नकारात्मक काळात ह्या उपायांनी स्वतःमध्ये आश्चर्यकारक बदल घडवा.

भारतात आणि जगभरात COVID-19 चा वाढता प्रभाव पाहिला की वाटतं ह्या जगात जगण्यापेक्षा एका मोकळ्या, निरोगी, आनंदी जगात राहायला जावं.

सततच्या Lock-Unlock च्या कंटाळवाण्या दिवसांनी आयुष्य भरून गेलं आहे. ह्या कठीण काळात शारीरिक आरोग्य हा नागरिकांचा हक्क आहे. पण मानसिक आरोग्य देखील तेवढेच महत्वाचे आहे.पण देशाचं बजेट जीडीपी (GDP) च्या 1.6% इतकंच आहे म्हणजे फारच कमी आहे, त्यात मानसिक आरोग्यासाठी १ टक्क्यापेक्षाही कमी बजेट आहे.

तुम्ही कदाचित गाणं ऐकलं असेल.
“मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं”

मनाचं आरोग्य गाण्यासारखं सुंदर हलकंफुलकं आणि तरल असणं अपेक्षित आहे. आपण सारे lockdown मुळे घरी आहोत.चला तर आपण वैयक्तिक पातळीवर घरच्या घरी एक आनंदी जग निर्माण करूया.

लॉकडाऊन मध्ये तणावमुक्त तसेच शांत, आनंदी राहण्यासाठी काही उपाय.

  • बातम्या पाहण्याची योग्य वेळ ठरवा
2 28

आजूबाजूला घडणाऱ्या घटना तसेच देश विदेशात सध्या काय चालू आहे हे घरात असताना बातम्या बघून आपण समजून घेतो. पण बातम्या पाहण्याची जेवढी आवश्यकता आहे तेवढेच त्याचे मानसिक दुष्परिणाम समोर आले आहेत.
सततच्या नकारात्मक घटनांच्या बातम्यांनी, हेलावून टाकणाऱ्या covid काळातील दृश्यांनी मन विचलित होते.

सतत बातम्या पाहण्याऐवजी आपण बातम्या पाहण्याची एकच वेळ ठरवा. उदा. सकाळी 8 वाजता किंवा रात्री 8 वाजता.

  • कुटुंबासमवेत प्रेमाचे क्षण घालवा
3 27

लॉकडाऊनमुळे आपल्याला आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालविण्याची संधी मिळाली आहे जे आमच्या व्यस्त जीवनशैलीमुळे पूर्वी शक्य नव्हते. आपल्या माणसांसोबत साधासा बुद्धिबळ, कॅरम किंवा पत्त्यांचा रंगलेला डाव असो की रंगात आलेला आठवणींच्या गप्पांचा फड असो की किचन मधली करामत असो. आयुष्य म्हणजे फक्त आपलं प्रेमळ कुटुंब आहे हेच खरं. घरात राहून आपण काही मिळवत असू तर तो हाच अनमोल आनंद आहे.

त्यामुळे कुटुंबासमवेत लॉकडाऊनच्या सुंदर आठवणी तयार करा. ज्या पुढल्या काळात आठवून आठवून तुम्ही नक्की आनंदी व्हाल.

  • “होय” असा सकारात्मक विचार करा
4 28

मी फार काही गमावत आहे. मी घरात कोंडल्याने माझ्या आयुष्याचे फार नुकसान होत आहे. मनासारखे मोकळे आयुष्य जगताच येत नाही. ह्या सगळ्या नकारात्मक “नाही”अशी भूमिका घेणाऱ्या विचारांना बाहेरचा रस्ता दाखवा.
मी सुखरूप आहे. जिवंत आहे. माझा परिवार मी जीवापाड जपत आहे. स्वतःसोबत सर्वांची काळजी घेत आहे. मी रोज उगवणारा एक नवा दिवस एक नवीन गोष्ट शिकण्यासाठी वापरत आहे. सध्या मी घरी राहणे हीच आपल्या बांधवांसाठी एक मोठी मदत आहे. माझ्या पुढील प्रगतीसाठी मी हा सगळा वेळ अधिक प्रभावी वापरणार आहे.

अशा प्रकारे ह्या नकारात्मक कठीण काळात ह्या आणि अशा अनेक सकारात्मक गोष्टींची यादी करा. जे काही चांगले आहे त्याबद्दल कृतज्ञेचा भाव ठेवा.

  • इंटरनेटद्वारे आपल्या आवडत्या व्यक्तींच्या संपर्कात रहा
5 25

एखादा मेसेज, आपुलकीचा फोन, किंवा जवळच्या माणसांसोबत व्हिडिओ कॉल अशा गोष्टींनी आपण मनाला
ताजतवानं करू शकतो. आपण प्रत्यक्ष भेटतो तेव्हा Oxytocin मुळे आपल्याला प्रत्यक्ष भेटीचा आनंद हा वेगळाच असतो हे जाणवते त्याची सर ह्या गोष्टींना नाही. पण तुम्हाला stay Connected Stay Happy राहिल्याचा आनंद नक्की गवसेल. आपण करत असलेल्या साध्या सोप्या गोष्टी देखील मित्र मैत्रिणींना शेअर करू शकता.

ज्यामुळे आयुष्य थांबलेलं नाही ते काही काळासाठी थोडंसं बदललं आहे असं वाटेल.

  • स्वतःचं योग्य रूटीन ठरवून घ्या
6 22

ही बाब अतिशय चिंतनीय आहे. रुटीन म्हणजेच आपलं प्रोटीन असतं. रुटीन म्हणजे स्वतःला शिस्तीने आखून दिलेला दिवसभराचा आराखडा. ह्यामध्ये सहसा बदल केला जात नाही. उदा. आपण रात्री 10.30 वाजता झोपायचे व सकाळी 6 वाजता उठायचे. नियमित व्यायाम, वाचन, कामाच्या आणि मनोरंजनाच्या वेळा ठरलेल्या असतील. ह्या सगळ्यामुळे आपल्याला आपण एक शिस्त पाळत असल्याचा आनंद मिळतो. तसच आपलं आयुष्य सुरळीत सुरू असल्याचं समाधान मिळतं.

आणखी एक सल्ला : लॉकडाउन कालावधीत चिंता न करता वरील गोष्टींवर चिंतन करा. त्या अंमलात आणा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories