चाळीशीनंतरही तरूण रहा. वाढत्या वयात शरीरासाठी ह्या 8 गोष्टी आवश्यक आहेत, त्यांच्या कमतरतेमुळे आजारपणाला सुरुवात होते.

आपण आयुष्य जगताना कसलीच चिंता नसावी, शरीराने साथ द्यावी आणि आपण आपल्या कुटुबियांसमवेत आणि मित्रांसोबत आनंदाने दीर्घायुष्य जगावं असं वाटतं. पण जसजसं वय वाढतं तसतसं शरीर थकत जातं. पण काळजी करु नका, अशा वाढत्या वयातही आपली तब्येत ठणठणीत राहील ह्यासाठी ह्या काही गोष्टी लक्षात घ्या. आजचा आपला लेख ह्याविषयीच आहे की, वाढत्या वयात कोणती काळजी घ्यावी? तर वाढत्या वयाकरता ह्या 8 गोष्टी आवश्यक आहेत.

वाढत्या वयात आवश्यक आहेत ही जीवनसत्त्वे (Vitamins in ageing)

शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटामिन महत्वाची भूमिका बजावतात. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. विशेषतः वाढत्या वयासाठी काही विशेष जीवनसत्त्व अधिक आवश्यक असतात. चला काही व्हिटामिन विषयी जाणून घेऊया.

व्हिटॅमिन बी 12

3

व्हिटॅमिन बी 12 रक्त आणि मज्जातंतू पेशी बनवण्यास मदत करते. हे व्हिटॅमिन मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते.हे व्हिटॅमिन बी 12 टॅब्लेट आणि फोर्टिफाइड पदार्थांद्वारे देखील घेतले जाऊ शकते. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 30 टक्के लोकांना ॲट्रोफिक गॅस्ट्र्रिटिस असतो ज्यामुळे शरीराला अन्नाद्वारे व्हिटॅमिन बी 12 योग्यरित्या मिळत नाही.

प्रोबायोटिक्स

4

प्रोबायोटिक्स आतड्यांसाठी सर्वोत्तम मानले जातात. प्रोबायोटिक्स आंबवलेले अन्न, दही आणि कोबी सारख्या पूरकांपासून घेतले जाऊ शकते. ते अतिसारापासून आणि एलर्जीपासून शरीराचं रक्षण करते. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल किंवा तुम्हाला कोणतीही वैद्यकीय समस्या असेल तर प्रोबायोटिक्स टॅबलेट घेण्यापूर्वी डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा.

कॅल्शियम

5

वाढत्या वयाबरोबर कॅल्शियम खूप महत्वाचं आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर ही समस्या जास्त वाढते. कॅल्शियम स्नायू, नसा, पेशी आणि रक्तवाहिन्यांच्या योग्य कार्यासाठी मदत करते. 50 वर्षांपेक्षा पेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया आणि 70 पेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी प्रौढांपेक्षा 20 टक्के जास्त कॅल्शियम घ्यावे. आहारात दूध, दही आणि चीज, पनीर यांचा दररोज समावेश करा.

व्हिटॅमिन डी

6

व्हिटॅमिन डी स्नायू, मज्जातंतू आणि रोगप्रतिकारक यंत्रणा योग्यरित्या काम करायला मदत करते. व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत सूर्यप्रकाश आहे, परंतु वाढत्या वयानंतर सूर्याची किरणे शरीरात व्हिटॅमिन डी तयार करायला सक्षम नसतात. व्हिटॅमिन डी पूर्णपणे अन्नापासून मिळत नाही, परंतु सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन सारखे फॅटी फिश व्हिटॅमिन डी चे चांगले स्रोत आहेत.

व्हिटॅमिन बी 6

7

हे व्हिटॅमिन शरीराला जंतूंशी लढायला आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. वयोमानानुसार, व्हिटॅमिन बी 6 शरीरासाठी खूप महत्वाचे बनतं. काही अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की व्हिटॅमिन बी 6 वृद्ध लोकांमध्ये स्मरणशक्ती योग्य ठेवते. ह्या व्हिटॅमिनचा उत्तम स्रोत म्हणजे चणे. ह्याशिवाय, फॅटी फिश आणि फोर्टिफाइड फूड्स देखील ह्या व्हिटॅमिनचे चांगले स्त्रोत आहेत.

वाचा चणे आणि गूळ.

ओमेगा -3

8

ओमेगा -3 फॅटी ॲसिड शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात कारण ते आपलं शरीर ते नैसर्गिकरित्या बनवू शकत नाही. डोळे, मेंदू आणि शुक्राणू पेशींसाठी ओमेगा -3 आवश्यक आहेत. अल्झायमर आणि आर्थराईटिस सारख्या वयोमानानुसार होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यास देखील हे मदत करते. यासाठी ओमेगा -3 असलेले फॅटी मासे, अक्रोड, कॅनोला तेल किंवा अंबाडीचे बियाणे आपल्या आहारात समाविष्ट करा.

सेलेनियम

9

सेलेनियम पेशींना संसर्गापासून वाचवते. यामुळे थायरॉईड व्यवस्थित काम करत राहतो. सेलेनियम स्नायूंना मजबूत बनवते. या व्यतिरिक्त, हे डिमेंशिया, थायरॉईड आणि कर्करोगासारख्या वयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करते. यासाठी चिकन, मासे, अंडी, चीज, मशरूम, ब्राऊन राइस, काजू आणि केळी यांचा आहारात समावेश करा.

मॅग्नेशियम

10

मॅग्नेशियम शरीरातील प्रथिने आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, ते रक्तातील साखर स्थिर ठेवते. आपण शेंगदाणे, बियाणे आणि पालेभाज्यांमधून मॅग्नेशियम मिळवू शकता. वयानुसार, आहाराकडे लक्ष देण्याऐवजी, लोक जास्त औषधं घेऊ लागतात, ज्यामुळे शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असते.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories