Wi-Fi मुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं का? मग वायफाय राउटर ची योग्य जागा कोणती?

तुमच्या खोलीतही वायफाय आहे का? जर होय, तर सावधान, यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकते, जाणून घ्या
कसं?

वायफायच्या सुविधेमुळे आपल्याला जगाशी जोडण्याची सोय वाढली आहे, वेगवान स्पीडमुळे आपण केवळ आपल्या प्रियजनांशीच कनेक्ट होऊ शकत नाही तर आपलं कोणतंही ऑनलाइन काम चुटकीसरशी पूर्ण होतं.

चांगल्या स्पीडचे वायफाय आजकाल खूप गरजेचे झाले आहेत. त्यामुळे घरात वाय-फाय राउटर बसवले जाऊ लागले आहेत, ज्यामुळे तुम्ही घरात असलेली सर्व उपकरणे पूर्ण इंटरनेट स्पीडने चालवू शकता,

पण हे वायफाय तितकेच सुरक्षित आहेत का? तुमच्या आणि तुमच्या घरातील लोकांच्या आरोग्यासाठी?

3 38

वायफायमधून निघणाऱ्या रेडिएशन लहरी आरोग्यासाठी हानिकारक मानल्या जातात. कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय उच्च वारंवारता लहरी उत्सर्जित करते ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. ह्या लेखात, आपण खोलीत वायफाय स्थापित करण्याचे तोटे आणि त्याचे दुष्परिणाम कसे टाळता येतील ह्यांवर काही उपाय पाहू.

वाय फाय मुळे कोणते त्रास सुरु होतात

वाय फाय मुळे झोप येत नाही

4 36

जर तुमच्या खोलीत वायफाय राउटर बसवले असेल तर तुम्हाला निद्रानाशाची समस्या असू शकते. खोलीतील वायफाय राउटरमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी तयार होतात, ज्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होतो.

उदासीन असणे

5 36

इंटरनेट, लॅपटॉप, मोबाईल, वायफाय इत्यादींच्या खूप जवळ असण्यामुळे देखील नैराश्य किंवा चिंताग्रस्त समस्या उद्भवू शकतात कारण या उपकरणांमध्ये रेडिएशन लहरी असतात ज्यामुळे नैराश्य किंवा हाय बीपी चा त्रास होऊ शकतो.

डोकेदुखी

6 35

डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे, परंतु जेव्हा ती तुमच्या खोलीतील वायफाय राउटरमुळे होते तेव्हा काळजी आणखी वाढते. कारण जर तुम्ही हाय रेडिएशन देणाऱ्या ह्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या आसपास बराच वेळ असाल तर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

मेंदूवर वाईट परिणाम

7 34

वायफाय राउटरमुळे तुमची विचार करण्याची क्षमता, एकाग्रता इत्यादींवर वाईट परिणाम होतो. वायफाय राउटरमध्ये वापरल्या जाणार्‍या 4जी रेडिएशनचा मेंदूवर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो, वायफाय रेडिएशन तुमच्या मनाला गोंधळात टाकते असं तज्ञांचं मत आहे.

वायफाय राउटरचे दुष्परिणाम

8 25

वाय फाय आणि मोबाईलचा अतिवापर केल्याने मेंदूतील ग्लुकोजचे संतुलन बिघडते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. डोकेदुखी सुरु होते. वायफायच्या रेडिएशनमुळे हृदयाची गती वाढू शकते, ज्यामुळे हृदयाची धडधड किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

जास्त वेळ वायफायच्या आसपास राहिल्याने शुक्राणू आणि डीएनएवर वाईट परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. काही तज्ज्ञांचे असं मत आहे की वायफायच्या खूप जवळ राहणे किंवा त्याचा जास्त वापर केल्याने गर्भधारणा व्हायला त्रास होतो आणि गर्भाचा विकास मंद होतो.

वायफायचे दुष्परिणाम कसे टाळायचे?

9 17

जर तुमच्या खोलीत राउटर बसवणे सक्तीचे असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवा की वायफाय राउटर तुमच्यापासून किमान 3 फूट दूर आहे. रात्री झोपताना, राउटर बंद करा, जेणेकरून त्याच्या रेडिएशनमुळे झोप न येण्याचा त्रास होणार नाही.

गरज असेल तेव्हाच वायफाय वापरा, जास्त वेळ वायफाय वापरू नका. ड्रॉईंग रूम किंवा व्हरांडा सारख्या कॉमन रूममध्ये वायफाय बसवा जेणेकरून त्याचे रेडिएशन थेट तुमच्यापर्यंत येऊ नये.

लॅपटॉप किंवा मोबाईलवर सतत काम करणे टाळा. घरातून काम करताना सुद्धा तुम्ही मधेच ब्रेक घ्या. ब्रेक दरम्यान किमान दोन ते तीन मिनिटे तुम्ही तुमचे डोळे स्क्रीनवरून बाजूला न्या. शेवटी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या कामाची आणि फोन वापरण्याची वेळ ठरवली पाहिजे, तरच तुम्ही वायफायचे धोके टाळू शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories