आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वतःच मानसिक आरोग्य जपणे तसे खूपच अवघड आहे.अजूनही आपल्याकडे मानसिक आरोग्याविषयी लोक हवे तसे जागरूक नाहीयेत.इतर आजारांप्रमाणे मानसिक आजारवरसुद्धा उपाय आहेत आणि ते तुम्ही स्वतःला योग्य पद्धतीने वेळ देऊन ठीक हि करू शकता

आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकवून स्वतःचे मानसिक आरोग्य हि टिकवणे गरजेचं झाले आहे मग त्यासाठी प्रत्येकाने काळजीपूर्वक स्वतःकडे आणि स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊन त्यावर काम हि केले पाहिजे .तुमचे मानसिक आरोग्य जर चांगले असेल तर आयुष्यात येणाऱ्या खूप संकटाना तुम्ही धीराने आणि सकारात्मकरित्या तोंड देऊ शकता.
आजच्या या लेखात आपण वाचणार आहोत कसे सांभाळाल आपले मानसिक आरोग्य !
व्यक्त व्हा:

मनातल्या भावना कुणाजवळ तरी बोलून दाखवणे तुम्हाला मानसिक आजारातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत करेल .ज्या ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीतून बाहेर पडता येत नसेल किंवा त्या संकटाशी कसा तोंड द्यावा समजत नसेल तर आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी नक्की बोलून पहा ,तुम्हाला तुमच व्यक्त होणं एक वेगळी वाट नक्की दाखवून जाईल .
सक्रिय राहा:

व्यायाम करणे नक्कीच तुमचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यास मदत करते .शारिरीक आरोग्य तुमच्या मानसिक आरोग्याला सकारात्मक ठेवण्यास नक्कीच मदत करते .चिंतन ,व्यायाम ,योगासने या गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाला काळजीविरहित ठेवायला मदत करते .त्यामुळे रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सक्रिय राहा .
चांगला आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या :

ज्याचे पोट भरलेले असते त्याचे मन भरलेले असते .पण तेच पोट पौष्टिक गोष्टीने भरले तर मन आनंदी नक्कीच राहू शकते. मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर स्वतःच्या जेवणांवर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. आहारमध्ये फळे,भरपूर पालेभाज्या,डाळी,ड्रायफ्रुटस जे मेंदूसाठी चांगले असतात यांचा समावेश योग्य आणि माफक रित्या केला तर नक्कीच मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होईल. सर्वात म्हणत्वाचे भरपूर पाणी पिणे. शरीराला अन्नाबरोबर भरपूर पाण्याची गरज असते आणि हीच पूर्ण गरज तुम्हाला मन शांत ठेवायला मदत करते
- स्वतःला आनंद मिळेल असे काम करा:

स्वतःच्या आवडीचे काम करणे प्रत्येक माणसाला आनंदी करते .स्वतःच्या आवडीचे काहीतरी करणे आणि त्यात यश मिळवणे नक्कीच तुमचं मानसिक आरोग्य चांगले ठेवायला मदत करू शकते .स्वतःचे आवडीचे छंद जोपासणे आणि त्यात गुंतणे नक्कीच तुम्हाला एक वेगळा आनंद देऊन जाईल. मनापासून एखादी गोष्ट तुम्ही करत असाल तर तूम्हाला ती गोष्ट नैराश्यापासून दूर राहण्यास मदत करते त्यामुळे स्वतःला आणि मनाला आनंदी ठेवेल अश्या गोष्टी नक्की करा आणि आनंदी राहा .
मानसिक आरोग्य तुमच्या दैनंदिन राहणीमानावर खूप अवलंबून आहे. योग्य आहार आणि पाणी, व्यायाम, पुरेशी झोप आणि लोंकांसोबत संपर्क ठेवणे नक्कीच तुम्हाला नैराश्यापासून दूर राहण्यास मदत करेन .
Nice
Thank you!!
Nice
Thank you!!