थकवा येण्याची कारणे कोणती? दररोज थकवा येत असेल तर दुर्लक्ष करु नका, ह्या जबरदस्त उपायांनी आपला थकवा घालवा.

थकवा येण्याची कारणे – रात्री सहा तासांची पुरेशी झोप घेऊनही जर दिवसभर तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल, निरुत्साही वाटत असेल, साध्या गोष्टी करायला अंगात त्राण उरत नसेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. लगेच थकवा दूर करण्यासाठी काही उपाय आपण ह्या लेखातून पाहूया.

थकवा म्हणजे नक्की काय?

थकवा येण्याची कारणे

थकवा म्हणजे शरीरात उत्साह आणि उर्जेचा अभाव. थकवा मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा असतो. थकवा झोपेपेक्षा वेगळा आहे. झोप येणे आणि थकवा ह्यात फरक आहे. रुग्णाला थकवा कसा येतो हे सांगणं कठीण असतं किंवा बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.

पण आळशीपणा आणि सुस्ती हे थकवा आल्यावर लगेच जाणवू लागतात. रोजचा थकवा हा अनेक घातक विकार घेऊन येतो. जसं की की विविध झोपेचे विकार, रोग, सीओपीडी, थायरॉईड रोग, मधुमेह आणि अशक्तपणा ह्याचं लक्षण असू शकतं. अति थकवा क्रॉनिक फटीग सिंड्रोम असू शकतो. आपण थकवा येण्याची कारणे आणि थकवा लगेच दूर करण्याचे उपाय पाहूया.

थकवा दूर करण्यासाठी सोपे उपाय

थकवा येण्याची कारणे

तात्काळ थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यात व्हिटॅमिन सी आहे, जे त्वरित ऊर्जा प्रदान करते आणि शरीरातील पाण्याची कमतरता देखील पूर्ण करते. पण हिवाळ्यात हा उपाय काहीवेळा काम करत नाही, कारण त्याने घशात खवखव होते. मग असे लोकथकवा दूर करण्यासाठी ग्रीन टी वापरून पाहू शकतात. ग्रीन टीमध्ये पॉलीफेनॉल असतात जे ताण कमी करतात. हे ऊर्जा वाढवण्यासाठी आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतात.

- Advertisement -

थकवा दूर करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे जेवणात सोयाबीन्स खाणे. सोयाबीन्समध्ये फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स असतात, जी त्वरित थकवा दूर करायला मदत करतात. न्याहारीसाठी नियमितपणे उकडलेले सोयाबीन खा. दुपारच्या जेवणात किंवा डिनरमध्ये काळ्या बीनचे सलाद किंवा सूप खाऊन एनर्जी राहते.

याशिवाय, लाल शिमला मिरचीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करण्याचा एक चांगला मार्ग आहे. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स रोगांशी लढण्याची शक्ती वाढवते. लाल शिमला मिरची तणाव वाढवणारं कोर्टिसोल कमी करते आणि थकवा दूर होतो.

थकवा दूर करण्यासाठी पालक उत्तम आहे. हिवाळ्यात मुबलक प्रमाणात पालक येतो आणि दररोज पालक खाणे हा थकवा दूर करण्याचा चांगला उपाय आहे. पालक लोहाने समृद्ध आहे. लोह शरीराच्या रक्त पेशींना ऑक्सिजन वाहून न्यायला मदत करतं ज्यामुळे थकवा दूर होतो. कोणतंही फळ खाणं थकवा दूर करायला पुरेसं आहे. पण त्यातही केळी विशेष फायदेशीर आहेत.

केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर असतं आणि साखरेचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी पोटॅशियम गरजेचं आहे. दररोज 1 किंवा 2 केळी खा. नाश्त्यासाठी दुधासोबत खाऊ शकता. टरबूजही फळांमध्ये खूप पौष्टीक आहे. जर तुम्हाला थकवा आणि सुस्ती आली असेल तर टरबूजाचा एक तुकडा चमत्कार करू शकतो. टरबूजात भरपूर पाणी असतं. अक्रोड हे थकवा दूर करण्यासाठी सुपर फूड आहेत. त्यात ओमेगा -3 फॅटी ॲसिड असतं जे थकवा लवकर दूर करते.

- Advertisement -

थकवा दूर करण्यासाठी हे काही घरगुती उपाय आहेत, पण जर थकवा कायम राहिला आणि दररोज चक्कर येत असेल तर त्याचं कारण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. लगेच तुमचं ब्लड प्रेशर तपासा. आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

थकवा रोग आहे का?

थकवा येण्याची कारणे

थकवा हा एक रोग नाही, हे एक लक्षण आहे. हे एकतर मानसिक किंवा शारीरिक असू शकतं. आणि ह्या लेखात सांगितलेल्या सोप्या उपायांनी थकवा दूर होऊ शकतो.

थकवा आल्यावर ही लक्षणं दिसतात

  • डोकेदुखी
  • चक्कर येणे
  • अंग दुखणे
  • मनःस्थिती ढासळलेली असते
  • निर्णय घेता येत नाहीत

थकवा येत असलेल्या व्यक्तींच्या तक्रारी

थकवा येण्याची कारणे
  • काम पूर्ण करण्यासाठी क्षमता किंवा प्रेरणेचा अभाव.
  • काम सुरू झाल्यावर अशी व्यक्ती लगेच थकून जाते.

एखाद्या व्यक्तीला काम करताना एकाग्रता मिळत नाही किंवा मानसिक थकवा जाणवतो.

- Advertisement -

थकवा येण्याची कारणे

थकवा येण्याची कारणे

१) काही औषधे जसं की रक्तदाब औषधे, स्टेरॉईड्स, अँटीहिस्टामाईन्स, ड्रग विथड्रॉल औषधे आणि एन्टीडिप्रेसेंट्समुळे देखील थकवा येऊ शकतो.

२) व्हिटॅमिनची कमतरता- व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, लोह आणि फॉलिक ॲसिडच्या अपुरेपणामुळे थकवा येऊ शकतो.

३) मानसिक आरोग्य- शोक, दुःख.

४) अल्कोहोलचा गैरवापर आणि नैराश्य यामुळे थकवा देखील येऊ शकतो.

५) इतर आजार असतील तर थकवा येतो. जसं की, फायब्रोमायल्जिया, सिस्टमिक ल्यूपस, संधिवात, कर्करोग आणि संधिवात सारखे आजार थकवा वाढवतात. कधीकधी रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपी अत्यंत थकवा आणू शकते.

थकवा आल्यास डॉक्टर कसं निदान करतात?

थकवा येण्याची कारणे

कधीकधी, थकवा तीव्र असू शकतो आणि शक्य तितक्या लवकर त्याचं निदान केलं पाहिजे. डॉक्टर किंवा आरोग्यसेवा व्यावसायिकांमध्ये सहसा सीबीसी टेस्ट, इलेक्ट्रोलाइट्स टेस्ट, रक्तातील साखरेची टेस्ट, थायरॉईड हार्मोन्स टेस्ट, सीपीके (स्नायू सूज निर्माण करणारा रोग), एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट (ईएसआर), इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी, ईकेजी), सीटी स्कॅन आणि एक्स-रे अशा वेगवेगळ्या टेस्ट करून डॉक्टर निदान करून उपचार करतात.

थकवा कसा हाताळला जातो?

थकवा येण्याची कारणे

थकवा हे अंतर्निहित आजाराचं लक्षण असल्याने, उपचार सामान्यत: थकवा निर्माण करणाऱ्या स्थितीवर अवलंबून असतो. हा विकार मानसिक, शारीरिक किंवा दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्यानुसार त्यावर उपाय केले जातात.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories