neem & Shikakai🌿
✅Paraben & SLS Free
👩🏻‍⚕️Recommended by Doctors
Order Now @₹1258 Only | 🚚Free Shipping | 💵 COD Available

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow
Urjas Vigour & Vitality Capsules for Men - ✅100% Ayurvedic | ✅No Side Effects
1 Month Pack @ ₹719 Only!

Recent Stories