तुम्हाला झोपण्याची योग्य पद्धत माहित आहे का? जाणून घेण्यासाठी हे वाचा.

आपण सगळे झोपतो पण तुम्हाला झोपण्याची योग्य पद्धत माहित आहे का? ह्या लेखात जाणून घ्या. झोप महत्वाची आहेच पण अशी सात आठ तासांची झोप घेताना योग्य पद्धतीने झोपलं तरच फायदा होतो.  जीवनशैली, खाणे आणि वाचन याप्रमाणेच झोपण्याचीही योग्य पद्धत आहे. झोपताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास पाठदुखीसारख्या समस्यांची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते.

मित्रांनो, तुम्ही कसे झोपता ह्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. तरुण आणि निरोगी लोकांसाठी झोपेची स्थिती कमी महत्त्वाची असते परंतु जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपले आरोग्य बदलते. यामुळे आपल्या झोपण्याच्या स्थितीलाही महत्त्व असते. ह्या लेखात झोपण्याच्या पद्धतीबद्दल काय सांगितले आहे ते जाणून घेऊया.

झोपण्याची योग्य पध्दत काय आहे?

झोपल्यानंतर अनेक वेळा पाठ किंवा मान दुखते. याविषयी डॉक्टर सांगतात की, ज्यांना मानदुखीचा त्रास आहे, त्यांच्या पाठीवर झोपल्याने वेदना आणखी वाढू शकतात.

दुसरीकडे, जर तुम्हाला तुमच्या पाठीच्या खालच्या भागात दुखत असेल, तर तुमच्या पाठीवर झोपणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय मणक्यात दुखत असल्यास झोपताना उशी लावून आराम करू शकता.

झोपण्यासाठी योग्य पोझ ही आहे 

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की झोपण्यासाठी योग्य मुद्रा कोणती असेल?  झोपताना मुद्रा म्हणजेच स्लीपिंग पोझ सुद्धा देखील खूप महत्वाची आहे. ही प्रत्येकासाठी वेगळी आहे. बरेच लोक झोपताना गुडघे आणि चेहरा जोडतात. त्यामुळे मान आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. यासोबतच शरीराच्या खाली हात दाबल्यामुळे किंवा पाय वाकल्यामुळे शरीराच्या अनेक भागात दुखायला लागू शकतं..

घोरणं कसं थांबवायचं?

घोरणे कसे थांबवायचे ह्यावर आम्ही ह्या आधी लेख लिहिले आहेत. जे तुम्ही वाचू शकता. कारण घोरण्याच्या समस्येने सोबत झोपलेल्या अनेकांना त्रास होतो. हे सगळं टाळण्यासाठी पोटावर झोपल्याने घोरण्याची सवय कमी होऊ शकते, हे डॉक्टर स्पष्ट करतात.  जर तुम्ही पोटावर झोपलात तर तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की यामुळे काही वेळाने चेहऱ्यावर परिणाम होऊ लागतो.

म्हणूनच तुम्ही जिथे झोपत असाल तिथे स्वच्छता, आरामदायी गादी आणि स्वच्छ उशी या गोष्टींकडेही लक्ष द्या. यापुढे झोपताना या गोष्टी लक्षात ठेवा. 

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तो शेअर करा आणि इतर समान लेख वाचण्यासाठी मराठी हेल्थ ब्लॉग शी कनेक्ट रहा.

Leave a Comment